पनीर-आलू पॅटीस

0

पनीर-आलू पॅटीस

साहित्य – अर्धा किलो उकडलेले बटाटे, ४-५ लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या, १ चमचा लिंबाचा रस, अर्धी वाटी ओले खोबरे, पाव किलो पनीर किसून, १ मोठा कांदा बारीक चिरून, २-३ मिरच्या बारीक चिरलेल्या, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, दीड चमचा मीठ, अर्धा चमचा साखर, अर्धा चमचा गरम मसाला, १ ब्रेडचे तुकडे, २ चमचे कॉर्नफ्लोअर, चार ताज्या ब्रेडच्या तुकड्यांचा चुरा, तळण्यासाठी तेल.

कृती – बटाटे उकडून त्यांची साले काढून गरम असतानाच किसावेत. गुठळी राहू देऊ नये. त्यातच कॉर्नफ्लोअर मिसळलेल्या ब्रेडचा चुरा व थोडे मीठ घालून मळून घ्या. आता तेल व ब्रेडचा चुरा सोडून उरलेले सर्व साहित्य एकत्र कालवून घ्यावे. हे सारण तयार झाले. आता लाडवाएवढा बटाट्याचा गोळा घेऊन पुरणाच्या उंड्याला करतो तशी वाटी करावी. एक चमचा सारण घालून मोदकाप्रमाणे तोंड बंद करावे व शेंडीही दाबावी. गोल किंवा बदाम असा कुठलाही आकार द्यावा. हा गोळा ब्रेडच्या चुर्‍यामध्ये घोळवून पुन्हा हाताने वर चुरा दाबावा. कढईत तेल गरम करून त्यात गोळे तळून घ्यावेत. सगळे पॅटीस एकदम करून घेऊन तळायच्या वेळी ब्रेडच्या चुर्‍यात घोळवून घ्यावेत व नंतर तळावेत.

आरोग्य

0

कोरफड कफावर उपयुत

लहान मुलांच्या कफावर कोरफड फार उत्तम गुण देते. कोरफडीची पाने विस्तवावर थोडी
गरम करुन त्याचा अंगररस काढावा आणि त्यात किंचिंतसे मीठ टाकून लहान मुलास पिण्यास
द्यावे. म्हणजे परसाकडे साफ होऊन कफ नाहीसा होतो

दैनिक पंचांग शुक्रवार, दि. २९ डिसेंबर २०२३

 शके १९४५ शोभननामसंवत्सर, मार्गशीर्ष कृष्णपक्ष, पुष्य २७|१०
सूर्योदय ०६ वा. २८ मि. सूर्यास्त ०६ वा. ३० मि.


राशिभविष्य :

मेष: जर आपणास एका कार्यातवाढ मिळाली तर इतर कार्यात अवनती होणे
शय आहे.

वृषभ: सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल. सहकार्‍यांबरोबर प्रतिष्ठा वाढेल.

मिथुन: मनोरंजनाच्या विषयांमध्येवेळ खर्च होईल. वैवाहिक जीवनात वातावरण
मधुर राहील. पत्नीपासून सुख मिळेल.

कर्क: गृह भूमीसंबंधी विषयांमध्ये लाभमिळेल. खरेदी-विक्रीत लाभ मिळण्याची
स्थिती बनेल. वैवाहिक सुख वाढेल.

सिंह: आजचा दिवस आपणास पैसेमिळवण्याच्या नव्या संधी देईल परंतु घाई
करणे वादाला कारण ठरू शकते.

कन्या: कौटुंबिक वातावरण सुखदराहील. आर्थिक प्रयत्नांमध्ये स्थिती अनुकूल
राहील. सौंदर्याकडे आकर्षण वाढेल.

तूळ: आरोग्य उत्तम राहील.सामुदायिक उपक्रमांमध्ये समक्षता आपणास
सुविख्यात बनवेल.

वृश्चिक : आपल्या जीवनातील इच्छित वस्तूवर लक्ष द्या.

धनु: व्यापार-व्यवसायात स्थितीसुधार होईल. अनुकूल स्थिती मिळेल.

