तेजीचा काल कायम राहील?

0
107

गतसप्ताहात सेन्सेक्समध्ये 1.19 म्हणजेच 780.45 अंकांची वाढ झाली आणि हा निर्देशांक सप्ताहाखेरीस 66060.90 या पातळीवर विसावला; तर निफ्टीमध्ये 1.20 टक्क्यांची म्हणजेच 232.7 अंकांची वाढ होऊन तो 19564.5 अंकांव विसावल्याचे दिसले. बीएसई लार्ज कॅप, मिडकॅप आणि स्मॉलकॅप क्षेत्रातही अनुक्रमे 1 टक्के, 1.3 टक्के आणि 1.7 टक्के वाढ दिसून आली. या तेजीस प्रमुख कारण ठरले ते अमेरिकन बाजारात महागाईच्या दरात घरणीमुळे आणि ङ्गेड रिझर्व्हकडून व्याजदरवाढीचा सपाटा थांबवण्याचे संकेत मिळाल्यामुळे आलेल्या तेजीचे. याखेरीज देशभरातील मान्सूनमध्ये अल्पशी प्रगती झाली आहे. तसेच आयटी क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांच्या तिमाही निकालांचे आकडे उत्साहवर्धक राहिले आहेत. जोडीला विदेशी गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदीचा हंगाम अद्यापही कायम आहे. त्यामुळे छोट्या घसरणी झाल्या तरी आधार पातळीवरुन बाजार पुन्हा वरच्या दिशेने झेपावला. याखेरीज डॉलर इंडेक्समध्ये झालेली लक्षणीय घसरणही बाजाराच्या उसळीला हातभार लावून गेली. विशेष म्हणजे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ होऊनही बाजाराने हिरवा झेंडा ङ्गडकावत घेतलेली झेप विशेष लक्षणीय आहे.

चालू आठवड्याचा विचार करता, सतत चार महिने वरच्या दिशेने झेपावणार्‍या निर्देशांकांना ब्रेक लागणार का हा प्रश्‍न याही आठवड्यात कायम असणार आहे. हा प्रश्‍न उपस्थित होण्यास काही कारणेही आहेत. एक म्हणजे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ होऊ लागल्यानंतर सरकारने मे महिन्यात शुन्वारआणलेला विंड ङ्गॉल टॅक्स पुन्हा लागू केला आहे. याचा ङ्गटका रिलायन्ससारख्या बाजाराची दिशा ठरवणार्‍या वजनदार समभागाला बसण्याची शक्यता आहे. वास्तविक, रिलायन्सच्या डीमर्जरच्या वृत्तामुळे गेल्या आठवड्यात या समभागात मोठी तेजी आली आणि या तेजीने निफ्टीला नव्या उच्चांकी पातळीवर नेले. पण आता या समभागात घसरणीचे संकेत मिळताहेत. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या दराचा ङ्गटका पेंट कंपन्यांनाही बसतो. त्यांचा उत्पादनखर्च वाढून नङ्गा आक्रसतो. त्यामुळे पेंट इंडस्ट्रीतील कंपन्यांच्या समभागांमध्येही घसरण दिसू शकते. एसबीआयने एमसीएलआरच्या दरात वाढ करून कर्जदारांना झटका दिला आहे. यामुळे पुन्हा एकदा कर्ज महागण्याचा सिलसिला सुरू होण्याची शक्यता आहे. त्यालाही बाजार कसा प्रतिसाद देतो हे पहावे लागेल. टेक्निकल चार्ट पाहिल्यास बाजार ‘ओव्हरबॉट’ झोनमध्ये पोहोचला आहे. सामान्यतः अशा वेळी घसरण पहायला मिळते. परंतु गेल्या चार महिन्याचा आलेख पाहिल्यास ही घसरण ङ्गार मोठी न होता अल्पशा घसरणीनंतर बाजार पुन्हा झेपावतो. निफ्टीसाठी सध्या 19400 ते 19300 च्या पातळीवर भक्कम आधार दिसत आहे; तर वरच्या बाजूला 19650 आणि 19700 च्या पातळीवर अडथळा दिसत आहे. हा टप्पा यदाकदाचित पार केला तर मोकळे आकाश असणार आहे. बँक निफ्टीसाठी 44500 च्या पातळीकडे लक्ष ठेवून राहणे गरजेचे आहे. ती तोडल्यास 45250 ते 45600 पर्यंत तो झेपावू शकतो. परंतु या पातळीच्या खाली आल्यास 44000 पर्यंत घसरण्याची शक्यता आहे.

चालू आठवड्यामध्ये एचडीएफसी बँक, इफोसिस, इंडसइंड बँक, एचयुएल, आयसीआयसीआय बँक, टाटा एलेक्सी, आयसीआयसीआय प्रडेन्शियल, आयसीआयसीआय लोंबार्ड, पॉलीकॅब, एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस, बँक ऑङ्ग महाराष्ट्र, टाटा कम्युनिकेशन, ङ्गिनोलेक्स, हिंदुस्थान युनिलिव्हर, दालमिया भारत, कोङ्गोर्ज, जेएल डब्ल्यू स्टील, एचडीएङ्गसी लाईङ्ग, हिंदुस्थान झिंक, अशोक लेलँड, अल्ट्राटेक सिमेंट आणि कोटक महिंद्रा बँक या दिग्गज कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होणार आहेत. त्यामुळे बाजारात मोठी घुसळण दिसून येऊ शकते. समभागांच्या दृष्टीने विचार करता टाटा कम्युनिकेशनचा समभाग 1580 च्या स्टॉपलॉससह 1720 चे लक्ष्य ठेवून खरेदी करता येईल. ओएङ्गएसएसचा समभाग 3850 चा स्टॉपलॉस आणि 4100 रुपयांचे लक्ष्य ठेवून खरेदी करता येईल. याखेरीज विप्रोचा समभाग 417 रुपयांचे लक्ष्य, गोदरेज प्रॉपर्टीज 1680 रुपये लक्ष्य, बजाज ङ्गिनसर्व्ह 1670 रुपये लक्ष्य ठेवून खरेदी करता येतील. मध्यमकालीन गुंतवणुकीसाठी एनसीसी 128 रुपये खरेदी, 125 रुपये स्टॉपलॉस आणि 140 रुपये लक्ष्य, मॅनकाईंड 1750 रुपये खरेदी, 1670 रुपये स्टॉपलॉस आणि 1850/2000 रुपये लक्ष्य, ऑनवर्ड टेक 520 रुपये खरेदी 500 रुपये स्टॉपलॉस आणि 600 रुपये लक्ष्य ठेवून खरेदी करता येईल. सध्या धातूक्षेत्रातील समभागात तेजी पहावयास मिळत आहे. त्यादृष्टीने सेलचा समभाग 116 रुपयांचे लक्ष्य, हिंदुस्थान कॉपर 200 रुपये लक्ष्य, प्रदीप ङ्गॉस्ङ्गेटस् 150 रुपये लक्ष्य ठेवून खरेदी करता येतील. याखेरीज झेन्सर टेक्नॉलॉजीचा समभाग 530 ते 540 रुपयांचे लक्ष्य ठेवून खरेदी करता येईल.