मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

हेलियम वायूचा उपयोग काय?

हेलियम याचा अर्थ सूर्यावरचा. हेलिऑस म्हणजे सूर्य. प्रथम हेलियम सूर्यावर असल्याचा
शोध लागल्यामुळे या वायूला हेलियम हे नाव पडले. हेलियम हा निष्क्रीय वायू आहे. तो चवरहित, गंधय्रंग-विहीन आहे. हायड्रोजन खालोखाल हलका असलेला वायू एका बाबतीत तरी हायड्रोजनच्या विरुद्ध गुणधर्माचा आहे. म्हणजे तो हायड्रोजनसारखा ज्वलनशील नाही. किंबहुना तो जळतच नाही. सूर्याचा वर्णपट बघत असताना इ. स. १८६८ मध्ये
सर जोझेफ नॉर्मन लॉकीयर व पियेर जान्सेन या दोन शास्त्रज्ञांना स्वतंत्रपणे या वायूचं अस्तित्व
जाणवलं. यानंतर पृथ्वीवर हा वायू अत्यल्प प्रमाणात असल्याचं शोधून काढण्यात आलं.

हा वायू हलका आहे, पण ज्वलनशील नाही. या गुणधर्माचा फायदा घेऊन निरनिराळ्या
आकार-प्रकाराची बलुन्स पाठविण्यासाठी या वायूचा उपयोग होतो. पाणबुडे सागरातून खूप खोलवरून
सागरपृष्ठाकडे येत असताना त्यांना ऑसिजन व हेलियमचे मिश्रण देण्यात येते, तर दमेकर्‍यांना त्रास
कमी व्हावा म्हणून हेलियम वायू हुंगवला जातो. याशिवाय अ‍ॅल्युमिनियमचे वेल्डिंग करणे, लेझर
निर्मिती आदी प्रक्रियांतून हेलियमचा वापर होतो. याशिवाय अतिशीत तापमानाच्या प्रयोगातही हेलियम
वापरला जातो

————————————————–

 

ठकास महाठक :

एका गावात एक व्यापारी राहत होता. व्यापारात त्याने बरीच कमाई केली होती. एकदा त्याच्या मनात आले, खूप धन कमावले, आता चारीधाम यात्रा करुन आल्यास तेवढेच पुण्य पदरी पडेल. असा विचार करुन आपल्याजवळ
असलेल्या माणसाकडे सोन्याच्या मोहोरा असलेली घागर सांभाळण्यासाठी देत म्हणाला, “मित्रा, मी काही दिवस यात्रेला निघालो आहे. चोरांचे भय असल्याने माझी ही सोन्याच्या मोहरा असलेली घागर तुझ्याकडे ठेव. मी लवकर परत येईन, तेव्हा
मला परत कर.” असे म्हणून तो यात्रेला गेला. काही दिवसांनी यात्रा करुन तो व्यापारी परत आपल्या गावी आला आणि मित्राकडे जाऊन आपली सोन्याच्या मोहोरा ठेवलेली घागर मागू लागला. तेव्हा तो लबाड मित्र म्हणाला,” अरे काय
सांगू मित्रा, “तू गेल्यापासून उंदरांनी मला नकोसे करुन सोडले बघ. त्या पलीकडच्या गावातील उंदरांनी येऊन तुझी सोन्याच्या मोहोरा असलेली घागर केव्हा खाऊन टाकली, याचा मला पत्तासुद्धा लागला नाही.” त्यावर व्यापारी म्हणाला,” मित्रा, असे जगावेगळे उंदीर आजपर्यंत मी कधी ऐकले वा पाहिले नव्हते. बरं, असू दे.” असे म्हणत तो आपल्या बिर्‍हाडी पोहोचला.

दुसर्‍या दिवशी त्याचा मित्र बोंब करत  त्याच्या घरी येऊन म्हणाला, ” अरे मित्रा, मी पुरता बरबाद झालो रे. माझा एकुलता एक मुलगा कोणी तरी पळवून नेला रे. आता मी काय करु? असे म्हणत तो रडू लागला. त्यावर व्यापारी
मित्र म्हणाला, ” अरे असे म्हणतोस? मग बरोबर. अरे आज सकाळीच एक ससाणा एका पोराला उचलून नेताना मी पाहिला बघ. मला तर वाटते, तो तुझाच मुलगा असणार.” त्यावर मित्र म्हणाला, ” हे काय भलतेच, एवढासा ससाणा
एवढ्या मोठ्या मुलाला उचलून नेणे कधी शय आहे काय? त्यावर व्यापारी म्हणाला,” अरे भाऊ,ज्या गावचे उंदीर सोन्याच्या मोहोरा खातात, त्याच गावचा ससाणा मुलाला उचलून नेतो, यात आश्चर्य ते कुठले? तेव्हा मित्र मनात काय समजायचे,
ते समजला. तो घरी गेला व मोहोरा भरलेली घागर घेऊन व्यापारी मित्राकडे आला आणि ती त्याला परत करताच व्यापारी मित्रानेही त्याचा पळवून आणलेला मुलगा परत केला.

