दैनिक पंचांग शनिवार, दि. २३ डिसेंबर २०२३

0
90

भागवत एकादशी, शके १९४५ शोभननामसंवत्सर, मार्गशीर्ष शुलपक्ष, भरणी
२१|१९ सूर्योदय ०६ वा. २७ मि. सूर्यास्त ०६
वा. २८ मि.

राशिभविष्य

मेष : आपल्या कामाच्या गोष्टी गुप्त ठेवा. मानसिक संतोष वाढेल. कामात अडचणी येतील. पारिवारिक वाद विकोपास जातील.

वृषभ : आर्थिक जबाबदार्‍या वाढतील. आत्मविश्वास वाढेल. कामात अडचणी येतील.

मिथुन : मिळकती पेक्षा जास्त खर्च होईल. अनिश्चितता वाटेल. शत्रुपक्षाच्या कारवाया वाढतील.

कर्क : नोकरीत कुणावरही विश्वास ठेवू नये. अडचणी येतील. सतत परिश्रमाने आर्थिक लाभ होतील. योजनेचे क्रियान्वयन आवश्यक.

सिंह : कामात पारदर्शकता हवी. वैचारिक धारणेत राहू नका. कामे अपुरी राहतील. खर्चाची चिंता राहील.

कन्या : पारिवारिक वाद वाढतील. खर्च होईल. अडकलेल्या कामात सुधारणा होईल.

तूळ : कायदेशीर कामात आत्मविश्वास कमी राहील. आपल्या पावलांच्या खुणा दुसर्‍यांना मार्गदर्शक ठरण्याचा संभव आहे.

वृश्चिक : आपल्या विवेक बुद्धिच्या उलट काम झाल्याने हानी होऊ शकते. नियंत्रण ठेवा. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील.

धनु : नवीन कामांना चालना मिळेल. आपल्या यशाचा मूळ मंत्र कोणत्याच कामाला अशय न समजणे आहे.

मकर : आपले निर्णय, विचार दुसर्‍यांवर थोपू नका. वेळेच महत्व समजा. आपली दूरदृष्टि आणि बुद्धिने अडकलेली कामे पूर्ण होतील.

कुंभ : आपल्या महत्वाकांक्षेमुळे यश मिळू शकेल. वातावरण उत्साहवर्धक राहील.

मीन : यश मिळणार नाही. अनपेक्षित फायदा करून देणार्‍या काही घटना घडतील. वेळ सत्कारणी लागेल.

                                                                                 संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.