0

जेवणाच्या आधी गोड का खाऊ नये ?

जेवण घेताना आधी गोड खाऊ नये, असे सांगितले जाते. ते बरोबर आहे. सुरुवात
नेहमी मसालेदार पदार्थाने करावी आणि शेवट गोड खाऊन करावा. त्याचे अनेक फायदे आहेत.
जेवण घेताना आपल्या जेवणात गोड पदार्थ हटकून असतात, मात्र काही वेळा आपण प्रथम गोड
पदार्थ खाण्यावर भर देतो. तो चुकीचा आहे.

सल्ला

0

कच्च्या बटाट्याची चिप्स करताना
तळण्यापूर्वी थोडा वेळ तुरटीच्या पाण्यात
टाकावीत. चिप्स एकदम कुरकुरीत व पांढरेशुभ्र
बनतील.

संकलक : ॲड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

वास्तू

0

वास्तू

घराची उत्तर दिशा खुली असावी. दारे
व खिडक्या या उत्तर पूर्व दिशेला असल्यास
उत्तम. दक्षिण दिशा ही बंद असावी.

बटाट्याचे शंकरपाळे

0

बटाट्याचे शंकरपाळे

साहित्य – २ वाट्या उकडलेल्या
बटाट्याचा लगदा, सव्वा वाटी मैदा, १ टी
स्पून लाल तिखट, १ टी स्पून जिरेपूड, पाव
टी स्पून हळद, तीळ भाजून गार केलेले पाव
वाटी, चवीप्रमाणे मीठ, तळण्यासाठी तेल.

कृती – बटाटे उकडून किसावेत व
मळून घ्यावे. अर्धी वाटी पाणी गरम करून
त्यात हळद, मीठ, तीळ, जिरेपूड, तिखट
घालून उकळावे. पाण्यातच दोन टी स्पून तेल
घालावे. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर
त्यात बटाट्याचा लगदा मिस करावा व
परातीत ओतून मिश्रण थोडे गार करून त्यात
मैदा मिस करावा व घट्टसर गोळा करून
पोळपाटाला तेलाचा हात लावून पिठाची
पोळी लाटून कातण्याने शंकरपाळीचे आकार
कापावेत व तेलात खुसखुशीत तळावेत.
भाजीत घातलेल्या मसाल्यामुळे भाजीला
वेगळीच सुंदर चव येते.

आकर्षक त्वचेसाठी

सौंदर्य


* एका कुस्करलेल्या केळामध्ये २ चमचे
मध व्यवस्थित मिस करा. हे मिश्रण त्वचेवर
लावून २० मिनिटे ठेवा. या पॅकचा वापर त्वचेत
तुकतुकी आणून त्वचा आकर्षक करण्यासाठी
होतो. चेहर्‍याच्या सुंदरतेसाठी मुलतानी
मातीचाही वापर करता येतो.

* मुलतानी मातीत थोडासा पुदिन्याचा
रस मिसळून लावल्यास चेहर्‍यावरील
काळवंडलेपणा नाहीसा होतो.

दैनिक पंचांग बुधवार, दि. २९ नोव्हेंबर २०२३

राशिभविष्य

शके १९४५ शोभननामसंवत्सर,कार्तिक कृष्णपक्ष, मृग १३|५९
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६ वा. १६ मि.

मेष: आपणास प्रोत्साहित करणारे घटक जाणून घ्या. भीती, चिंता, शंका, राग, लोभ असे नकारात्मक दृष्टीकोन तुम्हाला सोडावे लागतील. कारण हेच घटक विरोधी मतांना आकर्षून घेण्याचे काम करतात.

वृषभ: तुमचे जीवन बदलण्यासाठी पत्नी मदत करील. स्वत:च्या प्रयत्नाने तुम्ही तुमचेजीवन फॅशनेबल करू शकाल आणि इतरांवर अवलंबून राहण्याऐवजी किंवा दोष देण्याऐवजी स्वत: काम कराल.

मिथुन : . प्रेम हे नेहमीच चैतन्य देणारे असते आणि आज तुम्हाला याचा अनुभव मिळणार आहे. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल.

कर्क : दुसर्‍यांवर प्रभाव पडावा म्हणून मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका. दुसर्‍यांना मदत करण्याची तुमची ताकद, सकारात्मक विचारांनी सुधारा.

सिंह : आजच्या दिवशी आपल्या खर्चावर नियंत्रण मिळवा, चैनीसाठी पैशांची उधळपट्टी होणार नाही याची काळजी घ्या.
तरुणाईचा सहभाग असणार्‍या उपक्रमात स्वत:ला गुंतविण्यासाठी चांगली वेळ आहे.

कन्या :  तुम्ही तुमच्या प्रिय पत्नीशी पूर्वी झालेल्या मतभेदांबद्दल तिला माफ कराल तर
तुमचे जीवन सुकर होईल.

तूळ : मित्र तुमच्या खुल्या मनाची आणि सहनशक्तीची परीक्षा पाहतील. पण तत्त्वांना शरण न जाता, विवेकी निर्णय घेण्याची
खबरदारी घ्या. शंकास्पद आर्थिक व्यवहारांमध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी घ्या.

वृश्चिक : आपण जर पुरेशी विश्रांती घेत नसाल तर आपणास प्रचंड दमल्यासारखे होईल, आणि अधिक विश्रांती घ्यावी लागेल. व्यवसाय-धंद्यात उधार मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा.

धनु :  कुटुंबिय अथवा मित्रांबरोबरील स्नेहमेळाव्यामुळे आजचा दिवस एकदम उत्तम आणि छान जाईल. आनंदासाठी नव्या
नातेसंबंधाकडे पाहावे लागेल. आज तुम्हाला लोकांमध्ये मिसळण्यासाठी वेळ काढता येईल.

