हिंद सेवा मंडळाच्या स्टुडन्ट टॅलेंट सर्चमध्ये ‘जय बजरंग’चे सहा विद्यार्थी गुणवत्ता यादीत

हिंद सेवा मंडळाच्या स्टुडन्ट टॅलेंट सर्चमध्ये जय बजरंग प्राथमिक विभागाचे ६ विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले.

नगर – हिंद सेवा मंडळ आयोजित स्टुडंट टॅलेंट सर्च स्पर्धा
परीक्षेत आशा एज्युकेशन फाउंडेशन संचलित, जय बजरंग प्राथमिक
विद्यालयाचे २ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये तर ४ विद्यार्थी
शहर गुणवत्ता यादीत चमकले. त्यामध्ये इ.२ री चा चि. दर्शन गणेश
घुले (१५० पैकी १२६) गुण मिळवून, जिल्हा गुणवत्ता यादीत ९
आला तर, कु. अंजली रवींद्र आव्हाड (१५० पैकी ११४) गुण
मिळवून जिल्ह्यात ११ वी आली. तसेच कु. आराध्या कैलास मेहेत्रे
शहर गुणवत्ता यादीत (१५० पैकी ११६) गुण मिळवून शहर गुणवत्ता
यादीत प्रथम आली. इयत्ता पहिलीचा चि. ईशान दीपक घुले (१५०
पैकी १०२) गुण मिळवून शहर गुणवत्ता यादीत ३ रा आला. तर
इ. पाचवीचा चि. सिद्धेश अमोल क्षीरसागर (३०० पैकी २३४)
गुण मिळवून प्रथम आला तर इ. पाचवीचा चि. आदेश अमोल
क्षीरसागर (३०० पैकी २२८) गुण मिळवून शहर गुणवत्ता यादीत
दुसरा आला. त्यांना श्रीमती सुरेखा दुधाडे, श्रीमती छाया क्षीरसागर,
राहुल मोरे, भागचंद पाखरे, श्रीमती अश्विनी बेरड यांचे मार्गदर्शन
लाभले. तसेच त्यांना आशा एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र
फिरोदिया, सहसचिव उमेश गांधी, व्यवस्थापक आशुतोष घाणेकर व
विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल क्षीरसागर यांनी शुभेच्छा दिल्या.

‘अट’

बायको : माझी एक अट आहे!
नवरा : काय?
बायको : तुम्ही सोडायला आले तरचं मी माहेरी जाणार
नवरा : माझी पण एक अट आहे?
बायको : काय?
नवरा : मी घ्यायला आलो तरच परत यायचे?

महापुरुषांची चित्रे

0

* वास्तुशास्त्रानुसार साधू आणि संतांचे
चित्र दिवाणखान्यात किंवा ड्राँईंग रुमममध्ये
ठेवा. असे केल्याने त्यांचे आशीर्वाद घरातील
सदस्यांवर राहतात. घरात रद्दी आणि
अनावश्यक वस्तू ठेवू नका.
* घराच्या दक्षिण-पूर्व कोपर्‍यात हिरवी
झाडे लावा. घरात गोलाकार कडा असलेले
फर्निचर ठेवू नका.

सफरचंद हलवा

0

साहित्य : ५ सफरचंद, ४ चमचे तुप
(आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करु
शकता), पाऊण वाटी साखर, वेलची पुड,
साय, काजू , बदाम
कृती : सफरचंद धुवून त्याचे २ काप
करुन त्यामधल्या बी काढून किस करुन घ्या
कढई मध्ये तुप घ्या. तुप गरम होत आले
की, काजू बदाम तुपावर २ मि. परतून घ्या.
आता मध्यम आचेवर सफरचंदाचा किस
घालून, सफरचंदातील पाणी कमी होइपर्यंत
छान परतून घ्या. (मध्ये मध्ये हलवत राहायच
आहे) १५ मिनीट झाल्यावर त्यमध्ये साखर
,वेलची पुड घालून ते एकत्र करुन घ्यावे.
एकसारख मध्यम आचेवर हलवत राहायच
आहे. २ मिनीटांनी साय घालून एकत्र करुन
घ्यावे. आता मिश्रण जाडसर होईपर्यंत
आणि कढईपासून वेगळे झाले की आपला
सफरचंदाचा हलवा तयार आहे.

