एच. आय. व्ही. चा विषाणू हा पेशीतील प्रतिकारशक्तीवरच हल्ला करतो व ती निकामी करतो. यामुळे शरीराची संसर्गाला प्रतिकार करण्याची शक्ती कमी होत जाते. एच. आय. व्ही. ला वैद्यकीय परिभाषेत रिट्रोव्हायरस म्हणतात कारण तो स्वत:ची जनुकं पेशींच्या डि.एन.ए मध्ये सोडून देतो. यामुळे शरीरातील पेशी या एच. आय. व्ही. चे कारखाने बनतात व त्याचा दुहेरी परिणाम होतो. एकीकडे त्या शरीराचे संरक्षण करु शकत नाहीत आणि दुसरीकडे त्या अधिक विषाणुंचे कण निर्माण करुन इतर पेशींना संसर्गीत करतात. एच. आय. व्ही. चा विषाणू हा स्वत:मध्ये प्रचंड बदल घडवून आणू शकतो व शरीरातील लिम्फॅटीक सिस्टिममध्ये किंवा अन्य भागात लपतो व अशा ठिकाणी आपले बस्तान बसवतो की जिथे औषधे किंवा प्रतिकार करणार्या पेशी पोचू शकत नाहीत. एच. आय. व्ही. विषाणू हा विर्यातून, योनीस्त्रावातून, रक्तातून व स्तनपानातून संक्रमित होतो.
संक्रमणाचे प्रमुख मार्ग खालीलप्रमाणे असुरक्षित यौनसंबंध, दुषित रक्ताद्वारे, दुषित रक्त असलेल्या सुई, इंजेक्शन मधून संसर्गिक महिलेकडून बाळाला गर्भात असताना प्रसुति समयी किंवा स्तनपानाद्वारे लैगीक संबंधातून एच. आय. व्ही. संक्रमणाची शक्यता वाढते. ज्यावेळी व्यक्तीला गुप्तरोग असतात व तो त्यावर उपचार घेत नसतो. बलात्कारामुळे एच. आय. व्ही. च्या संक्रमणाची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. एच. आय. व्ही. संसर्गीत व्यक्तीकडून लैगींक संबंधातील त्यांच्या जोडीदाराला विषाणू संसर्गीत होण्याची शक्यता ही प्रतिपिंड निर्माण होण्याअगोदर जास्त असते. अशा व्यक्ती संसर्ग झाल्याच्या पुढील टप्प्यातही अधिक संसर्गीत बनतात. कारण शरीरातील प्रतिकारशक्ती ही विषाणुंच्या तुलनेत कमी पडते. एच. आय. व्ही. चा विषाणू सहजरित्या शरीराच्या बाहेर जगु शकत नाही. त्यामुळे स्वच्छतागृह वापरल्याने, आलिंगन दिल्याने, चुंबनाने किंवा हातात हात घेतल्याने, ताटवाटी किंवा पिण्याची भांडी वापरल्याने किंवा खोकल्याने पसरत नाही. डास चावल्याने ही एच. आय. व्ही. चा प्रसार होत नाही. एच. आय. व्ही. चे विषाणू जरी लाळेत आढळून आले असले तरी प्रदिर्घ चुंबनाने एच. आय. व्ही. संसर्ग झाल्याचा पुरावा नाही. तोंडामध्ये जखमा असल्यास मात्र संक्रमणाची भीती मुखमैथुनाच्या बाबतीत पूर्णपणे नाकारता येत नाही. लक्षणविरहीत प्रदिर्घ अवधी पण प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये रोगाच्या वाढीच आढावा घेता येतो. प्रतिकारशक्तीच्या अभावी संधीसाधू आजार. जे मृत्युचे मुख्य कारण आहेत. (उदा. क्षयरोग)