यशस्वी तो असतो जो आपल्या शत्रुंवर नाही तर आपल्या मनावर विजय मिळवतो.
पाककला
मिस व्हेज पराठा
साहित्य : दोन कप पीठ, दोन चमचे तेल, एक बटाटा, अर्धा कप किसलेले गाजर, अर्धा कप चिरलेली फुलकोबी, अर्धा कप मटार, अर्धा कप बारीक चिरलेला कांदा, दोन तुकडे केलेल्या हिरव्या मिरच्या, एक इंच किसलेले आले, दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा टीस्पून धणेपूड, १/२ टीस्पून धने पावडर, १/४ टीस्पून तिखट, १/४ टीस्पून गरम मसाला, १/४ टीस्पून आमसूल पावडर, चवीनुसार मीठ, गरजेनुसार पाणी कृती : एका मोठ्या भांड्यात पीठ घ्यावे. तसेच थोडे मीठ आणि तेल घालून मिस करावे. यानंतर पाणी घालून मऊ पीठ मळून घ्यावे. आता पीठ १५ मिनिटे झाकून ठेवा. नंतर कढईत तेल गरम करून त्यात कांदा व हिरवी मिरची घालावी. तसेच आले घालून सोनेरी होईपर्यंत परतवून घ्यावे. यानंतर त्यात वरील भाज्या घालून २ मिनिटे परतून घ्यावे. आता नंतर वरील कोरडे मसाले आणि मीठ घालून मिस करावे. उकडलेले आणि मॅश केलेला बटाटा आणि कोथिंबीर घालून मिस करावे. यानंतर मळलेल्या पिठाचे छोटे-छोटे गोळे करून लाटून घ्या. नंतर तयार मिश्रण मधोमध भरून त्याची घडी करून पराठा लाटून घ्यावा. आता पराठा तव्यावर तेल लावून दोन्ही बाजूंनी शेकून घ्यावा.
दैनिक पंचांग मंगळवार, दि. २४ सप्टेंबर २०२४
मेष : आजचा आपला दिवस मित्र आणि सामाजिक कार्य यांच्यामागे धावपळ करण्यात जाईल.
वृषभ : पदोन्नतीचा योग आहे. कार्यलयात अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल.
मिथुन: आपल्याला आज प्रतिकूल दिवस आहे. मानसिक व्यग्रता, शारीरिक शिथिलता अनुभवास येईल.
कर्क : वैचारिक नकारात्मकता मनात असल्याने दिवसभर अस्वस्थ राहाल. म्हणून तो दूर ठेवा.
सिंह : बेबनाव होईल, त्यामुळे क्लेश होतील.
कन्या : व्यवसाय धंद्यात आज यश मिळण्याची शक्यता अधिक आहे.
तूळ : तुमची वैचारिक आणि मधुर वाणी लोकांना प्रभावित करेल.
वृश्चिक : मित्रपरिवाराशी सावधपणाने वागा असे श्रीगणेश सांगतात.
धनु : प्रतिस्पर्ध्यावर तुम्ही मात कराल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आज चांगले राहील. वाहने काळजीपूर्वक चालवा.
मकर : आजचा दिवस मिश्रफल देणारा आहे. कुटुंबातील लोकांबरोबर गैरसमजातून मतभेदाचे प्रसंग घडतील व मन दुःखी होईल.
कुंभ : आजचा दिवस तुम्हाला आर्थिकदृष्ट्या लाभदायी आहे.
मीन: स्थावर संपत्ती व कोर्ट-कचेरी यांच्या झंझटमध्ये आज पडू नका.
दैनिक पंचांग शुक्रवार, दि. १९ जुलै २०२४
प्रदोष, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर, आषाढ शुलपक्ष,
मूळ २६|५५, सूर्योदय ०६ वा. २७ मि. सूर्यास्त ०६ वा. २८ मि.
मेष : आज आपल्या आयुष्यात आपल्या नातलागांची व मित्रांची चांगली भूमिका रहाणे शय आहे. योजनांमध्ये केलेला बदल इतर कामे करण्यासाठी प्रवृत्त करेल.
वृषभ : आजचा दिवस व्यापार क्षेत्रातील चांगली बातमी आणणारा आहे. मित्रांचा अनुकूल सहयोग मिळेल. घरातील वातावरण आनंददायी राहील. घराबाबत काही योजना बनवाल. नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा.