हाय बीपी रुग्णांसाठी

0

]

उच्च रक्तदाब (हाय बीपी) नियंत्रित
ठेवण्यासाठी नियमितपणे डॉटरांकडून
तपासणी करावी आणि अतिरिक्त मिठाचे सेवन
करु नये. त्याचप्रमाणे आपला आहार विहार
चांगला ठेवा. आठवड्यातून कमीत कमी ३०
मिनिटे व्यायाम करावा. त्याचप्रमाणे डॉटरी
सल्ल्याशिवाय औषधे घेणे सोडू नये. दिनचर्या
चांगली ठेवावी.

जेवायला गेलेला बोका

एका माणसाने दुसर्‍या एका माणसास आपल्या
घरी जेवायला बोलाविले. त्यासंबंधी तयारी चाललेली
पाहून त्या घरच्या बोयाने विचार केला की, आपण
फार दिवस आपल्या मित्राला जेवायला बोलावणार
होतो, त्याला आजची संधी चांगली आहे. मग त्याने
आपल्या मित्राला जेवणाचे आमंत्रण दिले. त्याप्रमाणे
ठरल्या वेळी त्याचा मित्र तेथे आला अणि प्रथम
स्वयंपाकघरात गेला. तेथे अनेक प्रकारची पक्वान्ने
तयार करून ठेवली होती, ती पाहून त्याच्या
तोंडाला पाणी सुटले. मग त्या पक्वान्नांकडे पाहात
तो आपल्या मनात म्हणाला, ’असलं सुग्रास अन्न
ईश्वराच्या कृपेनं आज प्राप्त झालं आहे, तर त्यावर
असा हात मारून घ्यावा की पुन्हा निदान आठ
दिवस तरी जेवणाची आठवण होऊ नये.’
याप्रमाणे मनात विचार करीत व शेपटी
हालवीत तो उभा आहे इतयात स्वयंपायाची
नजर त्याच्याकडे गेली व त्याने हळून मागून येऊन
त्याचे मागचे दोन पाय धरून त्याला खिडकीतून
बाहेर फेकून दिले. खाली असलेल्या दगडावर
बोयाचे डोके आपटून त्याला फार लागल्याने
तो मोठमोठ्याने ओरडत गल्लीतून पळत असता,
दुसरी काही मांजरे त्याच्याजवळ आली व त्याला
विचारू लागली,
’अहो, आज तुम्हाला जेवणाचं आमंत्रण
होतं, तिथला बेत कसा काय होता?’ बोका त्यावर
म्हणाला, ’मित्रांनो, जेवणाचा बेत किती चांगला
होता म्हणून सांगू ? असं जेवण मी माझ्या जन्मात
कधी जेवलो नाही. पण झालं काय की, बासुंदीपुरीचं
जेवण एवढं झालं की, एक पाऊल चालणं मुश्किल
झालं, अन् तोल जावून खिडकीतून मी एकदम
खाली रस्त्यावरच पडलो.’
तात्पर्य : नोकराने आपल्या मित्राला मालकाच्या
घरी जेवायला बोलावू नये.

कबरींमध्ये मृतदेह कुजतात का?

कुजणे हा निसर्गाचा एक भाग आहे आणि
समाधीस्थळांमध्ये मृतदेहांचे विघटन होते. तथापि,
कुजण्याची प्रक्रिया जमिनीखाली दफनविधींसारखी
नसते. समाधीस्थळात, एकदा शरीर एका क्रिप्टमध्ये
ठेवले की ते हळूहळू निर्जलीकरण होते आणि कोरडे
होऊ लागते. जमिनीखाली दफनविधींमध्ये विघटन
होण्यापेक्षा यास बराच वेळ लागू शकतो.
समाधीस्थळे ही मजबूत, चांगल्या प्रकारे
बांधलेली रचना असतात ज्यात क्रिप्ट्स म्हणून
ओळखल्या जाणार्‍या गोष्टी असतात. क्रिप्ट म्हणजे
समाधीस्थळातील एक लहान खोली जिथे एक
कास्केट किंवा अंत्यसंस्काराचा कलश ठेवला
जातो. ती खोली नंतर दोनदा सील केली जाते,
एकदा आतून आणि नंतर पुन्हा बाहेरून विशेष
कौल वापरून. ज्या समाधीस्थळांमध्ये फक्त एकाच
मृतदेहाला दफन केले जाते ते कायमचे सीलबंद
केले जाते, तर कुटुंबातील समाधीस्थळ अशा
प्रकारे डिझाइन केले जाते की ते भविष्यात पुन्हा
उघडता येईल.
अनेक प्राचीन संस्कृतींनी मृतांच्या स्मरणार्थ
समाधीस्थळे बांधली, परंतु आज ती पुन्हा लोकप्रिय
होत आहेत. इस्लाम धर्माचे पालन करणारे लोक
बहुतेकदा त्यांच्या मृत प्रियजनांना श्रद्धांजली
वाहण्यासाठी सुंदर स्मारके बांधतात आणि ज्यू
धर्माचे पालन करणारे लोक विशेष स्मारके देखील
बांधतात. ख्रिश्चन धर्मीयांमध्येही समाधीस्थळे
बांधली जातात. स्मशानभूमी आणि अंत्यसंस्कार
गृहांमध्ये समाधीस्थळे कशी बांधावीत याचे कडक
कायदे आहेत, सुरक्षितता आणि स्वच्छता सुनिश्चित
करण्यासाठी कठोर नियमांचे पालन केले जाते.

