लपलेले हरीण

लपलेले हरीण

एका हरणामागे पारध्याची कुत्री लागली असता जीव वाचवण्यासाठी ते हरिण                                        धावतय्धावत शेतातील गुरांच्या गोठ्यात शिरले आणि एका गवताच्या गंजीत लपून बसले. ते पाहून
गोठ्यातला बैल हरणाला म्हणाला, “अरे मित्रा, जीव वाचविण्यासाठी जेथे तू लपला आहेस, तेथेच
तुझा जीव मात्र लवकर जाईल.” तेव्हा हरिण म्हणाले, “मित्रांनो, तुम्ही जर मला गप्प बसून
सहकार्य केले, तर मला येथे फारशी भीती नाही. संकट दूर होताच मी येथून पळून जाईन.”
अशा प्रकारे रात्र होईपर्यंत ते हरिण गंजीतच लपून बसले. रात्र पडू लागताच गुराखी पेंढ्या
घेऊन आला आणि बैलांना खायला देऊन गेला. त्याला ते हरिण दिसले नाही. थोड्या वेळातच
मालकाची मोठी मुले तेथे येऊन गेली. त्यांनाही हरिण दिसले नाही.

आपल्याला कोणी पाहिले नाही याचा आनंद होऊन हरिण बैलाला म्हणाले, ” बैलदादा, तुमच्या
कृपेमुळेच आज मी वाचलो. तुमचे माझ्यावर फार उपकार झालेत. तेव्हा बैल म्हणाला, “अरे, या
लवकर, धावा धावा.” मालकाचे ओरडणे ऐकून त्याचे नोकर हातात लाठ्या काठ्या घेऊन तेथे
धावले, आणि गंजीआड लपलेले हरिण त्यांनी त्याला काठ्यांनी झोडपून ठार केले.

तात्पर्य: जे ठिकाण सुरक्षित नाही, अशा ठिकाणी एक-दोनदा जिवावरचे संकट टळले,
तरी तेथे कायमच सुरक्षितता लाभेल, असे समजूनये.

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

गालफुगी कशामुळे होते?

तुमच्या एखाद्या मित्राचा वा तुमचा गाल अचानक सुजला असेल. शाळेत यायची तुम्हाला लाजही वाटली असेल, कारण हनुमानासारखे गाल फुगलेले असतील. याला गालफुगी असे म्हणतात; पण ती का होते ते आपण पाहू.
गालफुगी अर्थात मम्प्स हा एक रोग असून तो मिझो या विषाणूमुळे होतो. हा विषाणू लाळ तयार करणार्‍या गालातील ग्रंथीवर आक्रमण करतो. मज्जासंस्थेवरही आक्रमण करू शकतो. यात गालावर सूज, तोंड उघडायला त्रास, वेदना, कानात दुखणे, ताप अशी लक्षणे बघावयास मिळतात. हा रोग ५ ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये होतो. तसा हा रोग आपोआप ८-१० दिवसांत बरा होतो. त्यामुळे तापासारख्या लक्षणासाठी औषध देता येते.
या विषाणूंना मारण्यासाठी विशिष्ट औषध नाही.या आजारात फारशा गंभीर गुंतागुंती होत नाहीत,
त्यामुळे काळजी करण्याचे कारण नसते. हा रोग होऊ नये, यासाठी एक ते दीड वर्षांच्या मुलांना
प्रतिबंधक लस देता येते.
गालफुगी हा एक सौम्य प्रकारचा विषाणूजन्य रोग आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही.
तो आपोआप बरा होतो. गालफुगी झालेल्या मुलामुळे दुसर्‍यांना संसर्ग होऊ नये व गुंतागुंती होऊ नयेत
म्हणून मुलाला शाळेत न पाठवणेच योग्य. श्वासांद्वारे हा रोग पसरतो. गाल सुजण्याआधी ४ ते ६ दिवस
व नंतर आठ दिवस रुग्णापासून हा रोग दुसर्‍याला होऊ शकतो.