मकर:  इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल. आर्थिक प्रश्नांमुळे रचनात्मक विचार करण्याची आपली ताकद नष्ट होईल. प्रियजनांशी बोलताना वादग्रस्त विषय टाळा.
कुंभ : आजच्या दिवशी प्रेमात पडल्यामुळे एखाद्या पवित्र घटनेचा अनादर ठरु शकतो,त्यामुळे काळजी घ्या. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. आज तुम्ही एकदम शांततेत राहाल आणि मौजमजा
करण्याचा तुमचा मूड बनेल.

मीन : आर्थिक प्रश्नांमुळे रचनात्मक विचार करण्याची आपली ताकद नष्ट होईल.अतिखर्च, उधळेपणा आणि शंकास्पद
आर्थिक योजनांमध्ये गुंतणे टाळा. वाहने जपून चालवाल.

                                                                                   संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

 

अस्वाथीने बनवलं अनोखं पेन..!

पार्किन्सन झालेल्या रुग्णांचा हात थरथरतो. अशा रुग्णांना पेन हातात धरून
नीट लिहिताही येत नाही. यावर उपाय म्हणून एका तरुणीने अनोखं पेन तयार
केलं आहे. नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ डिझायनिंगची विद्यार्थिनी असणार्‍या या
तरुणीने पार्किन्सन विकार झालेल्या अनेकांना नवी दिशा दाखवली आहे

 

पार्किन्सन या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना अगदी छोट्या छोट्या, रोजच्या कामांमध्येही अवलम्बित्व येते. साधी सोपी कामं करताना त्यांना मदतीची आवश्यकता भासते. या आजाराने शरीरातील नसांवर असा परिणाम होतो ज्यामुळे त्यांचा स्नायूंशी ताळमेळ राहत नाही. लहानसहान बाबींमध्ये येणारं हे अवलंबित्व या रुग्णांसाठी त्रासदायक असते. पार्किन्सनग्रस्त लोकांची हीच गरज अस्वाथी सॅथिसन हा तरुणीने जाणली. नॅशनल इस्टीट्यूट ऑफ डिझायनिंगची विद्यार्थिनी असणार्‍या या मुलीने अनोखं पेनच तयार केलं. ‘फ्लेओ’ असं या पेनाचं नाव आहे.

या शोधासाठी तिला जेम्स डायसन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. या पेनामुळे थरथरणारा हात स्थिर राहतो आणि रुग्ण अगदी आरामात लिहू शकतात. तसंच चित्रंही काढू शकतात. डिझायनिंगचं क्षेत्र खूपच वेगळं असतं. डिझायनिंगच्या माध्यमातून बदल घडवण्यासाठी काहीतरी जगावेगळं करायला हवं असं नाही तर आपल्याकडच्या गुणवत्तेच्या आधारे तुम्ही पुढे जाऊ शकता. आपणच समाजातल्या एखाद्या घटकासाठी बदल घडवू शकतो. त्यांचं जगणं काही प्रमाणात का होईना पण सुसह्य करू शकतो. अस्वाथीनेही तेच केलं. या प्रकल्पासाठी विविध रुग्णालयं तसंच सार्वजनिक ठिकाणांना भेटी दिल्या.

डिझायनिंगचा प्रभावीपणे वापर करून पार्किन्सन विकार झालेल्या लोकांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी प्रयत्न करता येईल हा विचार करून तिने हे पेन तयार केलं. या जगात जवळपास १० दशलक्ष लोक पार्किन्सन या विकाराने ग्रस्त आहेत. त्यांच्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. हात थरथरत असल्यामुळे त्यांना चेकवर सहीसुद्धा करता येत नाही. अस्वाथीला लहानपणापासूनच कला आणि हस्तकलेच्या क्षेत्रात रस होता. पण अकरावीनंतर तिने डिझायनिंगच्या क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं.

नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ डिझायनिंगमध्ये तिला प्रवेश मिळाला. तिसर्‍या वर्षाला असताना अस्वाथीने एक प्रकल्प केला होता. त्या प्रकल्पाची परिणती म्हणजे ‘फ्लेओ’ हे पेन. एनआयडीने नेहमीच विद्यार्थ्याना प्रोत्साहन दिल्याचं अस्वाथी सांगते. तिच्या या प्रकल्पाला आज तुफान यश मिळत आहे. अनेक रुग्णांना या पेनमुळे दिलासा मिळत आहे.

वास्तू

0

वास्तू

 


दुकान आणि शोरूममध्ये छतावर आरसे
लावले जातात. दुकान आणि शोरूममधील
छतावर ईशान्य दिशेला आणि मध्यभागी
आरसा लावू नये. आरशाची फ्रेम तुटल्यास
तत्काळ दुरुस्त करून घ्यावी
संकलक ः अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

सल्ला

0

सल्ला

नेहमी ३० एसपीएफ ग्रेडची सनस्क्रीन
वापरावी. यामुळे बॅकलेस ड्रेस वापरला तरी
त्वचा काळी पडत नाही.

हसा आणि शतायुषी व्हा!


सुरेश : एखाद्या गोष्टीचा अपमान वाटणे आणि नंतर तिचाच
अभिमान वाटणे हे काळ सापेक्ष आहे.
रमेश : कसे?
सुरेश : लहान असताना पायाचे अंगठे पकडणं हा अपमान असतो.
रमेश : अभिमान कसा?
सुरेश : चाळीशी नंतर (हे जमल्यास) याचा अभिमान वाटू लागतो