शेअर बाजारात गुंतवणूक करुन करोडपती व्हायचे असेल आणि चांगला पैसा उभा करायचा असेल तर काही
चुकीच्या गोष्टी सोडून देणे गरजेचे आहे. आजघडीला अनेक गुंतवणूकदार शेअर बाजारात गुंतवलेला पैसा
चुकीच्या विचारांमुळे, सवयीमुळे गमावत आहेत. अमेरिकेचे दिग्गज गुंतवणूकदार बेंजामिन ग्राहम म्हणतात,
‘कोणत्याही गुंतवणूकदारांचा सर्वात मोठा शत्रू तो स्वत:च असू शकतो.” याचा अर्थ गुंतवणूकदारांकडून
होणार्या चुकांमुळेच त्यांचे नुकसान होते. कोणत्या प्रकारच्या असतात या चुका.. आवर्जून वाचा !
बाजारातील तज्ञांना ही बाब आता चांगलीच लक्षात आली आहे. बेंजामिन ग्राहम म्हणतात,
मनुष्यप्राणी हा खूप भावनिक व्यक्तिमत्त्वाचा आहे. त्यामुळे त्याचे निर्णय नेहमीच तार्किक पातळीवर
होतात असे नाही. यात अनेकदा पूर्वग्रह देखील असतात. परिणामी या निर्णयाचाही फटका बसतो. शेअर बाजारात
यशस्वी होण्यासाठी चुकीचे विचार, सवयी वेळीच दुरुस्त करणे गरजेचे आहे. म्हणून गुंतवणूकदारांनी
नुकसानकारक ठरणार्या नऊ गोष्टी टाळायला हव्यात.त्या पाहुया.
भावनिक होऊन निर्णय नको: भावनेच्याभरात घेतलेल्या निर्णयाचे परिणाम चांगले हाती पडत
नाहीत. यापासून वाचण्यासाठी आपण एखादा निर्णयघेण्यापूर्वी त्याची पूर्णपणे तपासणी करायला हवी. त्याचा
अभ्यास करावा आणि या अभ्यासावर विश्वासही ठेवायला हवा. गुंतवणुकीबाबत टप्प्याटप्प्याने वाटचाल
करण्याची रणनिती आखा. त्यामुळे भावनेच्या भरात वाहून जाण्याला आळा बसेल आणि आपण
तार्किक निर्णय घेऊ. भावनेच्या भरात घेतलेल्या निर्णयाने नुकसान कसे होते, ते जर पाहयचे असेल तर
२००८ च्या आर्थिक संकटाचे उदाहरण घ्यावे लागेल. २००८ च्या आर्थिक संकटाचा नुकताच अभ्यास
करण्यात आला आणि त्यात आर्थिक विश्लेषक हे अनेक वर्षांपासून एका वास्तवतेकडे दुर्लक्ष करत
असल्याचे आढळून आले. अमेरिकी कंपन्यांचे प्रत्यक्षातील उत्पन्न आणि त्यांच्या उत्पन्नाचा अंदाज
यात बरेच अंतर होते. जेव्हा मंदी आली तेव्हा सर्व क्षेत्रााला त्याचा फटका बसला. या धयामुळे विश्लेषक
खडबडून जागे झाले आणि त्यांनी उत्पन्नाचा अंदाज कमी केला. प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही. या
विश्लेषकांनी तत्कालिन काळात मंदी येण्यापूर्वी कंपन्यांशी चर्चा केली होती आणि तेव्हा त्यांनी जगात
कितीही मोठी मंदी आली तर व्यवसायावर काहीही परिणाम होणार नाही, असे छातीठोकपणे सांगितले
होते. साहजिकच या आत्मविश्वासाच्या बळावर तज्ञांनी कंपन्यांच्या अंदाजित उत्पन्नात वाढ केली. पण मंदी
आली आणि सर्व जण गाळात गेले. त्यांनी तार्किक पातळीवर राहून विचार केला असता, निर्णय घेतला
असता तर त्यांचे आणि गुंतवणूकदारांचे नुकसान कमी राहिले असते.