मिथुन : प्रेमीजनांसाठी आजचा दिवस आनंदाने परिपूर्ण असेल. नवी सुरुवात कराल आणि पूर्ण विश्वासाने त्याच्या प्राप्तीचा प्रयत्न कराल. प्रिय व्यक्तीबरोबर संवाद होईल. आवश्यक कार्य देखील पूर्ण होतील.
कर्क : कार्यात यश मिळविण्यासाठी आपले मत ठामपणे मांडाल. आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाच्या कामांसाठी श्रम करावे
लागतील. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. मित्रांचा पाठिंबा मिळेल.
सिंह : नोकरदार व्यक्तींना कामात अनुकूल वातावरण मिळेल. आपली इच्छा असेल तर दिवास्वप्नही खरी ठरू शकतात.
बळात वाढ होईल. लोकांबरोबर काही विषयांवर संमती द्यावी लागू शकते.
कन्या : आपणास आज संभाषणात काळजी घेण्याची गरज आहे. देवाण-घेवाण टाळा. आनंददायी क्षण आयुष्यभर स्मरणात
रहातील. अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल. व्यापार-व्यवसायासाठी छान दिवस.
तूळ : स्वतःला इतर लोकां समोर सादर करण्याचे सामर्थ्य अंगी येईल. इतर लोकांना तुमचे विचार पटतील. आर्थिक विषयांमध्ये सावगिरी बाळगा. धावपळ जास्त होईल.
वृश्चिक : महत्वाच्या एखाद्या सामुदायिक योजनेत इतर लोकांबरोबर आपले सहकार्य तुमची उत्तम राजकीय जाण दाखवेल. वेळ अनुकूल आहे. पत्नीशी बोलल्यानंतर मूड छान होईल.
धनु : आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती आनंददायी राहील. सुख-शांतीचे वातावरण राहील. हुशारीने गुंतवलेले धन आपणास ध्येयाजवळ घेऊन जाईल.
मकर : अधिकार क्षेत्र वाढेल. शत्रूंना भीती वाटेल. आनंद वाढेल. उत्साहजनक वार्ता मिळतील. यापार-व्यवसायात कौटुंबिक सभासदांचा सहयोग मिळेल.
कुंभ : आरोग्य उत्तम राहील. देवाणय्घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. शत्रूंवर प्रभाव वाढेल. लेखन कार्यात प्रगती होईल. शत्रूंपासून सावध राहा. हसत खेळत वेळ जाईल.
मीन : मुलांवर खर्च होईल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. वेळेचे भान पाळा. वाहने काळजीपूर्वक चालवा. मानसिक सुखय्शांतीचे वातावरण राहील. जोखिम असलेल्या कार्यांमध्ये गुंतवणूक करू नये.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.
माणसाला किती दात असतात
माणसाला किती दात असतात
प्रौढ माणसाला एकूण ३२ दात असतात. वरील जबड्यात सोळा व खालच्या जबड्यात सोळा. यात निम्मे दात डाव्या बाजूला व निम्मे उजव्या बाजूला असतात. वरच्या व खालच्या जबड्यातील प्रत्येकी सोळा दातांमध्ये पटाशीचे चार दात, दोन सुळे, चार उपदाढा व सहा दाढा असे दात असतात. माणसाच्या बाबतीत खायचे व दाखवायचे दात वेगळे नसतात. मग भले एखाद्याला कोणी काहीही म्हणो! उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये माणसाच्या जबड्याचे हाड लहान होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शेवटी येणार्या दाढांसाठी (अक्कल दाढांसाठी) जबड्यात जागाच शिल्लक राहत नाही. त्यामुळे कधी कधी ह्या दाढा उगवतच नाहीत. कधी वेड्यावाकड्या येतात. त्या जर गालाच्या दिशेने उगवू लागल्या तर खूप त्रास होतो व त्या काढून टाकाव्या लागतात. कालांतराने सर्व मानवांना २८ दात असण्याची शयता नाकारता येत नाही. थोडयात म्हणजे आधुनिक मानवाला अक्कलदाढांची गरज नाही. हे निसर्गाच्या ध्यानात आले असावे. अक्कलदाढा व अक्कल यांचा तसा अर्थाअर्थी काहीच संबंध नसल्याने घाबरून जाण्याचे कारण नाही!