मकर: नेहमीपेक्षा अधिक चांगले काहीघडण्यासाठी आपणास आपल्या कामात
एकाग्रता वाढवण्याची आवश्यकता आहे.

कुंभ : एखाद्या जुन्या मित्राशी भेटहोण्याची शयता आहे. व्यापार-व्यवसायात
आशानुरूप परिणाम मिळतील.

मीन : वेळेचे सदुपयोग केल्याने यशमिळेल. आरोग्य उत्तम राहील.

                                                        संकलक: अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा!


बाळ : आजोबा, तुम्हाला कोणी बनवल?
आजोबा : देवाने. बरीच वर्षे झालीत.
बाळ : आणि मला?
आजोबा : तुला पण देवानेच बनवल, तीन वर्षांपुर्वी.
बाळ : इतया वर्षात देवाने आपल्यात बरीच सुधारणा केली ना?

सुविचार

नम्रतेचा परिणाम दूरवर फैलावतो; परंतु त्यासाठी पैचाही खर्च करावा लागत नाही

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

उंदीर – मांजराचे युध्य 

एके ठिकाणी उंदीर आणि मांजरात तुंबळ युद्ध सुरु होते. गेले कित्येक दिवस रणकंदन चालले होते. या युद्धात प्रत्येक वेळी उंदरांचा पराभव होत होता. उंदरांचे अनेक खंदे योद्धे लढाईत वीरमरण पत्करीत होते. होता-होता अनेक योद्धे शहीद झाल्याने उंदरांचे सैन्य कमी होऊ लागले. तेव्हा याचा विचार करण्यासाठी उंदरांनी एक बैठक भरविली. युद्धात आपलाच पराभव सारखा का होत आहे, यावर विचार करता असे दिसून आले की, आपला सेनापती कोण, हेच उंदरांना न समजल्याने लढताना त्यांचा गोंधळ उडतो. तेव्हा चर्चेअंती असे ठरले की, जे सेनापती आहेत, त्यांनी आपल्या डोयावर गवताची मोळी बांधावी, म्हणजे इतर उंदरांना ते ओळखू येतील. अशा प्रकारे डोयावर गवताची मोळी बांधून सेनापती व इतर उंदीर लढाईत उतरले. पुन्हा घनघोर लढाईला तोंड फुटले. उंदरा-मांजरात जोराची जुंपली. मांजरांची सेना उंदीर सेनेवर तुटून पडली. अखेर पुन्हा उंदरांचा पराभव झालाच. पराभव होताच उंदीरसेना सैरावैरा पळत आपापल्या बिळात लपून बसली. मांजरांनी त्यांचा पाठलाग केला. पण सेनापतींनी आपल्या डोयांवर गवताची मोळी बांधली असल्याने त्यांना लवकर बिळात शिरता न आल्याने पाठलागावरील मांजरांनी त्यांना गाठले आणि झडप घालून त्यांना खाऊन टाकले. तात्पर्य ः मोठेपणा प्राप्त झाला, तर कर्तव्ये आणि जबाबदारीही वाढते एके ठिकाणी उंदीर आणि मांजरात तुंबळ युद्ध सुरु होते. गेले कित्येक दिवस रणकंदन चालले होते. या युद्धात प्रत्येक वेळी उंदरांचा पराभव होत होता. उंदरांचे अनेक खंदे योद्धे लढाईत वीरमरण पत्करीत होते. होता-होता अनेक योद्धे शहीद झाल्याने उंदरांचे सैन्य कमी होऊ लागले. तेव्हा याचा विचार करण्यासाठी उंदरांनी एक बैठक भरविली. युद्धात आपलाच पराभव सारखा का होत आहे, यावर विचार करता असे दिसून आले की, आपला सेनापती कोण, हेच उंदरांना न समजल्याने लढताना त्यांचा गोंधळ उडतो. तेव्हा चर्चेअंती असे ठरले की, जे सेनापती आहेत, त्यांनी आपल्या डोयावर गवताची मोळी बांधावी, म्हणजे इतर उंदरांना ते ओळखू येतील. अशा प्रकारे डोयावर गवताची मोळी बांधून सेनापती व इतर उंदीर लढाईत उतरले. पुन्हा घनघोर लढाईला तोंड फुटले. उंदरा-मांजरात जोराची जुंपली. मांजरांची सेना उंदीर सेनेवर तुटून पडली. अखेर पुन्हा उंदरांचा पराभव झालाच. पराभव होताच उंदीरसेना सैरावैरा पळत आपापल्या बिळात लपून बसली. मांजरांनी त्यांचा पाठलाग केला. पण सेनापतींनी आपल्या डोयांवर गवताची मोळी बांधली असल्याने त्यांना लवकर बिळात शिरता न आल्याने पाठलागावरील मांजरांनी त्यांना गाठले आणि झडप घालून त्यांना खाऊन टाकले.

