मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज- माणसाला किती दात असतात

0
62

प्रौढ माणसाला एकूण 32 दात असतात. वरील जबड्यात सोळा व खालच्या जबड्यात सोळा. यात निम्मे दात डाव्या बाजूला व निम्मे उजव्या बाजूला असतात. वरच्या व खालच्या जबड्यातील प्रत्येकी सोळा दातांमध्ये पटाशीचे चार दात, दोन सुळे, चार उपदाढा व सहा दाढा असे दात असतात. माणसाच्या बाबतीत खायचे व दाखवायचे दात वेगळे नसतात. मग भले एखाद्याला कोणी काहीही म्हणो! उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये माणसाच्या जबड्याचे हाड लहान होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शेवटी येणार्‍या दाढांसाठी (अक्कल दाढांसाठी) जबड्यात जागाच शिल्लक राहत नाही. त्यामुळे कधी कधी ह्या दाढा उगवतच नाहीत. कधी वेड्यावाकड्या येतात. त्या जर गालाच्या दिशेने उगवू लागल्या तर खूप त्रास होतो व त्या काढून टाकाव्या लागतात. कालांतराने सर्व मानवांना 28 दात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. थोडक्यात म्हणजे आधुनिक मानवाला अक्कलदाढांची गरज नाही. हे निसर्गाच्या ध्यानात आले असावे. अक्कलदाढा व अक्कल यांचा तसा अर्थाअर्थी काहीच संबंध नसल्याने घाबरून जाण्याचे कारण नाही!