सुविचार :

सुविचार : जे नशिबावर भरवसा करतात ते कायर आहेत जे आपले नशिब स्वत: बनवतात ते मजबूत होत.

शिवजयंती मिरवणुकीत नथुराम गोडसे, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे फलक नगरमध्ये पोलिसांनी केला एकावर गुन्हा दाखल, इतरांचा कसून तपास सुरु

नगर – छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त अहिल्यानगर शहरात १९ फेब्रुवारीला सायंकाळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत राजकीय नेत्यांच्या समवेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे तसेच कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे फलक झळकवण्यात आल्याचे समोर आले आहे. यातील गँगस्टर बिश्नोईचा फलक झळकवणाऱ्या विरुद्ध कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून इतरांचा कसून शोध सुरु आहे.

ओंकार बाळासाहेब धारूरकर (रा. सोनार गल्ली, कर्जत) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. शिवजयंती निमित्त अहिल्यानगर शहरात १९ फेब्रुवारीला सायंकाळी डीजेच्या दणदणाटात ५ मंडळांनी मिरवणुका काढल्या होत्या. त्यातील पैलवान प्रतिष्ठान या मंडळाची मिरवणूक तख्ती दरवाजा येथे आली असता त्या मिरवणुकीत एका तरुणाने खंडणी व खुनाच्या गुन्ह्यातील कुख्यात गुन्हेगार लॉरेन्स बिश्नोई याचा फोटो असलेला फलक झळकावला. त्या फलकाच्या पाठीमागे जिहाद्यांचा बाप असा मजकूर असलेला मंत्री नितेश राणे यांचाही फलक होता. सदरची दृश्ये प्रसार माध्यमांच्या द्वारे प्रसारित झाली. सोशल मिडीयावर ती व्हायरल झाली. त्यानंतर कोतवाली पोलिसांनी सदर फलक झळकवणाऱ्याचा शोध घेतला असता तो ओंकार बाळासाहेब धारूरकर हा असल्याचे समोर आले.

त्यामुळे कोतवाली पोलिस ठाण्यातील गोपनीय शाखेतील सहाय्यक फौजदार राजेंद्र गर्गे यांनी २० फेब्रुवारीला रात्री उशिरा फिर्याद दिली. या फिर्यादीवरून ओंकार धारूरकर याच्या विरुद्ध कोणत्याही व्यक्तीच्या आकृती किंवा त्याचे प्रतिमाचे प्रदर्शन करण्यास मनाई करणारा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेला असतानाही त्या आदेशाचा भंग करत विनापरवानगी खंडणी व खुनाच्या गुन्ह्यातील  कुख्यात गुन्हेगार लॉरेन्स बिश्नोई याचे फलक झळकविल्या प्रकरणी भारतीय नागरी संहिता कलम २२३ सह मुंबई पोलीस अधिनियम ३७  (१) (ड) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान या मिरवणुकीत आणखी एका मंडळापुढे नाचताना एकाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे याचा फोटो असलेला फलक झळकविलेला व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झालेला असून पोलिस त्या व्यक्तीचा कसून शोध घेत आहेत.

गुन्हेगारांचे फोटो नाचवणारांना तात्काळ अटक करा

शिवजयंती मिरवणुकीत महात्मा गांधी यांचा खुनी देशद्रोही नथुराम गोडसे व कुख्यात गुन्हेगार लॉरेन्स बिश्नोई यांचे फोटो नाचणाऱ्या गुन्हेगारांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.

यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, छत्रपती शिवरायांचे राज्य हे रयतेचे राज्य होते. या राज्यामध्ये गुन्हेगारांचे हातपाय कलम केले जायचे, टकमक टोकावरून फेकून त्यांना देह दंडाची शिक्षा दिली जायची अथवा हत्तीच्या पायाखाली दिले जायचे. रयतेच्या हिताचे लोक कल्याणकारी राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केले. अशा या महान राजाच्या जयंती दिवशी शहरामध्ये महात्मा गांधी यांचा खून करणारा गोडसे व कुख्यात गुन्हेगार लॉरेन्स बिश्नोई याचे पोस्टर नाचवून त्यांचे उदात्तीकरण केले आहे.

खरे तर कोणत्याही गुन्हेगाराचे उदात्तीकरण करणे हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. कायदा व सुव्यवस्था व पोलिस यांना चॅलेंज करण्यासारखे आहे.तरी सदर बाब ही अत्यंत गंभीर असून अहिल्यानगर शहराची सांस्कृतिक वाटचाल आता गुन्हेगारांचे उदात्तिकरण करणारे शहर अशी होत आहे. या गंभीर घटनेची तात्काळ दखल घेऊन सदर गुन्हा करणारे आरोपी यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. अशी मागणी टिळक भोस यांनी केली आहे.

शहरातील चौका चौकामध्ये बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेराचा उपयोग का होत नाही

शहरासह उपनगरांमधील नागरिकांची सुरक्षितता आली धोयात; बंदोबस्त वाढवा : नागरिकांची निवेदनाद्वारे पोलिसांकडे मागणी

नगर – पोलीस असल्याची बतावणी करून लुटणारी टोळी
अहिल्यानगर सह सावेडी उपनगरात देखील सक्रिय असल्याने गेल्या
आठवड्यात आनंदधाम रस्त्यावर एका उद्योजकाला लुटले. दुसर्‍या
दिवशी टिळक रोडवर मोपेड वर चाललेल्या महिलेचे गंठण हिसकावले.
या घटना ताज्या असतानाच पाईपलाईन रोडवरील सूर्यकांत फर्निचर
जवळ सायंकाळी ६वा.सुमारास श्रीकृष्णनगर मधील दीपक आंबेकर या
वृद्धाला रस्त्यात अडवून आम्ही पोलिस आहोत. तुमच्या गळ्यातील चैन
व अंगठी द्या असे म्हणत लुटले उपनगरातील नागरिकांची सुरक्षितता
धोयात आहे. तोफखाना पोलिसांनी चौका चौकात पहाटे व सायंकाळी
बंदोबस्त वाढवावा. अशी मागणी माजी नगरसेवक निखिल वारे यांनी
केली आहे.
याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांची भेट घेऊन
निवेदन देण्यात आले. यावेळी संपूर्ण घटनेची माहिती दिली. यावेळी फिर्यादी दीपक आंबेकर उपस्थित
होते.
अधिक माहिती देताना श्री. वारे म्हणाले, दीपक आंबेकर ही
नेहमीप्रमाणे वॉकिंगला सायंकाळी ६ वा. चालले होते. पाईपलाईन
रोडवरील सूर्यकांत फर्निचर जवळ दोन अनोळखी व्यक्तींनी आंबेकर
यांना थांबविले. आम्ही पोलिस आहोत तुमच्या गळ्यातील चैन व
अंगठी काढून द्या असे म्हटले यावर श्री. आंबेकर यांनी तुम्ही पोलिस
आहात तर माझ्या गळ्यातील सोने का मागता असा प्रश्न करताच
एकाने पाठीमागून धक्का देत त्यांच्या गळ्यातील ३ तोळे वजनाची चैन
व ६ ग्रॅम वजनाची अंगठी काढून नेत काही वेळातच पोवारा केला.
आंबेकर यांनी आरडाओरडा केला. पण तोपर्यंत दोन्ही व्यक्ती पसार
झाल्या होत्या.
याप्रकरणी निखिल वारे यांनी चौका चौकात बसविलेल्या
सीसीटीव्ही कॅमेरा चा उपयोग का होत नाही असा प्रश्न केला. याबाबत
श्री.खैरे यांनी तोफखाना पोलीस स्टेशनचे निरीक्षक कोकरे यांना तातडीने या गुन्ह्याचा तपास करण्याचे
निर्देश दिले.