पाककला

0
48

पनीर-आलू पॅटीस

साहित्य – अर्धा किलो उकडलेले बटाटे, ४-५ लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या, १ चमचा लिंबाचा रस, अर्धी वाटी ओले खोबरे, पाव किलो पनीर किसून, १ मोठा कांदा बारीक चिरून, २-३ मिरच्या बारीक चिरलेल्या, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, दीड चमचा मीठ, अर्धा चमचा साखर, अर्धा चमचा गरम मसाला, १ ब्रेडचे तुकडे, २ चमचे कॉर्नफ्लोअर, चार ताज्या ब्रेडच्या तुकड्यांचा चुरा, तळण्यासाठी तेल.

कृती – बटाटे उकडून त्यांची साले काढून गरम असतानाच किसावेत. गुठळी राहू देऊ नये. त्यातच कॉर्नफ्लोअर मिसळलेल्या ब्रेडचा चुरा व थोडे मीठ घालून मळून घ्या. आता तेल व ब्रेडचा चुरा सोडून उरलेले सर्व साहित्य एकत्र कालवून घ्यावे. हे सारण तयार झाले. आता लाडवाएवढा बटाट्याचा गोळा घेऊन पुरणाच्या उंड्याला करतो तशी वाटी करावी. एक चमचा सारण घालून मोदकाप्रमाणे तोंड बंद करावे व शेंडीही दाबावी. गोल किंवा बदाम असा कुठलाही आकार द्यावा. हा गोळा ब्रेडच्या चुर्‍यामध्ये घोळवून पुन्हा हाताने वर चुरा दाबावा. कढईत तेल गरम करून त्यात गोळे तळून घ्यावेत. सगळे पॅटीस एकदम करून घेऊन तळायच्या वेळी ब्रेडच्या चुर्‍यात घोळवून घ्यावेत व नंतर तळावेत.