तात्पर्य ः नाक दाबले की तोंड उघडते

 

आरोग्य

0

निरोगी शरीरासाठी फळे फायदेशीर

आपल्या धावपळीच्या आयुष्यात तुम्हाला रोजची कामे करण्यासाठी ताकद कमी पडू
लागते. तेव्हा अशा वेळेस फळे अतिशय महत्त्वाची ठरतात. तुम्ही कितीही पौष्टिक जेवण करा.
मात्र तुम्हाला फळांमधून जे पोषण मिळते ते इतर कशातूनच मिळू शकत नाही. सफरचंद, केळी,
द्राक्षं ही सुपरफूड म्हणून ओळखली जातात

दैनिक पंचांग शनिवार, दि. 25 नोव्हेंबर 2023

शके 1945 शोभननामसंवत्सर, कार्तिक शुक्लपक्ष, अश्‍विनी 14।56 सूर्योदय 06 वा. 28 मि. सूर्यास्त 06
वा. 22 मि.

राशिभविष्य-

मेष: आज आपणास कठोर श्रम करावे लागेल. काही निष्कारण चिंतांमुळे आपली व्यग्रता वाढेल. पळापळ देखील अधिक
राहील.

वृषभ : आजचा दिवस कालच्या दिवसापेक्षा चांगला नसेल. मित्रांमध्ये होणारे वाद आपल्या संबंधासाठी वाईट ठरतील.
आरोग्याची काळजी घ्या.

मिथुन: व्यस्त राहाल. कौटुंबिकविषयांमध्ये पैसा खर्च होईल. आई-वडीलांचीविशेष काळजी असेल. धनाचा व्यय होईल.
मागील बाकी व उधारी वसुल होईल.

कर्क : एखाद्या जीवलगाबरोबर भागीदारीसाठी वैयक्तिक पातळीवर संबंधवाढविण्याचा प्रयत्न करा. कार्यात अडचणी येण्याची शक्यता आहे.

सिंह : चांगले भोजन मिळेल. मौजमजेत दिवस व्यतीत होईल. मागील राहिलेले सरकारी काम पूर्ण होण्याचे योग आहेत. आरोग्याची काळजी घ्या. जुन्या मित्रांची भेट होईल. आपणास समाधानकारक स्थिती मिळेल.

कन्या:  काळजीपूर्वक कार्य करा.नोकरीत असलेल्या व्यक्तींनी कार्यात सहकार्यघेऊन चालावे. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल साहाय्याबरोबर सन्मान वाढेल.

तूळ: हातावर हात ठेवल्याने कोणतेही कार्य होत नाही. कोणत्याही कार्यात निष्काळजीपणे वागू नका. मागील साठविलेला
पैसा आज खर्च होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक :  शत्रू प्रभावहीन होतील. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेक्टची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा. वाहने व
यांत्रिक उपकरणे सावकाश चालवा. आरोग्याच्या दृष्टीने ही वेळ उत्तम आहे.

धनु : वेळ आनंदपूर्वक व्यतीत होईल.महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील. जुने मित्र भेटतील. मागील देणी फिटतील.

मकर : आजच्या दिवसाचा उपयोग नाती-संबंधात नवीन उर्जा भरण्यासाठी करा.आरोप-प्रत्यारोपांपासून दूर रहा.

कुंभ: भावनात्मक स्वभावाचे असल्यामुळे आपणास नुकसान होणे शक्य आहे म्हणून मनावर नियंत्रण ठेवा.

मीन : वडिलधार्‍यांचा आधार मिळाल्याने अडकलेली कार्य पूर्ण होईल. मागील उधारी उसनवारी वसूल होईल.

                                                                                   संकलक: ऍड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

दर्श अमावास्या, शके १९४५ शोभननाम
संवत्सर, कार्तिक कृष्णपक्ष, अनुराधा ११|५७
सूर्योदय ०६ वा. २२ मि. सूर्यास्त ०६
वा. ३२ मि.

