मँगो चॉकलेट

0

मँगो चॉकलेट


साहित्य – आंबा रस ताजा चार कप,दूध पावडर दोन कप, साखर तीन कप,
ग्लुकोज पूड एक कप, पाव कप शुध्द तूप.

कृती – आंब्याच्या रसात साखर घालून ती पूर्ण विरघळून घ्या. नंतर दूध पावडर व
ग्लुकोज पूड एकत्र करुन चांगली मिसळून आंबा मिश्रणात टाकून भांडे मंदाग्नीवर ठेवा.
ढवळत राहा. मिश्रणाचा घट्ट गोळा होईपर्यंत थांबा. थाळीला तुपाचा हलकासा हात लावून
हे घट्ट झालेले आंबा मिश्रण त्यात ओता. पसरुन थापा. थंड झाल्यावर त्याच्या वड्या
पाडा. आंबा चॉकलेट तयार

आरोग्य

0

लाल रंगाच्या फळांमुळे आरोग्यास लाभ


लाल रंग धैर्य आणि ऊर्जेचे प्रतीक असून, आरोग्यासाठीही आपल्या रंगाप्रमाणेच फायदेशीर
आहेत. लाल रंगाच्या फळांमध्ये लायकोपीन आणि अँथ्रेसीन असतं ज्याने कर्करोगाची शयता
कमी होते. या रंगाचे फळ स्मृती सुधारण्यास मदत करतात. हे शरीराला आवश्यक ऊर्जा प्रदान
करतात, ज्याने आपण ताजेतवाने दिसतात. म्हणूनच आपल्या आहारात टोमॅटो, गाजर, बीट,
कॅप्सकम, स्ट्रॉबेरी, टरबूज, सफरचंद, चेरी, प्लम फळे व इतर सामील करावे.

दैनिक पंचांग शनिवार, दि. ३० डिसेंबर २०२३

संकष्ट चतुर्थी, शके १९४५ शोभननाम संवत्सर, मार्गशीर्ष कृष्णपक्ष, आश्लेषा २९|४२                                   सूर्योदय ०६ वा. २९ मि. सूर्यास्त ०६वा. ३१ मि.

राशिभविष्य-

मेष : आजचा आपला दिवस मित्र आणि सामाजिक कार्ये यांच्यामागे धावपळ करण्यात
जाईल. पैसाही खर्च होईल.

वृषभ: पदोन्नतीचा योग आहे. कार्यलयातअधिकार्‍यांकडून सहकार्य मिळेल. कौटुंबिक
जीवनात सुख-शांती मिळेल.

मिथुन : आपल्याला आज प्रतिकूल दिवस आहे. मानसिक व्यग्रता, शारीरिक
शिथिलता अनुभवास येईल.

कर्क : वैचारिक नकारात्मकता मनातअसल्याने दिवसभर अस्वस्थ राहाल. म्हणून
तो दूर ठेवा.

सिंह : आज पति-पत्नींचे एकमेकांशीपटणार नाही. बेबनाव होईल, त्यामुळे लेश
होतील.

कन्या : व्यवसाय धंद्यात आज यशमिळण्याची शयता अधिक आहे. सहकार्यांचे
सहकार्य वाढेल.

तूळ: तुमची वैचारिक आणि मधुर वाणीलोकांना प्रभावित करेल व तसेच त्यामुळे इतर
व्यक्तींशी संबंध दृढ होतील.

वृश्चिक : मित्रपरिवाराशी सावधपणाने वागा असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक व
मानसिक अस्वस्थता राहील.

धनु : प्रतिस्पर्ध्यांवर तुम्ही मात कराल.शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आज
चांगले राहील. वाहने काळजीपूर्वक चालवा.भावनाशील असल्यामुळे नुकसान होणे शक्य आहे.

मकर : आजचा दिवस मिश्रफल देणारा आहे. कुटुंबातील लोकांबरोबर गैरसमजातून
मतभेदाचे प्रसंग घडतील व मन दुःखी होईल.

