लाल भोपळ्याचे सुप

0
53

साहित्य – लाल भोपळा पाव किलो, 1 छोटा कांदा, 1 मोठा टोमॅटो, 1 मध्यम आकाराचे गाजर, 2 मोठ्या लसुण पाकळ्या, 1 छोटा चमचा जिरे, 1 छोटा चमचा धणे, 4 मिरे, साखर, मिठ (चवीप्रमाणे), 2 चमचे तुप / बटर, 5-6 कडीपत्त्याची पाने, 1 हिरवी मीरची, 4 कोथिंबीरीच्या काड्या (मुळं आणि पान काढुन, फक्त काड्या)

कृती – भोपळ्याची साले काढून घ्यावीत. भोपळा, टोमॅटो, गाजर, कांदा सगळ्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करुन घ्याव्या. लसुण सोलुन घ्यावा. एका खोलगट भांड्यात तुप घेउन तुप तापल्यावर त्यात कडिपत्ता आणि हिरवी मिरची टाकावी. नंतर कांदा आणि लसुण थोडा परतून घ्यावा. कच्चटपणा जाईल इतपतच. आता त्यात गाजर, टोमॅटो, लाल भोपळ्याच्या फोडी, कोथिंबीरीच्या काड्या, जिरे, धणे, मिरे, साखर, मिठ घालावे. हे सगळे बुडेल इतके पाणी घालावे. पाण्याला चांगली उकळी आली की गाजराच्या फोडिला टोचुन बघावे (गाजर जास्त कडक असल्याने). मऊ झाले असेल तर पाणी गाळून घेऊन बाकी सगळे मिश्रण मिक्सरमधून एकजीव करुन घ्यावे. बाजुला काढलेले पाणी व हे एकजीव केलेले मिश्रण एकत्र करुन एक उकळी आणावी. घट्ट वाटल्यास थोडे अजुन पाणी घालावे.