बिस्कीटासह बटाटा पकोडे 

0
65

खाण्याचे शौकीन लोक जगभरात अनेक ठिकाणी सापडतात. ते रुचकर खाण्यासाठी काहीही करू शकतात आणि त्यांच्या आवडत्या गोष्टी खायला कुठेही जाऊ शकतात. आजकाल अन्नावरही विविध प्रकारचे प्रयोग केले जात आहेत. काही लोक पाणीपुरी पासून शेक बनवतात तर काहीजण लोकांना अंडी पॉपकॉर्नची रेसिपी देऊन आश्चर्यचकित करतात. असे अनेक प्रयोग बघून कोड्यात पडायला होते. अशाच एका प्रांतामध्ये एक महिला बिस्किटांसह बटाटा पकोडे बनवताना दिसली. तिची ही पाककृती अनेकांना चकीत करुन गेली. महिलेने आधी बटाटे उकडले आणि मॅश केले. नंतर पॅनमध्ये चांगले तळून मसाला बनवला. मग तिने बिस्किटे घेतली. प्रत्येक बिस्किटात बटाटा मसाला भरला. बेसनाच्या पिठात बुडवून तिने पकोडे तळायला सुरुवात केली. हे बिस्कीट पकोडे बटाट्याच्या पकोड्यांसारखे दिसत होते; पण त्यांची चव कशी आहे हे फक्त ती महिलाच सांगू शकते. हे विचित्र पकोडे ‘सोशल मीडिया’वर व्हायरल होत आहेत. अवघ्या ५८ सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत २० हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला, तर शेकडो लोकांनी व्हिडीओला लाईक करून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या. एका यूजरला हे पकोडे कोण खाणार असा प्रश्न पडला तर एकजण म्हणतो, हे पकोडे केवळ दिखाव्यासाठी बनवले गेले आहेत, मला वाटते ते कोणी खाणार नाही. त्याचबरोबर एका यूजरने लिहिले आहे की या महिलेला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तर दुसर्‍याने लिहिले की हा खाद्यप्रयोग आकलनापलीकडचा आहे.