कुंभ : आजचा दिवस तुम्हाला आर्थिकदृष्ट्या लाभदायी आहे. परिवारात आनंदी वातावरण असेल.                      अनेक संघर्ष आणिविघ्नांना पार पाडल्यानंतर आज आपणास यश मिळेल.

मीन : स्थावर संपत्ती व कोर्ट-कचेरी यांच्या झंझटमध्ये आज पडू नका.
कुटुंबियांबरोबर वार्तालापाने फायदा. आपल्याइच्छेवर आणि मनस्थितीवर संयम ठेवा.

                                                                 संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा!

पोलीस : बाई तुमचा नवरा कसा मेला?
स्त्री : विष खाऊन
पोलीस : मग त्याच्या अंगावर या मारल्याच्या जखमा कशा काय?
स्त्री : खातच नव्हता मेला…

सल्ला

0


साखरेचा पाक केल्यावर त्यात थोडे
लिंबू पिळावे. साखरेचे कण तयार होत
नाहीत.
संकलक: अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हिवाळ्यात केस चांगले ठेवण्यासाठी


केसांना आठवड्यातून एकदा तेल
लावावे. (विशेषत: हिवाळ्यात केस चांगले
राहतात.)

वास्तू

0

लाभदायी बेडरुमसाठी काही कारणाने एखाद्या खोलीत नैसर्गिक
प्रकाश, ऊन, हवा येत नसेल तर अशा खोल्या बेडरूम म्हणून वापरण्याच्या दृष्टीने
लाभदायी ठरत नाहीत. अशा खोल्यांमध्ये २-३ जागी चिनी माती, काच व प्लॅस्टिकच्या
प्लेटमध्ये थोडे खडे मीठ ठेवा. यामुळे हा दोषकमी होतो. घरातही वास्तुदोष राहणार नाही.

सुविचार

जे दुसर्‍याचे भले करतात, त्यांचे खुद्द परमेश्वरच भले करतो

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

महर्षी दधिची आणि इंद्रवज

महर्षी दधीची हे ऋषी अथर्वन आणि त्यांची पत्नी चित्ती यांचे पुत्र होते. असे म्हणतात कि या अथर्वन ऋषींनी अथर्ववेद निर्माण केला. दधीची हे अत्यंत हुशार आणि देवभक्त होते. त्यांनी शास्त्रांचे अध्ययन करून प्रचंड ज्ञान मिळवले होते. एकदा ते क्षुप राजाने आयोजित केलेल्या वादविवादात पराभुत झाले. त्यामुळे व्यथित होऊन त्यांनी शिवाचे तप आरंभ केले. अनेक वर्षे तप केल्यानंतर शंकराने प्रसन्न होऊन त्यांना असा वर दिला: ते कधीही अपमानित होणार नाहीत त्यांना ईच्छामरण मिळेल त्यांचे शरीर अतिशय कणखर होऊन हाडे इंद्राच्या वज्राहूनही कठीण होतील. दधीची आनंदित झाले आणि आपल्या आश्रमात परतले. त्यानंतर पुन्हा कधीही वादविवादात ते पराभुत झाले नाहीत. काही वर्षांनी एक वृत्र नावाचा राक्षस लोकांना आणि देवांना त्रास देऊ लागला. नद्यांचे पाणी अडवुन सर्वांचं जगणं कठीण करू लागला. इंद्र हा पर्जन्यदेव (पावसाचा देव) आहे, त्यामुळे या राक्षसाचा बंदोबस्त करणे त्याला भाग होते. त्याने वृत्राशी युद्ध सुरु केले पण तो त्याला मारू शकला नाही. याचे कारण म्हणजे वृत्र राक्षसाला ब्रह्मदेवाकडून असे वरदान मिळाले होते कि त्याला लोखंड, लाकुड किंवा दगडाने बनवलेल्या कुठल्याही शस्त्राने मारता येणार नाही. सर्व शस्त्रांमध्ये यापैकी कशाचातरी वापर आवश्यक असतोच त्यामुळे त्याला मारणे अशयप्राय झाले होते. तेव्हा भगवान विष्णूंनी इंद्राला दधीची ऋषींची आणि त्यांना मिळालेल्या महादेवाच्या आशीर्वादाची आठवण करून दिली. देवांनी दधीची ऋषींना भेटुन त्यांना सगळी परिस्थिती सांगितली. दधीची ऋषींनी ताबडतोब हे जाणले कि त्यांनी प्राण त्यागुन देवांना आपली हाडे दिली नाहीत तर वृत्र राक्षसाला मारता येणार नाही आणि सर्व सृष्टी धोयात येईल. जगाच्या कल्याणासाठी त्यांनी आपला प्राण लगेच त्यागला. मग देवांनी त्यांची हाडे वापरून इंद्रासाठी एक नवे वज्र आणि इतर शक्तिशाली शस्त्रे बनवली. ह्याच वज्राचा वापर करून इंद्राने वृत्र राक्षसाचा वध केला आणि सृष्टीवरचे संकट दूर केले.