सुविचार

जेव्हा मनुष्याजवळचा पैसा संपतो; तेव्हा त्याच्याजवळची थोडीशी पुंजी संपते; जेव्हा त्याची प्रतिष्ठा नाहीशी होते; तेव्हा
त्यापेक्षा अधिक पुंजी संपते; पण जेव्हा मनुष्य स्वतःची हिंमत घालवून बसतो; तेव्हा त्याचे सर्वस्व नष्ट होते. – जॉन रस्किन.

तिखट शंकरपाळे

0

तिखट शंकरपाळे

साहित्य : २ वाट्या गव्हाचे पीठ, दीड
चमचा साखर, थोडी हळद, अर्धा चमचा मीठ,
पाव चमचा जिरे, तेल.
कृती : गव्हाच्या पिठात तिखट, मीठ,
हळद, जिरे एकत्र करून पाणी घालून घट्ट पीठ
भिजवावे. गोळे करून पातळ पोळी लाटून
कातणीने बारीक शंकरपाळ्या कापाव्यात व
मंद गॅसवर तेलात लाल रंगावर तळाव्यात

आरोग्य

0

केसांच्या आरोग्यासाठी

मेथ्यांचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून, सकाळी ते कुटून त्याची पेस्ट बनवावी. आंघोळीपूर्वी
तासभर ती पेस्ट केसांच्या मुळाशी लावून कोमट पाण्याने आंघोळ करावी आणि भरपूर पाण्याने
केस स्वच्छ धुवावेत. यामुळे केस गळण्याचे कमी होते आणि केसातील कोंडा दूर होतो.

दैनिक पंचांग मंगळवार , दि. २८ नोव्हेंबर २०२३

शके १९४५ शोभननामसंवत्सर, कार्तिक शुलपक्ष, रोहिणी १३|३१
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६ वा. १६ मि.

राशिभविष्य

मेष : आज आपणास अनुकूल वार्ता मिळतील. आरोग्य चांगले राहील. आपले धाडस
वाढेल. आरोग्य उत्तम राहील. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल. व्यापार व्यवसायात
सावधगिरी बाळगा.

वृषभ : कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील आणि मित्रांकडून पाठबळ मिळेल.
आपली प्रसिद्धी वाढण्याची शयता आहे. इच्छित कार्य थोड्या उशीरा होतील.

मिथुन : कौटुंबिक विषयांमध्ये आपणास समर्थन मिळेल पण एखाद्याला जामीन देणे
टाळा. कामात पूर्ण समर्पणभाव ठेवा. अनपेक्षित खर्च होण्याची शयता.

कर्क : शत्रूंना मात द्याल. अनेक संघर्ष आणि विघ्नांना पार पाडल्यानंतर आज
आपणास यश मिळेल. नवीन कामे, योजना लाभदायक ठरतील.

सिंह : व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. आर्थिक विषयांसाठी स्थिती
अनुकूल आहे. धनाच्या रुपात यश मिळवा. अडकलेली कामे आपल्या प्रयत्नांमुळे पूर्ण
होतील. शेअर्समध्ये गुंतवणुक करु नका.

कन्या : आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवा. व्यवसायात प्रगती कराल. स्थिती
अनुकूल राहील. आपण ठरावीक वेळेत काम पूर्ण कराल.

तूळ : आरोग्य उत्तम राहील. महत्वपूर्ण कार्यात यश मिळेल.अत्यंत परिश्रम केल्यानंतर
थोडे यश मिळेल. आरोग्य मध्यम राहील. महत्त्वाच्या कामांमध्ये आपणास घऱच्यांचा
पाठींबा मिळेल.

वृश्चिक : वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा. वाहने काळजीपूर्वक चालवा.
भावनाशील असल्यामुळे नुकसान होणे शय आहे. अडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील.
आपली कामे धाडसाने करा.