राशिभविष्य

मेष : पैसा खर्च होईल. संतती बरोबर मतभेद किंवा त्यांच्या चिंतेत मन व्यग्र राहील. सामाजिक क्षेत्रात अपयश येणार नाही याकडे लक्ष द्या.

वृषभ : नवीन कामाची सुरूवात करण्याला अनुकूल दिवस. मित्रांबरोबर दिवस आनंदात घालवाल. मागील देणी वसुल होतील.

मिथुन : विद्यार्थ्यांना आज अभ्यासात रस वाटणार नाही. शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकाल. आध्यात्मिकतेतून शांती मिळेल.

कर्क : मित्र आणि कुटुंबीय यांच्याबरोबर आनंदात दिवस घालवाल. प्रवास, सहली यातूनही आज आनंद मिळवू शकता.

सिंह : आध्यात्मिकतेच्या मदतीने विचारातील नकारात्मकता दूर करा. मनाच्या एकाग्रतेमुळे सर्व कामात फायदा होईल.

कन्या : स्वकीयांचा वियोग घडू शकतो. कुटुंबातील लोकांशी मतभेद संभवतात. मिळणार्‍या फायद्यात नुकसान होईल.

तूळ : देण्या-घेण्याचे निर्णय विचारपूर्वक घ्या. अपघात व गैरसमज यापासून दूरच राहा. वाहने सावकाश चालवावीत.

वृश्चिक : शारीरिकस्वास्थ्य बिघडू शकते. विनाकारण खर्च होईल. मागील उधारी उसनवारी वसुल होईल.

धनु : आज अध्यात्माकडे कल राहिल. जुने मित्र व नातेवाईक यांच्या सहवासामुळे दिवस आनंदात व्यतीत होईल. तब्येत सांभाळा.

मकर : उतावीळ स्वभावावर नियंत्रण ठेवून कार्ये शांततेत केल्यास आजचा दिवस हा यशदायी ठरेल. उधारी वसुल होईल.

कुंभ : हितशत्रुंपासून पिडा संभवते. संततीसौख्य लाभेल. कोर्ट-कचेरी आदी गोष्टींपासून लांब रहा.

मीन : आर्थिक व्यवहार करताना अनोळखी व्यतीवर विश्वास ठेवू नका. मागील देणी वसुल होतील.

                                                                                    संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

बढाई अंगाशी आली

एका गावातील एक माणूस बरीच वर्षे प्रवासाला गेला होता. अनेक ठिकाणी प्रवास करून तो आपल्या गावी परतला. आपण प्रवासात किती गमती-जमती, किती मौज-मजा पाहिल्या, ते तिखट-मीठ लावून तो आपल्या शेजारी लोकांना, भेटे त्याला सांगू लागला. एकदा तर त्याने एक लोणकढी थाप ठोकून दिली. म्हणाला, ‘‘मी करणावतीला गेलो असता तेथील माणसे चांगली पंधरा-सोळा हात उंच उड्या मारीत असलेली पाहून मला मोठे नवल वाटले. मग त्यांनी अशी उंच उडी मारण्याची पैज माझ्याशीच लावली. तेव्हा मी इतकी उंच उडी मारली की, त्यांच्यापैकी कोणालाही माझी बरोबरी करता आली नाही.’’ ऐकणारी माणसे मनात म्हणत, काय थापाड्या आहे! उघडपणे कोणीही त्याचे म्हणणे मान्य करीत नसे; म्हणून तो वेगवेगळ्या शपथा घेऊन लोकांची खात्री पटवायचा प्रयत्न करीत असे. एकदा असाच तो अशी थाप जमलेल्या लोकांसमोर मारू लागला असता घोळक्यातील एक माणूस उठला आणि म्हणाला, ‘‘अरे, अशा शपथा कशाला घेतोस? त्यापेक्षा तशीच उडी येथे मारून दाखव ना!’’ हे ऐकताच तो बढाईखोर माणूस गप्प बसला आणि त्याने तेथून काढता पाय घेतला.

तात्पर्य – आपण पाहिलेल्या काही घटना फुगवून सांगण्याची काही लोकांना सवय असते; पण कधी-कधी त्यांची फजितीही होते.

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज – चव कशी समजते?

