दैनिक पंचांग मंगळवार, दि. ९ जानेवारी २०२४

0
45

भौमप्रदोष, शिवरात्रि, शके १९४५ शोभननामसंवत्सर, मार्गशीर्ष कृष्णपक्ष, ज्येष्ठा
२१|११
सूर्योदय ०६ वा. २९ मि. सूर्यास्त ०६ वा. २७ मि.

राशिभविष्य

मेष : राहते घर व जमिनीसंबंधीच्या कामात स्थिती अनुकूल राहील. महत्त्वाची कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील.

वृषभ : घरात किंवा कुटुंबात शुभप्रसंग घडतील. व्यापार-व्यवसायात वातावरण अनुकूल मिळेल.

मिथुन : शत्रू पराभूत होतील. दृष्टीकोनात बदल केल्याने निश्चितच यश मिळेल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील.

कर्क : आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम आणि धैर्याची आवश्यकता आहे.

सिंह : मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. अनुकूल बातम्या कळतील. नोकरदार व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे.

कन्या : मान-सन्मान वाढेल. आनंदाची बातमी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक वाद-विवाद टाळा.
प्रेमसंबंधांमध्ये आवश्यक प्रगती होईल. प्रसिद्धी वाढण्याची शयता आहे.

तूळ : मिळकतीपेक्षा अधिक खर्च होईल. पत्नीच्या आरोग्याची चिंता राहील. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक सुख वाढेल.

वृश्चिक : सामाजिक कार्य काळजीपूर्वक करा. व्यापार-व्यवसायात जोखमीचे काम टाळा. नोकरदार कामात व्यस्त राहातील. नोकरदारांना अनुकूल वातावरण मिळेल.

धनु : प्रेम-प्रसंगांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक खर्च अधिक होईल. कर्ज देणे टाळा. निष्कारण चिंता त्रास देतील. राजकारणी व्यक्तींना उद्देशात यश मिळेल.

मकर : कामात काही विघ्न येऊ शकतात. अधिक जोखमीचे कार्ये टाळा. आरोग्य नरम-गरम राहील. शेअर्समध्ये गुंतवणुक करु नका. आर्थिक विषयांमध्ये सावध रहा.

कुंभ : व्यापारात वेळ मध्यम राहील. आरोग्याची काळजी घ्या. अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल.

मीन : व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. अधिकार्‍यांपासून दूर राहा. मित्रांचे सहकार्य मिळेल. महत्त्वाची कार्य पूर्ण होतील. आपले धाडस वाढेल. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील.

                                                                                         संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.