धनु : मनावर नियंत्रण ठेवा. एखाद्या विशिष्ट योजनेला हातावेगळे करण्यात बराच
वेळ जाईल. आपल्या सर्जनशील व कलात्मक वैशिष्ट्यांना प्रेरणा मिळेल. कामात काही विघ्न
येऊ शकतात.

मकर : कार्यक्षेत्रात वेगाने कार्य करा पण घाई करू नका. बेपर्वाईने कार्य करू नका.
कुटुंबियांबरोबर वार्तालाप केल्याने एकमेकांच्या गरजा समजण्यात मदत मिळेल. मागील उधारी
उसनवारी वसुल होईल.

कुंभ :  वेळ अनुकूल आहे. कामांमध्ये प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. व्यापारय्व्यवसायात स्थिती सुखद राहील.
राहते घर व जमिनीसंबंधीच्या कामात स्थिती अनुकूल राहील.

मीन : आपल्या इच्छेवर आणि मनस्थितीवर संयम ठेवा. कौटुंबिक समस्या निर्माण होण्याची शयता आहे.
व्यापारात वेळ मध्यम राहील. शत्रू पराभूत होतील. दृष्टीकोनात बदल केल्याने निश्चितच यश मिळेल.

                                                                                      संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

अर्थजगत

शेअर बाजारात गुंतवणूक करुन करोडपती व्हायचे असेल आणि चांगला पैसा उभा करायचा असेल तर काही
चुकीच्या गोष्टी सोडून देणे गरजेचे आहे. आजघडीला अनेक गुंतवणूकदार शेअर बाजारात गुंतवलेला पैसा
चुकीच्या विचारांमुळे, सवयीमुळे गमावत आहेत. अमेरिकेचे दिग्गज गुंतवणूकदार बेंजामिन ग्राहम म्हणतात,
‘कोणत्याही गुंतवणूकदारांचा सर्वात मोठा शत्रू तो स्वत:च असू शकतो.” याचा अर्थ गुंतवणूकदारांकडून
होणार्‍या चुकांमुळेच त्यांचे नुकसान होते. कोणत्या प्रकारच्या असतात या चुका.. आवर्जून वाचा !

बाजारातील तज्ञांना ही बाब आता चांगलीच लक्षात आली आहे. बेंजामिन ग्राहम म्हणतात,
मनुष्यप्राणी हा खूप भावनिक व्यक्तिमत्त्वाचा आहे. त्यामुळे त्याचे निर्णय नेहमीच तार्किक पातळीवर
होतात असे नाही. यात अनेकदा पूर्वग्रह देखील असतात. परिणामी या निर्णयाचाही फटका बसतो. शेअर बाजारात
यशस्वी होण्यासाठी चुकीचे विचार, सवयी वेळीच दुरुस्त करणे गरजेचे आहे. म्हणून गुंतवणूकदारांनी
नुकसानकारक ठरणार्‍या नऊ गोष्टी टाळायला हव्यात.त्या पाहुया.

