लोभाचे फळ

0
52

अकबराने कोणताही अवघड किंवा गुढ प्रश्न विचारावा आणि बिरबलाने आपल्या बुद्धिचातुर्याने उत्तर द्यावे असे नेहमी घडत असे. बिरबलही प्रत्यक्ष उदाहरणातून असे उत्तर देत असे की बादशहा अकबरासह दरबारातील सर्व मानकरी आश्चर्यचकित होत असत. एकदा अकबराने बिरबलाला विचारले की, ’राजउद्यानातील कोणीही पाहिलेली नाही अशी आश्चर्यकारक गोष्ट तू मला दाखवू शकशील का? त्यावर बिरबलाने तात्काळ ‘हो’ ’म्हटले. त्यासाठी बिरबलाने राजमहालातून भरपूर मध मागवून घेतलं. त्या शाही उद्यानात वातमृग येत असे. हा अतिशय दुर्मीळ आणि मानवाची चाहूल लागताच क्षणात पळून जाऊन दिसेनासा होणार प्राणी, बिरबलाने आणलेला सर्व मध त्या उद्यानातील गवतावर पसरवून टाकला.

थोड्यावेळाने वातमृग आला. खाता खाता त्याला गवत गोड लागल्याने तो गवत खाण्यात गुंगू होऊन गेला. वातमृगाने तेथील सारे गवत खाऊन संपविले, तेव्हा बिरबलाने आपल्या जवळील मधमिश्रित थोडे थोडे गवत त्याच्यासमोर टाकत टाकत त्याला राजवाण्यात गवत खाण्यात गुंगलेला वातमृग राजवाड्यात आला. बिरबल म्हणाला, महाराज, हे पाहा उद्यानातील वेगळे आश्चर्य, जो वातमृग माणसाची चाहूल लागताच क्षणात दिसेनासा होतो तो आज भर दरबारात आला आहे. राजाने आपल्या प्राणीसंग्रहालयाचे वैभव वाढविण्यासाठी लगेच त्या वातमृगाला आपल्या प्राणी संग्रहालयात दाखल केले. आणि वातमृग कैद झाले.

तात्पर्य – लोभ आवरता आला नाही की घात हा ठरलेलाच असतो.