मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
103

जाहिरातींचा उगम आणि विकास कसा झाला?

आपण जर अरेबियन नाईट्स किंवा पौराणिक कथा, बखरी वगैरे वाचल्या तर आपल्या असे
लक्षात येईल की, जाहिरात ही कला फार पूर्वीपासून अस्तित्वात आहे. पूर्वीच्या काळी राजे लोक आपल्या
लग्नाच्या मुलीची दवंडी पिटवून जाहिरात करायचे. नापितांकडून गावातल्या अनेक गोष्टींची जाहिरात
व्हायची. बाजारात व्यापारी आपल्या मालाची ओरडून जाहिरात करायचे. काही शिलालेखांत राहण्याच्या
व्यवस्थेची, राजानं केलेल्या उत्तम कामांची स्तुती आढळते. ही ही एक प्रकारची जाहिरातच होती. पुढे
भाटांनी ही कामगिरी आपल्या शिरावर घेतली.

इ. स. १४५० मध्ये छपाई कलेचा शोध लागल्यावर पहिली दहा वर्षेतरी छापील जाहिराती
होत नव्हत्या. पहिली छापील जाहिरात करण्याचा मान विल्यम कॅस्टनकडे जातो. इ. स. १४६०
मध्ये विल्यम कॅस्टनने एका धार्मिक पुस्तकात एक जाहिरात छापली. ही पहिली छापील जाहिरात.
पुढे वृत्तपत्रांची सुरुवात झाली आणि लगेचच वृत्तपत्रीय जाहिरातीही सुरू झाल्या. आज जाहिरात
करणे हा एक प्रचंड मोठा धंदा होऊन बसला आहे. अमेरिकेसारख्या देशात दरवर्षी २५ ते ३०
अब्ज डॉलर एवढी रक्कम जाहिरातीपोटी खर्च होते. यात सिनेमाचा समावेश नाही. टी. व्ही., रेडिओ,
नियतकालिके यांच्या उत्पन्नाचा बराच मोठा भाग हा जाहिरातींवर अवलंबून असल्यामुळे आजकाल
बहुतेक प्रगत देशांतून जाहिराती जास्त व कार्यक्रम कमी अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.