 भावनिक होऊन निर्णय नको: भावनेच्याभरात घेतलेल्या निर्णयाचे परिणाम चांगले हाती पडत
नाहीत. यापासून वाचण्यासाठी आपण एखादा निर्णयघेण्यापूर्वी त्याची पूर्णपणे तपासणी करायला हवी. त्याचा
अभ्यास करावा आणि या अभ्यासावर विश्वासही ठेवायला हवा. गुंतवणुकीबाबत टप्प्याटप्प्याने वाटचाल
करण्याची रणनिती आखा. त्यामुळे भावनेच्या भरात वाहून जाण्याला आळा बसेल आणि आपण
तार्किक निर्णय घेऊ. भावनेच्या भरात घेतलेल्या निर्णयाने नुकसान कसे होते, ते जर पाहयचे असेल तर
२००८ च्या आर्थिक संकटाचे उदाहरण घ्यावे लागेल. २००८ च्या आर्थिक संकटाचा नुकताच अभ्यास
करण्यात आला आणि त्यात आर्थिक विश्लेषक हे अनेक वर्षांपासून एका वास्तवतेकडे दुर्लक्ष करत
असल्याचे आढळून आले. अमेरिकी कंपन्यांचे प्रत्यक्षातील उत्पन्न आणि त्यांच्या उत्पन्नाचा अंदाज
यात बरेच अंतर होते. जेव्हा मंदी आली तेव्हा सर्व क्षेत्रााला त्याचा फटका बसला. या धयामुळे विश्लेषक
खडबडून जागे झाले आणि त्यांनी उत्पन्नाचा अंदाज कमी केला. प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही. या
विश्लेषकांनी तत्कालिन काळात मंदी येण्यापूर्वी कंपन्यांशी चर्चा केली होती आणि तेव्हा त्यांनी जगात
कितीही मोठी मंदी आली तर व्यवसायावर काहीही परिणाम होणार नाही, असे छातीठोकपणे सांगितले
होते. साहजिकच या आत्मविश्वासाच्या बळावर तज्ञांनी कंपन्यांच्या अंदाजित उत्पन्नात वाढ केली. पण मंदी
आली आणि सर्व जण गाळात गेले. त्यांनी तार्किक पातळीवर राहून विचार केला असता, निर्णय घेतला
असता तर त्यांचे आणि गुंतवणूकदारांचे नुकसान कमी राहिले असते.


 खरेदीनंतर पडताळून पाहण्याची सवय सोडा: बहुतांश मंडळी निर्णय अगोदर घेतात आणि
त्यानंतर या निर्णयाची पाठराखण करण्यासाठी लोकांकडून पडताळणी करून घेतात. मनासारखे मत
आल्यास ते समाधानी राहतात, मात्र एखादा विरुद्ध बोलला तर त्याची हेटाळणी करतात. उदा. आपण एसवायझेड
शेअर खरेदी केली असेल आणि त्यावर मित्रमंडळीकडून मत जाणून घेतले तर सर्वांचा अभिप्राय सारखाच येईल असे
नाही. एखाद्याने हा शेअर जोखमीचा असल्याचे सांगितले तर आपण त्याकडे कानाडोळा करतो. अशावेळी
नुकसानीची शयता राहते. म्हणून कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा किंवा अभ्यास करावा. नंतर
पडताळणी करण्याची सवय सोडून द्या.

 शेअरला चिटकून राहू नका: बहुतांश गुंतवणूकदार खराब कामगिरी करणार्‍या शेअरची विक्री करत
नाहीत. याशिवाय एखाद्या शेअरने चांगली कामगिरी केलीअसेल आणि दुसर्‍यावर्षी सामान्य कामगिरी करत असेल
तरीही त्याला विकण्याचा विचार करत नाहीत. पण त्याला चिटकून राहिल्याने त्याचा
परतावा कमी राहतो. म्हणून पोर्टफोलिओतील शेअरचासातत्याने आढावा घ्यायला हवा.

 ‘अँकरिंग बायस’ पासून वाचा: एखाद्या गुंतवणूकदाराला कोणत्याही मुद्यावर माहिती मिळाली तर ती खरी असल्याचे गृहित धरत त्याचआधारावर निर्णय घेतले जातात. त्यास अ‍ॅकरिंग बायस असे म्हणतात. यासाठीएक उदाहरण पाहू. यस बँकेचा शेअर आता सर्वोच्च पातळीपासून ९० टक्के घसरलेला आहे.अर्थात जेव्हा हा कोसळत होता, तेव्हा त्याची कोणीही
विक्री केली नाही आणि ते त्यात राहिले. यामागचे कारण म्हणजे अ‍ॅकरिंग बायस. म्हणजे कालांतराने शेअर पुन्हा
उसळी घेईल, असे सांगण्यात आले होते. परिणामी आजपर्यंत त्याला चिटकून बसले आहेत

 फाजील आत्मविश्वास नको: गुंतवणूकदार कधी कधी फाजील आत्मविश्वासाला बळी पडतात. आपल्याला बाजाराचे आकलन झाले आहे, असे गृहित धरत असतात. बुल रॅलीच्या वेळी असा अनुभव येऊ शकतो. कारण त्यावेळी सर्वच शेअर वरच्या पातळीवर सक्रिय असतात आणि आपण कोणताही शेअर खरेदी केला तर तो वरच्या पातळीवर जात असतो. अशावेळी गुंतवणूकदारांत फाजील आत्मविश्वास बळावतो. त्यामुळे लवकर पैसा मिळवण्याच्या नादात जोखमीचे शेअर खरेदी करतात. बाजार कोसळतो, तेव्हा ही खरेदी नुकसानकारक ठरते.

