मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

पती-पत्नीचा रतगट एक असेल तर मुले व्हायला काही प्रॉब्लेम येतो का?

पती-पत्नीचा रतगट एक असेल तर मुले व्हायला काही प्रॉब्लेम येतो का? आपल्याकडे पत्रिकाबघून एक नाडी असेल तर लग्नाला मनाई करतात. आणि त्यात किती तथ्य आहे आणि ही बाब वैज्ञानिक दृष्टीने किती बरोबर आहे याबद्दल मी काही सांगू शकत नाही. त्या बाबतीत तथ्यपूर्ण माहिती वाचायला आवडेल. मात्र ही समजूत आहे. मात्र यावर पण तोडगे अनेक ज्योतिषी सांगतात. एक नाडी आहे तरी अमुक केल्याने चालते वगैरे वगैरे. आपल्याकडे एक गोत्र असेल तर सहसा लग्न नाही करत. पण कारण एक गोत्र असेल तर एकाच पुरुषापासून व्युत्पत्ती झालेले आहे असे मानले जाते आणि मग ते बहीण भाऊ असे काहीसे नाते समजतात. पण वैज्ञानिक दृष्टीने साधारण ७ पिढ्या गेल्या की गुणसूत्रे बदलून जातात. त्यामुळे मूळ पुरुष एक असला तरी वेगवेगळ्या मूळ स्त्रिया त्यात सामील झाल्याने आणि स्त्रिया आपल्या अपत्यांना आपले mitochondrial DN देत असल्याने तो दोष ही नाहीसा होतो. अर्थात आपल्याकडे सगोत्री विवाह करतात, मुलीला मामाच्या मांडीवर देऊन. म्हणाजे आपल्या आईच्या गोत्रात जाऊन. अर्थात अर्धी आणि सुतभर अधिक ती मुलगी आईच्या गोत्रचीच असते ही बाब गौण समजून दुर्लक्ष करतात. मात्र एक रक्त गट असेल तर काहीही फरक पडत नाही. मुले होण्यास काहीच अडचण नाही. अपत्याचा रक्त गट बहुतेक तोच राहील. रक्त गट आणि मुले होणे यांचा काहीच संबंध नाही. अर्थात, B, O आणि B हे रक्तगट. हे काहीही असू शकतात. पण Rh फॅटर हा एक मुद्दा महत्वाचा ठरतो. जर वडील Rh positive आणि आई Rh negativeअसेल आणि जर होणारे अपत्य Rh positive झाले तर पोटात असताना बाळाच्या रक्तातील Rh फॅटरच्या विरोधात आईच्या शरीरात antibodies निर्माण होतात. आणि मग दोघांच्याही आयुष्याला धोका निर्माण होऊ शकतो. जुन्या काळी जेव्हा हे माहीत नव्हते तेव्हा मुलींना खूप धोका असायचा. पण आजकाल रक्त तपासणी करून त्यासाठी औषध योजना करून हा धोका टाळता येतो. मात्र त्यासाठी आईचे रक्त तपासणे गरजेचे आहे. जर ती स्वतः Rh positive असेल तर बाळ Rh negative चालते. फक्त आई पशसरींर्ळींश असेल तर काळजी घ्यावी लागते. मग वडलांचे रक्त तपासण्यात येते. जर आई B + असेल, तर वडील B, B, की O + की काहीच फरक पडत नाही. पण आई B – असेल तर वडलांचा Rh factor तपासावा लागेल.

सुविचार

बुद्धी असणार्‍यांजवळ सर्व काही असते; परंतु मूर्खाजवळ सर्व असूनही काहीच नसते.

आरोग्य

0
डायबिटीज रुग्णांसाठी फायदेशीर
ज्यांना शुगरचा त्रास असतो त्यांनी कच्च्या पपईचे सेवन करून रक्तात शर्कराच्या मात्रेला
कमी करू शकता. यामुळे शरीरात इंसुलिनची मात्रा वाढते. पपई पोटाशी निगडित समस्या दूर करते
आणि शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढते. मात्र गर्भवती महिलेस पपई खायला देऊ नये.

दैनिक पंचांग रविवार, दि. २४ डिसेंबर २०२३

प्रदोष, शके १९४५ शोभननामसंवत्सर, मार्गशीर्ष शुलपक्ष, कृत्तिका २१|१९
सूर्योदय ०६ वा. २८ मि. सूर्यास्त ०६वा. २६ मि.

राशिभविष्य

मेष : आरोग्य उत्तम राहील. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल. व्यापार व्यवसायात सावधगिरी बाळगा. लांबचे प्रवास टाळा. अपेक्षेनुसार कार्ये होतील. आरोग्य उत्तम राहील.

वृषभ : इच्छित कार्य थोड्या उशीरा होतील. कामात पूर्ण समर्पणभाव ठेवा. अनपेक्षित खर्च होण्याची शयता. महत्वाच्या व्यक्तींशी संपर्क येईल.

