मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
49

लहान मुलांना व स्त्रियांना दाढीमिशा का नसतात?

स्त्री व पुरुषातील मुख्य फरक म्हणजे त्यांच्यात
असणारी वेगळी जननेंद्रिये, पुरुषात पूबीज कोष
शरीराच्या बाहेरच्या भागात, तर स्त्रियांमध्ये स्त्रीबीज
कोष ओटीपोटात असतात. पौगंडावस्थेत वा वयात
येत असताना मेंदूच्या नियंत्रणाखाली मुलांमध्ये
टेस्टेस्टेरॉन, तर स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेन व प्रोजेस्टरॉन
हे हॉर्मोन्स स्रवायला सुरुवात होते. या हॉर्मोन्समुळे
मुलामुलींमध्ये दुय्यम लैंगिक लक्षणे दिसू लागतात.
त्यांच्या पूबीज व स्त्रीबीज कोषात पुनरुत्पादनासाठी
आवश्यक असणारी पूबीजे (शुक्राणू) व स्त्रीबीजे
(अंडी) अनुक्रमे तयार होतात.
दुय्यम लैंगिक लक्षणांत आवाज फाटणे, कंठ
फुटणे, काखेत व जननेंद्रियांवर केस येणे यांचा
समावेश मुले-मुली दोहोंत होतो. मुलींमध्ये स्तनांची
वाढ होते. मेदाचे साठे वाढतात. मासिक पाळी सुरू
होते. मुलांमध्ये दाढी- मिशा येऊ लागतात. बिजाची
निर्मिती होऊ लागते.
मुला-मुलींमध्ये वेगवेगळे हॉर्मोन्स स्रवत
असल्याने मुलींना दाढी-मिशा येत नाहीत, तर
मुलांमध्ये स्तनांची वाढ होत नाही. एक लक्षात
घ्यायला हवे की, मुलींमध्ये टेस्टोस्टेरॉन असतो,
पण तो अत्यंत अल्प प्रमाणात असतो व मुलांमध्येही
अत्यल्प प्रमाणात इस्टोजेन असतो. काही वैगुण्यामुळे
वा विकारांमुळे या हॉर्मोन्सचे प्रमाण वाढल्यास
मुलींमध्ये दाढी-मिशासारखी पुरुषी लक्षणे, तर
मुलांमध्ये स्तनांची वाढ होण्यासारखी बायकी लक्षणे
दिसून येतात.