दैनिक पंचांग शनिवार, दि. २३ डिसेंबर २०२३

भागवत एकादशी, शके १९४५ शोभननामसंवत्सर, मार्गशीर्ष शुलपक्ष, भरणी
२१|१९ सूर्योदय ०६ वा. २७ मि. सूर्यास्त ०६
वा. २८ मि.

राशिभविष्य

मेष : आपल्या कामाच्या गोष्टी गुप्त ठेवा. मानसिक संतोष वाढेल. कामात अडचणी येतील. पारिवारिक वाद विकोपास जातील.

वृषभ : आर्थिक जबाबदार्‍या वाढतील. आत्मविश्वास वाढेल. कामात अडचणी येतील.

मिथुन : मिळकती पेक्षा जास्त खर्च होईल. अनिश्चितता वाटेल. शत्रुपक्षाच्या कारवाया वाढतील.

कर्क : नोकरीत कुणावरही विश्वास ठेवू नये. अडचणी येतील. सतत परिश्रमाने आर्थिक लाभ होतील. योजनेचे क्रियान्वयन आवश्यक.

सिंह : कामात पारदर्शकता हवी. वैचारिक धारणेत राहू नका. कामे अपुरी राहतील. खर्चाची चिंता राहील.

कन्या : पारिवारिक वाद वाढतील. खर्च होईल. अडकलेल्या कामात सुधारणा होईल.

तूळ : कायदेशीर कामात आत्मविश्वास कमी राहील. आपल्या पावलांच्या खुणा दुसर्‍यांना मार्गदर्शक ठरण्याचा संभव आहे.

वृश्चिक : आपल्या विवेक बुद्धिच्या उलट काम झाल्याने हानी होऊ शकते. नियंत्रण ठेवा. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील.

धनु : नवीन कामांना चालना मिळेल. आपल्या यशाचा मूळ मंत्र कोणत्याच कामाला अशय न समजणे आहे.

मकर : आपले निर्णय, विचार दुसर्‍यांवर थोपू नका. वेळेच महत्व समजा. आपली दूरदृष्टि आणि बुद्धिने अडकलेली कामे पूर्ण होतील.

कुंभ : आपल्या महत्वाकांक्षेमुळे यश मिळू शकेल. वातावरण उत्साहवर्धक राहील.

मीन : यश मिळणार नाही. अनपेक्षित फायदा करून देणार्‍या काही घटना घडतील. वेळ सत्कारणी लागेल.

                                                                                 संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

सुविचार

 

नशिबात जे लिहिलेले आहे; ते विधिलिखित कोणी बदलवू शकत नाही. : संत तुलसीदास

आरोग्य

0

 

टीव्ही पाहण्याने मुलांमध्ये मधुमेहाचा धोका जास्त

अनेक मुले टीव्हीला चिकटून बराच वेळ कार्यक्रम बघत असतात, पण रोज तीन तास
टीव्ही पाहिल्याने मधुमेहाची शयता मुलांमध्ये जास्त वाढते, असे एका अभ्यासात म्हटले आहे.
संशोधकांच्या मते जास्त काळ टीव्ही पाहणे किंवा संगणकासमोर बसून राहणे यामुळे शरीरातील
चरबी वाढते व इन्शुलिन संवेदनशीलता कमी होते. टीव्ही किंवा संगणकापुढे तीन किंवा त्यापेक्षा
अधिक तास बसून राहिल्याने मुलामुलींना कमी वयात टाइप २ मधुमेह होतो.

कैरीची कढी

0

कैरीची कढी

साहित्य : १ नारळ, कैर्‍या ७-८,
१ कांदा, चिमूटभर मेथ्या, बेसन गरजेपुरते,
साखर, मीठ चवीपुरते, १ चमचा तूप.
कृति : नारळाच्या खवाचे दाट दूध
काढून ठेवा. नंतर पुन्हा त्याच खवाचे पातळ
दूध काढून ठेवा. कैर्‍या धुवून, कापून फोडी
करून ठेवा. कांदा जाडसर चिरून ठेवा. मंद
आचेवर तूप गरम करा. त्यात मेथ्या दाणे घाला.
तडतडू लागले की कांदा टाकून वाफवून घ्यावा.
मग कैरीच्या फोडी घालून परता. त्यावर थोडे
पाणी व मीठ टाका. झाकण घालून शिजवत
ठेवा. तोपर्यंत नारळाच्या पातळ दुधात बेसन
कालवून कैरीच्या शिजलेल्या फोडीवर ओता.
मिश्रणाला उकळी येऊ लागली की त्यात
साखर घाला. त्यावर नारळाचे दाटसर दूध
ओता. उकळी आल्यावर भांडे खाली उतरा.
आवडत असेल तर या कढीत अख्ख्या २-३
लाल मिरच्याही टाकू शकता.