मिथुन : आपले काम धाडसाने करा. अडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहते घर व जमिनीसंबंधी विषयांमध्ये स्थिती अनुकूल राहील.

कर्क : महत्त्वाच्या कामांमध्ये आपणास घऱच्यांचा पाठींबा मिळेल. आपण ठरावीक वेळेत काम पूर्ण कराल. आरोग्य नरम-गरम राहील.

सिंह : अडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहते घर व जमिनीसंबंधीच्या कामात स्थिती अनुकूल राहील. राजकीय व्यक्तींसाठी देखील स्थिती सुखद.

कन्या : शत्रू पराभूत होतील. दृष्टीकोनात बदल केल्याने निश्चितच यश मिळेल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. आपली कामे धाडसाने करा.

तूळ : मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. अनुकूल बातम्या कळतील. नोकरदार व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे. मागील उधारी उसनवारी वसुल होईल.

वृश्चिक : पत्नीच्या आरोग्याची चिंता राहील. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा. सामाजिक कार्य काळजीपूर्वक करा. विवाहेच्छुकांना स्थळे येतील.

धनु : प्रेम-प्रसंगांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक खर्च अधिक होईल. कर्ज देणे टाळा. निष्कारण चिंता त्रास देतील. जुने मित्र भेटतील.

मकर : आरोग्याची काळजी घ्या. अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा.

कुंभ : आरोग्य उत्तम राहील. मानसन्मानात वाढ होईल. भावनेच्या भरात वाहून नुकसान होण्याची शयता आहे.

मीन : अपेक्षित व्यक्तींचे सहकार्य मिळेल. नोकरदारांना अनुकूल वातावरण मिळेल. राजकारणी व्यक्तींना उद्देशात यश मिळेल.

                                                                                     संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

सुविचार

भाग्यश्रीची एकदाही कृपा झाली नाही असा एकही मनुष्य या दुनियेत नसेल.

आरोग्य

0

 

ध्यानधारणेमुळे मेंदूची क्षमता वाढते

नियमित योगासने व ध्यानधारणेमुळे मेंदूची कार्यक्षमता तसेच ऊर्जापातळी वाढते, असे
नवीन संशोधनात दिसून आले आहे. हठयोग ही योगाची पद्धत पाश्चात्य देशातही वापरली जाते,
त्यामुळे हे शय होते असे सांगण्यात आले. यात शरीराच्या विविध अवस्था व श्वसनाच्या
पद्धती यांचा समावेश होतो. माइंडफुलनेस प्रकारच्या ध्यानधारणेने विचार, भावना व संवेदना
यांचे निरीक्षण केले जाते व माणसाचा खुलेपणा तसेच स्वीकार्यता वाढते. रोज हठयोग व
माइंडफुलनेस ध्यानधारणा केल्यास मेंदूची बोधनक्षमता वाढते तसेच भावनिक प्रतिसादानुसार
लगेच क्रिया करण्याचे प्रमाण कमी होते. सवयीचे विचार व कृती यापासून मुक्ती मिळत

टोमॅटो धिरडे

0

टोमॅटो धिरडे

साहित्य : तांदूळ पीठ पाऊण कप,
तिखटपूड २ लहान चमचे, आले कीस १
लहान चमचा, साखर २ लहान चमचे, मीठ,
तेल, लालसर टोमॅटो २.
कृति : टोमॅटो उकडत घाला. त्यावर
थोडासा लिंबूरस पिळा. झाकण ठेवू नये.
शिजल्यावर त्याचा रस काढून चाळणीतून
२-३ वेळा गाळून घ्या. मग रस गार झाल्यावर
त्यात तांदूळ पीठ, तिखट, मीठ, साखर, आले
कीस घाला व चांगले एकजीव मिश्रण तयार
करा. मंद आचेवर तव्यावर अथवा फ्राय पॅनवर
बेताची धिरडी घालून चांगली भाजून आवडत
असेल तर एखादी कोरडी भाजी धिरड्यावर
घालून ते गुंडाळून गरम गरम खावे.

चेहर्‍यावरील सुरकुत्या घालविण्यासाठी

चेहर्‍यावरील सुरकुत्या घालविण्यासाठी

 

 

चेहर्‍यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी
१ चमचा दूध पावडर + १ चमचा काकडी रस
+ १ चमचा मुलतानी माती, यात गुलाबजल
मिसळून हे मिश्रण चांगले घोटून त्याचा लेप
चेहर्‍याला लावा. लेव वाळून त्वचा ताणली की
धुऊन काढा.

सल्ला

0

तेल लावून शरीराला मसाज करून
स्नान केल्यास शरीराच्या अनेक अवयवांचे
आरोग्य सुधारण्यास मदत होते.

वास्तू

0

 

आपल्याला आवडीच्या सुगंधीत फुलांचा
गुच्छ नेहमी आपल्या बेडरुममध्ये डोक्याच्या
बाजूला कोपऱ्यात ठेवावा.

संकलक : ॲड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.