एखादा पदार्थ जिभेवर ठेवला रे ठेवला की तात्काळ त्याची चव आपल्याला समजते. पण आपण ज्याला चव म्हणतो त्यात चवीची जाणीव मेंदूपर्यंत पोहोचवणार्‍या स्वादांकुरात उष्णता, स्पर्श व वासाचे ज्ञान या सर्वांचा समावेश होतो. क्लोरोफॉर्मचा गोडसर वास हा प्रामुख्याने स्वादांकुर उत्तेजित झाल्यामुळेच येतो. सर्दी झाल्यावर अन्न बेचव लागते. वासाचे ज्ञान होत नसल्यामुळेच नाक दाबल्यास उकडलेला कांदा व सफरचंद यांची चव जवळपास सारखीच लागते. चवीमध्ये आपल्याला जाणवणारे सूक्ष्म फरक हे बर्‍याचदा या गोष्टींच्या वेगळ्या अशा वासामुळे असतात. अशी ही चव आपल्याला मुख्यतः जिभेवरील स्वादांकुरामुळे कळते. माणसाच्या जिभेवर सुमारे १०,००० स्वादांकुर असतात. गोड, आंबट, खारट व कडू या चाल मूळ चवी आहेत. जिभेच्या टोकाला गोड चव, पाठीमागे कडू, तर दोन्ही कडांना आंबट चव जास्त प्रमाणात जाणवते. खारट चव सर्व ठिकाणी समप्रमाणात, पण जिभेच्या टोकाला सर्वाधिक जाणवते. चव कळण्यासाठी पदार्थ लाळेत विरघळावा लागतो. विरघळलेले रेणू स्वादांकुरात शिरल्यावरच चव समजते. काच, स्टेनलेस स्टील, चांदी, सोने यांची चव ते विरघळत नसल्याने आपणास कळत नाही ते त्यामुळेच! तसेच ‘तिखट’ ही चव नाही! तर तिखट वस्तूंमधील आम्लामुळे होणारा तो एक ‘दाह’ म्हणता येईल. चवीच्या संदेशाचे वहन स्वादांकुरातून चेतातंतूंमार्फत मेंदूतील चवीच्या केंद्रापर्यंत होते तेव्हा चव समजते.

उपवर मुलीसाठी

उपवर मुलीने घरात नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून जेवण करावे.

दुकानात कॅश काऊंटर आग्नेय भागात असावे.

दुकानात मालकाने उत्तरेकडे तोंड करून बसावे.

निर्मळ चेहरा

दिवसातून किमान तीन वेळी लिंबू-पाणी प्या. काही आठवड्यातच चेहरा निर्मळ होऊन चमकू लागेल.

मसाल्याचा ब्रेड

साहित्य – लसूण-खोबर्‍याची चटणी, ४ उकडलेले बटाटे, मीठ, १ चमचा लाल तिखट, कोथिंबीर, १/२ चमचा जिरेपूड, हिरवी कोथिंबीर-पुदिना चटणी १/२ वाटी, ब्रेडच्या ६/७ स्लाईस, २ वाट्या डाळीचे पीठ, हळद, १/२ चमचा तिखट, हिंग पाव चमचा, तळण्यासाठी तेल.

कृती – ब्रेडच्या एका स्लाईसला लसूण-खोबर्‍याची चटणी लावावी. बटाटे सोलून कुस्करावेत. त्यामध्ये मीठ, लाल तिखट, जिरेपूड व कोथिंबीर घालावी व सर्व मिश्रण नीट कालवून घ्यावे. डाळीच्या पिठात हिंग, हळद, मीठ, तिखट घालून पाण्याने भज्यासारखे सरसरीत पीठ भिजवावे. ब्रेडच्या चटणी लावलेल्या स्लाईसवर बटाट्याचे मिश्रण पसरून घ्यावे. दुसर्‍या स्लाईसला हिरवी चटणी लावून चटणी लावलेली बाजू बटाट्याच्या सारणावर येईल अशी ठेवून किंचित दाबून घ्यावी.

रोज मनुका खाण्याचे फायदे

मनुका खाल्ल्याने ब्लड सर्कुलेशन इम्प्रुव्ह होते. यामुळे त्वचेची रंगत वाढते आणि रंग देखील निखरण्यास मदत होते. मनुकांमध्ये फायबर्स असतात. हे डायजेशन योग्य ठेवण्यास मदत करतात. यात पोटॅशियमची मात्रा जास्त असते. हे ऍनीमिया (रक्ताची कमतरता) दूर करण्यास फायदेशीर ठरतात.