तात्पर्य: मोठेपणा प्राप्त झाला, तर कर्तव्ये आणि जबाबदारीही वाढते

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

जनगणना कशासाठी करतात?

आज पृथ्वीवरल्या बहुतेक सर्व देशांमधून जनगणना केली जाते. पण जनगणना ही तशी फार जुनीच आहे. इ. स. पू. ४००० मध्ये पृथ्वीवरची लोकसंख्या साडेआठ कोटी होती, असे सांगितले जाते. पण त्या काळी तरी जनगणना कशासाठी केली जात होती ? पूर्वीच्या काळी राजे लोक प्रजेवर कर बसवायचे. त्यासाठी त्यांना ही माहिती हवी असायची. शिवाय लढाईत लष्करात सामील होण्यासाठी सुदृढ माणसांची आवश्यकता भासायची; यासाठीही जनगणना केली जायची. आज लोकसंख्येची माहिती मिळावी हाच जनगणनेचा प्रमुख हेतू असतो. सरकारला आपल्या लोककल्याणकारी योजना राबवायच्या झाल्या तर त्यासाठी योग्य तो अंदाज घ्यायचा असतो. कारण लोकसंख्येवर अवलंबून बर्‍याच गरजा कमी-जास्त प्रमाणात तीव्र बनत असतात. पिण्याचे पाणी, अन्न, दवाखाने आदी गोष्टी जनतेस पुरविण्यासाठी सरकारजवळ लोकसंख्येची माहिती असणे आवश्यक असते. यासाठी इ. स. १८७२ पासून आपल्या देशात दर दहा वर्षांनी जनगणना केली जाते.

वास्तू

0

वास्तुशास्त्राने दक्षिण दिशेस ‘कर्मभावाची दिशा’ मानले आहे. त्यामुळे घरात लहान-मोठी
यंत्रसामग्री, वॉशिंग मशीन वा दुरुस्तीची उपकरणे ठेवायची असतील, तर ती आवर्जून आणि
कटाक्षाने दक्षिण दिशेसच ठेवली पाहिजेत. अशा वस्तू ठेवण्यासाठी दक्षिणेचा मध्यापर्यंतचा भाग
सर्वोत्तम होय.
                                                   संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

सल्ला

0

झोपताना एक ग्लास गोड व गरम कोमट दुधामध्ये एक चमचा शुद्ध तूप टाकून मुलांना
द्यावे.

चेहर्‍याची त्वचा तेलकट असल्यास

सुंदर चेहर्‍यासाठी


* संत्र्याच्या सुया साली २० ग्रॅम, सुकी कडुलिंबाची पाने ५ ग्रॅम एकत्र वाटून चूर्ण
बनवून घ्या. या चूर्णात ५ ग्रॅम चंदन चूर्ण व पीठ मिसळा. या मिश्रणात बदाम तेल व तितकेच
तिळाचे तेल मिसळा. आता हे उटणे रात्रभर चेहर्‍यावर लावून ठेवा व सकाळी पाण्याने
धुवा. हे उटणे आठवड्यातून ३-४ वेळा लावा.त्याचप्रमाणे चेहर्‍यासाठी मुलतानी मातीचा लेपही
अत्यंत उपयुत आहे.
* चेहर्‍याची त्वचा तेलकट असल्यास टोमॅटोच्या रसात थोडा लिंबाचा रस पिळून
त्याचा लेप चेहर्‍यावर लावावा.