खरेदीनंतर पडताळून पाहण्याची सवय सोडा: बहुतांश मंडळी निर्णय अगोदर घेतात आणि
त्यानंतर या निर्णयाची पाठराखण करण्यासाठी लोकांकडून पडताळणी करून घेतात. मनासारखे मत
आल्यास ते समाधानी राहतात, मात्र एखादा विरुद्ध बोलला तर त्याची हेटाळणी करतात. उदा. आपण एसवायझेड
शेअर खरेदी केली असेल आणि त्यावर मित्रमंडळीकडून मत जाणून घेतले तर सर्वांचा अभिप्राय सारखाच येईल असे
नाही. एखाद्याने हा शेअर जोखमीचा असल्याचे सांगितले तर आपण त्याकडे कानाडोळा करतो. अशावेळी
नुकसानीची शयता राहते. म्हणून कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा किंवा अभ्यास करावा. नंतर
पडताळणी करण्याची सवय सोडून द्या.
शेअरला चिटकून राहू नका: बहुतांश गुंतवणूकदार खराब कामगिरी करणार्या शेअरची विक्री करत
नाहीत. याशिवाय एखाद्या शेअरने चांगली कामगिरी केलीअसेल आणि दुसर्यावर्षी सामान्य कामगिरी करत असेल
तरीही त्याला विकण्याचा विचार करत नाहीत. पण त्याला चिटकून राहिल्याने त्याचा
परतावा कमी राहतो. म्हणून पोर्टफोलिओतील शेअरचासातत्याने आढावा घ्यायला हवा.
‘अँकरिंग बायस’ पासून वाचा: एखाद्या गुंतवणूकदाराला कोणत्याही मुद्यावर माहिती मिळाली तर ती खरी असल्याचे गृहित धरत त्याचआधारावर निर्णय घेतले जातात. त्यास अॅकरिंग बायस असे म्हणतात. यासाठीएक उदाहरण पाहू. यस बँकेचा शेअर आता सर्वोच्च पातळीपासून ९० टक्के घसरलेला आहे.अर्थात जेव्हा हा कोसळत होता, तेव्हा त्याची कोणीही
विक्री केली नाही आणि ते त्यात राहिले. यामागचे कारण म्हणजे अॅकरिंग बायस. म्हणजे कालांतराने शेअर पुन्हा
उसळी घेईल, असे सांगण्यात आले होते. परिणामी आजपर्यंत त्याला चिटकून बसले आहेत
फाजील आत्मविश्वास नको: गुंतवणूकदार कधी कधी फाजील आत्मविश्वासाला बळी पडतात. आपल्याला बाजाराचे आकलन झाले आहे, असे गृहित धरत असतात. बुल रॅलीच्या वेळी असा अनुभव येऊ शकतो. कारण त्यावेळी सर्वच शेअर वरच्या पातळीवर सक्रिय असतात आणि आपण कोणताही शेअर खरेदी केला तर तो वरच्या पातळीवर जात असतो. अशावेळी गुंतवणूकदारांत फाजील आत्मविश्वास बळावतो. त्यामुळे लवकर पैसा मिळवण्याच्या नादात जोखमीचे शेअर खरेदी करतात. बाजार कोसळतो, तेव्हा ही खरेदी नुकसानकारक ठरते.
झुंडगिरीला फॉलो करु नये: एखाद्या शेअरमध्ये सर्वजण पैसा टाकत असतील तर आपणही
त्यात उडी मारू, असा जर विचार करत असाल तर तो चुकीचा आहे. झुंडला फॉलो करू नये. या स्थितीमुळे
बाजारात फुगवटा येतो आणि जेव्हा हा फुगा फुटतो तेव्हा सर्वांचे खिसे रिकामे होतात. त्यामुळे आपण स्वत:ची
गुंतवणूक रणनिती आखावी.
नेहमीच स्टॉप लॉस लावावा: कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करताना स्टॉप लॉस लावणे गरजेचे आहे. आताच आपण यस बँकेचे उदाहरण पाहिले. कोणता शेअर किती घसरेल आणि किती दिवस तो वरची पातळी गाठणार नाही, ही गोष्ट कोणालाही ठाऊक नसते. त्यामुळेस्टॉप लॉस लावावे आणि नुकसान किमान पातळीवर आणावे.
कर्ज काढून गुंतवणूक नको: अनेक जण मित्र किंवा बँकेकडून कर्ज घेऊन शेअर बाजारात पैसे टाकतात.
परंतु ही सवय चुकीची आहे आणि धोकादायक आहे. पैसे बुडाले तर आपले कुटुंब देखील अडचणीत येऊ शकते.
त्यामुळे या सवयीपासून चार हात लांब राहा