केसांना चमक येण्यासाठी

केसांना चमक येण्यासाठी

* १ वाटी मेंदीत आवळा, शिकेकाई,
रिठा, मेथी, कडूलिंब, तुळशीची पान १-१
चमचा घेऊन दह्यात मिसळावे. त्यात अर्ध्या
लिंबाचा रस घालून केसांना लावून १ तास तसेच
राहू द्यावे. याने केस मजबूत होतील व केसांना
चमक येईल.
* चेहर्‍यावरील सुरकुत्या कमी
करण्यासाठी १ चमचा दूध पावडर + १ चमचा
काकडी रस + १ चमचा मुलतानी माती, यात
गुलाबजल मिसळून हे मिश्रण चांगले घोटून
त्याचा लेप चेहर्‍याला लावा. लेव वाळून त्वचा
ताणली की धुऊन काढा.

सल्ला

0

* अंग दुखत असेल तर मोहरीच्या
तेलात थोडं मीठ टाकून ते थोडं गरम करा
व त्याने अंगाला मालिश करा. थोड्या वेळाने
गरम पाण्याने आंघोळ करा. आराम वाटेल.
* तेल लावून शरीराला मसाज करून
स्नान केल्यास शरीराच्या अनेक अवयवांचे
आरोग्य सुधारण्यास मदत होत

वास्तू

0

आपल्या कॉम्प्युटरवर स्क्रीन सेव्हर
म्हणून असे काही लावा, ज्यातून तुम्हाला पुढे
जाण्याची प्रेरणा मिळत राहील. यातून तुमच्या
करिअरला चांगली दिशा प्राप्त होऊ शकते.
संकलक : ॲड. सौ. पूजा गुंदेचा, नगर 

दैनिक पंचांग शुक्रवार, दि. २२ डिसेंबर २०२३

मोक्षदा (स्मार्त) एकादशी, गीताजयंती, उत्तरायणारंभ, शके १९४५ शोभननामसंवत्सर,
मार्गशीर्ष शुलपक्ष, अश्विनी २१|३६ सूर्योदय ०६ वा. २७ मि. सूर्यास्त ०६
वा. २८ मि.

राशिभविष्य

मेष : आपणास आज संभाषणात काळजी घेण्याची गरज आहे. धावपळ जास्त होईल. देवाण-घेवाण टाळा. वेळ अनुकूल आहे. व्यापार-व्यवसायासाठी छान दिवस.

वृषभ : स्वतःला इतर लोकांसमोर सादर करण्याचे सामर्थ्य अंगी येईल. इतर लोकांना तुमचे वचार पटतील. अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल. शत्रूंपासून सावध राहा. स्थिती अनुकूल राहील.

मिथुन : आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती आनंददायी राहील. अधिकार क्षेत्र वाढेल. शत्रूंना भीती वाटेल.

कर्क : देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा.

सिंह : मुलांवर खर्च होईल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. वेळेचे भान पाळा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. खर्च वाढेल. महत्त्वाच्या कामांमध्ये सावधगिरी बाळगा.

कन्या : स्त्री पक्षाकडे लक्ष ठेवा. अधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा.

तूळ : कौटुंबिक वाद-विवाद टाळा. आज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे.

वृश्चिक : इच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील. शेअरमध्ये
गुंतवणूक करू नका.

धनु : एखाद्या महत्वाच्या प्रोजेटमध्ये यश मिळेल. मनोरंजनावर खर्च होण्याची शयता आहे. प्रेमात स्थिती अनुकूल राहील.
आपल्या प्रकृतीची काळजी घ्या. स्त्री पक्षाचा आधार मिळेल.

मकर : हसत खेळत दिवस जाईल. आर्थिक स्थिती संमिश्र राहील. कुटुंबातही वेळ चांगला जाईल. वरिष्ठ लोकांचे कामात
सहकार्य मिळेल. अधिकारी आपणास सहकार्य करतील.

कुंभ : देवाण-घेवाणीबाबत काळजीपूर्वक व्यवहार करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. दिवस उत्तम राहील. महत्वाच्या कार्यात यश मिळेल.

मीन : जोखमीच्या कार्यात पैसा गुंतवू नका. महत्वपूर्ण कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील. पत्र मिळेल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा.

                                                                                      संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

सुविचार

 

सौंदर्याचे नाशवंत स्वरूप समजावण्यासाठी विधात्याने जणू फुले निर्माण केली आहेत. : विल्बर फोर्स

आरोग्य

0

केसांसाठी उपयुत कढीपत्त्याचा पाला

कढीपत्त्याचा एक गुच्छा घेऊन त्याला स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावे आणि सूर्य प्रकाशात
त्या पानांना वाळवून घ्यावे, जेव्हा हे पान वाळून तयार होतील मग याची पूड करून घ्यावी.
आता २०० एम.एल. नारळाचे किंवा ऑलिव्ह ऑईलमध्ये किमान ४ ते ५ चमचे कढी पानांची
पूड मिस करून उकळत ठेवावे. दोन मिनिटांनंतर गॅस बंद करावा. तेलाला गाळून एखाद्या
एअर टाइट बाटलीत भरून ठेवा. झोपण्याअगोदर रोज रात्री हे तेल लावायला पाहिजे. जर हे
तेल थोडे गरम करून लावले तर त्याचे परिणाम लवकरच दिसून येतील.