मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
41

जनगणना कशासाठी करतात?

आज पृथ्वीवरल्या बहुतेक सर्व देशांमधून जनगणना केली जाते. पण जनगणना ही तशी फार जुनीच आहे. इ. स. पू. ४००० मध्ये पृथ्वीवरची लोकसंख्या साडेआठ कोटी होती, असे सांगितले जाते. पण त्या काळी तरी जनगणना कशासाठी केली जात होती ? पूर्वीच्या काळी राजे लोक प्रजेवर कर बसवायचे. त्यासाठी त्यांना ही माहिती हवी असायची. शिवाय लढाईत लष्करात सामील होण्यासाठी सुदृढ माणसांची आवश्यकता भासायची; यासाठीही जनगणना केली जायची. आज लोकसंख्येची माहिती मिळावी हाच जनगणनेचा प्रमुख हेतू असतो. सरकारला आपल्या लोककल्याणकारी योजना राबवायच्या झाल्या तर त्यासाठी योग्य तो अंदाज घ्यायचा असतो. कारण लोकसंख्येवर अवलंबून बर्‍याच गरजा कमी-जास्त प्रमाणात तीव्र बनत असतात. पिण्याचे पाणी, अन्न, दवाखाने आदी गोष्टी जनतेस पुरविण्यासाठी सरकारजवळ लोकसंख्येची माहिती असणे आवश्यक असते. यासाठी इ. स. १८७२ पासून आपल्या देशात दर दहा वर्षांनी जनगणना केली जाते.