खवा, पनीर व बटाटा भजी
साहित्य : १०० ग्रॅम पनीर, १००
ग्रॅम बटाटे, १०० ग्रॅम खवा, १०० ग्रॅम मैदा,
मीठ, मिरपूड, मिरची पूड, हिरव्या मिरच्या,
कोथिंबीर, कांदा, ब्रेड, शेंगदाणे, जिरे, लसूण,
पुदिन्याची पाने, चिंच, साखर, काजू, बदाम
तेल.
कृती : बटाटे उकडून कुस्करून घ्या.
मीठ, मिरपूड, मिरची पूड, हिरव्या मिरचीचे
तुकडे कोथिंबीर, कांदा चिरून मिसळा.
पनीराच्या यूबवर हे मिश्रण लपेटा. नंतर
खवा लपेटा. मैद्यात मिरपूड, मीठ मिसळून
पीठ तयार करा. त्यात तयार पनीर रोल
बडवून ब्रेडच्या चुर्यात घोळवून तळून घ्या.
दुसर्या प्रकारच्या भज्यासाठी पनीर, बटाटा,
उकडलेले शेंगदाणे, मीठ, जिरे, मिरची पूड
मिसळून कोथिंबीर टाका व नंतर भज्याचा
आकार देऊन तळा.
हिरवी चटणी : लसूण, मीठ, हिरवी
मिरची, पुदिना व कोथिंबीर, शेंगदाणे टाकून
चटणी तयार करा.
गोड चटणी : चिंच, साखर, काजू,
बदाम, मीठ, मिरची पूड, जिरे, पॅनमध्ये टाका
व तेलात फोडणी द्या व चटणी वाटा.