बोध : कर्तव्य करत करतच आपले प्राण सोडणे म्हणजेच जींवनाचे सार्थक होय.

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

टॉवर ऑफ सायलेन्स म्हणजे काय?

माणूस मेल्यानंतर त्याचे काय करायचे, हे त्याच्या धर्मानुसार वा मृत्यूपूर्वी त्याने काही इच्छा (उदा. देहदान) लिहून ठेवली असेल तर त्यावर ठरते. हिंदूंमध्ये मृतदेहाला अग्नी देतात. मुस्लीम आणि ख्रिश्चन लोक मात्र मृतदेह पुरतात. मृतदेहाला अग्नी देण्यासाठी पूर्वापार चालत आलेल्या प्रथेप्रमाणे लाकडांचा वापर करून चिता तयार केली जाते. आजकाल विद्युतदाहिन्यांमध्येही मृतदेहाला अग्नी देतात. अर्थात ही सोय फक्त मोठ्या शहरांमध्येच उपलब्ध आहे. तुम्हाला वाटेल, ही काय भलतीच चर्चा सुरू केली आहे! पण ‘टॉवर ऑफ सायलेन्स’ म्हणजे काय, हे सांगण्यासाठी ही पार्श्वभूमी आवश्यक आहे. पारशी लोक ‘टॉवर ऑफ सायलेन्स’मध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कार करतात किंवा मृतदेह ठेवतात. हा टॉवर एखाद्या टेकडीवर बांधलेला असतो. या टॉवरच्या तळाशी सुमारे ३०० फूट परिघाचा एक गोलाकार ओटा असतो. या ओट्याच्या मध्यभागी सुमारे १५० फूट परिघाची गोलाकार विहीर असते. गोलाकार ओट्यावर मृतदेह ठेवला जातो. १५ ते ३० मिनिटांत गिधाडे गोळा होऊन त्या मृतदेहावरचे सर्व मांस खाऊन त्याचे रूपांतर हाडांच्या सापळ्यात करतात. हवा व तापमान यांच्यामुळे हाडे वाळल्यावर ती ओट्याच्या आतील भागातील विहिरीत टाकली जातात. तेथे विघटन होऊन त्यांचा भुगा होतो. भिंतीमध्ये असलेल्या छिद्रांतून पावसाचे पाणी विहिरीत येते व हाडांचा भुगा या पाण्याबरोबर वाहून जातो व मातीत मिसळला जातो. अशा प्रकार मृतदेहाची चांगल्या रितीने विल्हेवाट लावली जाते. ही पद्धत कमी खर्चाची, कमी वेळ लागणारी आहेच; पण यात भुकेल्या गिधाडांना अन्नही मिळते. मृतदेह जाळल्यामुळे होणारा धूर, प्रदूषण हे त्रासही वाचतात. मुख्य म्हणजे मृत्यूबद्दलची अनावश्यक व लेषदायी भावनिकताही यात नसते