कोणताही प्राणी माणसा प्रमाणे जाड होत नाही, over weight होत नाही किंवा माणसासारखे रोग सहसा त्यांना होत नाहीत. निसर्गाप्रमाणे प्राणी व मानव हे दोन वेगळे species आहेत. दोघांचे सर्व वेगळे आहे. माणसाचे नियम त्यांना लागू पडत नाहीत किंवा त्यांचे नियम माणसाला लागू होत नाहीत. उलट माणसापेक्षा सर्व प्राणी healthy असतात. याचे प्रमुख कारण ते पूर्ण निसर्ग नियमांप्रमाणे वागतात. ते भूक लागेल तेव्हाच खातात, तहान लागेल तेव्हाच पाणी पितात, त्यांच्या जीवनशैली प्रमाणे त्यांना आपोआप व्यायाम होतो, मल, मुत्र ते थांबवून ठेवत नाहीत, काय खायचे काय नाही हे त्यांना अचूक समजते. कुत्रा प्रथम पदार्थ हुंगतो त्याप्रमाणे तो खायचे कि नाही ते ठरवतो, माणूस येवढा हुशार असून अजून त्याला कोणता आहार घ्यायचा कळत नाही.
आहारतज्ञ ना हजारो रुपये मोजून काय व कसा आहार घ्यायचा ते जाणून घेतो. एवढे करूनही ते पाळतोच असे नाही. माणूस जे चविष्ट लागेल तेच जास्त खातो, आहारात आवश्यक ते सर्व vitamin,protin jma क्षार वगैरे प्रमाणात आले का म्हणजे चौरस आहार घेतो का तपासत नाही व्यायाम करत नाही, इ. सर्व निसर्गाविरुध्द वागतो म्हणून जाड होतो, अनेक रोग होतात. आता असे परिस्थितीमुळे, नोकरीमुळे मनावर ताबा नसल्याने कशानेही घडत असले तरी निसर्गाकडे क्षमा नाही. त्याप्रमाणे नाही वागले कि तो शिक्षा हि देणारच. हे सर्व मनुष्याला माहिती आहे. पण त्याला जास्त बुद्धी असल्याने तो आपल्याला काय रुचते तेच करतो.त्याची फळे भोगतो. अग्नीत हात घातला तर तो भाजणार हे नक्की. मग तो चुकून गेला तरी निसर्ग फार कडक आहे. त्याच्या शिस्ती बाहेर गेले कि शिक्षा ! जाड न होणे वगैरे आपल्या हातात आहे. परिस्थिती प्रमाणे जमत नाही ते सोडून शक्य तेवढे निसर्गाविरुध्द न वागणे हीच आरोग्याची गुरुकिल्ली आहे.