 झुंडगिरीला फॉलो करु नये: एखाद्या शेअरमध्ये सर्वजण पैसा टाकत असतील तर आपणही
त्यात उडी मारू, असा जर विचार करत असाल तर तो चुकीचा आहे. झुंडला फॉलो करू नये. या स्थितीमुळे
बाजारात फुगवटा येतो आणि जेव्हा हा फुगा फुटतो तेव्हा सर्वांचे खिसे रिकामे होतात. त्यामुळे आपण स्वत:ची
गुंतवणूक रणनिती आखावी.

 नेहमीच स्टॉप लॉस लावावा: कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करताना स्टॉप लॉस लावणे गरजेचे आहे. आताच आपण यस बँकेचे उदाहरण पाहिले. कोणता शेअर किती घसरेल आणि किती दिवस तो वरची पातळी गाठणार नाही, ही गोष्ट कोणालाही ठाऊक नसते. त्यामुळेस्टॉप लॉस लावावे आणि नुकसान किमान पातळीवर आणावे.

 कर्ज काढून गुंतवणूक नको:  अनेक जण मित्र किंवा बँकेकडून कर्ज घेऊन शेअर बाजारात पैसे टाकतात.
परंतु ही सवय चुकीची आहे आणि धोकादायक आहे. पैसे बुडाले तर आपले कुटुंब देखील अडचणीत येऊ शकते.
त्यामुळे या सवयीपासून चार हात लांब राहा

सुविचार

प्रत्येक मनुष्याला स्तुती इतकी प्रिय असते की, त्याच्या सर्व कार्याची मूळ प्रेरणा तीच बनते.

आरोग्य

0

बहुपयोगी जांभूळ


शरीराला जखम झाल्यास वा खरचटल्यास जांभळाची पाने लावावीत. त्यामुळे रक्त थांबते.
दातातून रक्त येत असल्यास जांभळाची सालं बारीक करून त्यांचे मंजन करावे आणि दातांना
लावावे. त्यामुळे दात दुखीला उतारा मिळतो. हाता-पायांची जळजळ होत असल्यास पिकलेल्या
जांभलाचा रस लावावा. नक्की फरक पडतो.

पिठी साखरेचे चिरोटे

पिठी साखरेचे चिरोटे

साहित्य – अर्धा किलो मैदा, चवीपुरते  मीठ, अर्धी वाटी डालडा, पाणी, अर्धा लिटर
दूध, तळण्यासाठी तेल, पाव वाटी तांदळाची पिठी, बेकिंग पावडर, पिठी साखर अर्धी
वाटी.
कृति – प्रथम मैदा चाळून घ्यावा. त्यात डालडा गरम करून पाव वाटी घालावे. पाव
चमचा बेकिंग पावडर, मीठ घालून दूध घालावे व चपातीच्या कणकेप्रमाणे भिजवावे.
नंतर एका ताटात उरलेला डालडा व तांदळाची पिठी फेसून ठेवावी नंतर मैद्याच्या छोट्या छोट्या
गोळा करणे व लाटणे व प्रत्येक चपातीला तांदळाची फेसलेली पिठी लावून एकावर एक
ठेवणे व वळकटी करणे व गोलगोल काप करावेत व ते गोल काप अलगदपणे लाटावेत.
नंतर तेलात चिरोटे तळून घ्यावेत. गरम असतानाच त्यावर पिठीसाखर पेरावी