दैनिक पंचांग शनिवार, दि. १७ फेब्रुवारी २०२४

0
26

रथसप्तमी, भीमाष्टमी, शके १९४५
शोभननामसंवत्सर, माघ शुलपक्ष, भरणी ०७|४७
सूर्योदय ०६ वा. २८ मि. सूर्यास्त ०६ वा. ३० मि.

राशिभविष्य

मेष : प्रवासात दगदग, पती पत्नीतील मतभेदांना थारा देवू नका. कार्यालयामध्ये वरिष्ठांशी आदबीने वागा. नोकरदार व्यक्तींनी कार्यात सावधगिरी बाळगावी.

वृषभ : आर्थिक लाभ, सर्व कार्यात यश, जागा खरेदीसाठी चांगला दिवस. वाहनसुख मिळेल. दिवस अत्यंत आनंददायक वातावरणात जाईल.

मिथुन : संततीविषयक समस्या, खर्चात वाढ, व्यापारात मंदी जाणवेल. मागील उधारी उसनवारी वसूल होईल. पितृचिंता सतावेल.

कर्क : स्थावर इस्टेटी संदर्भात अडचणी, राजकारण्यांना अती ताण. मागील भाऊबंदकी डोके वर काढेल.

सिंह : सर्व प्रकारचे लाभ, प्रवासात यश, व्यावसायिक प्रगती. मित्रांमध्ये मिळून मिसळून वागाल. कौटुंबिक विषयांमध्ये काळजी घ्या. शत्रू प्रभावहीन ठरतील.

कन्या : वैवाहिक जोडीदाराच्या चुकीमुळे आर्थिक तणाव वाढेल. पत्नीकडून उत्तम विवाहसौख्य मिळेल. दिवस आनंदात जाईल.

तूळ : आप्तजनाशी वितुष्ट, शारीरिक आळस वाढेल. मातृचिंता सतावेल. व्यापार-व्यवसाय व आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल.

वृश्चिक : योग्य विचारसरणीमुळे व्यक्तींना नमवाल. मागील पुर्वसुकृत फळास येण्यासाठी चांगला दिवस.

धनु : सर्व क्षेत्रात प्रगतीची घोडदौड, धनलाभ, वास्तुचे योग. जुने मित्र भेटण्याचे उत्तम योग आहेत.

मकर : आर्थिक उत्पन्न वाढेल, कमाईचे नवे साधन उपलब्ध होईल. वडीलोपार्जीत मालमत्तेमधून मोठे लाभ संभवतात.

कुंभ : करणीबाधा व शत्रुपीडेमुळे मानसिक त्रास होईल. दिवस वाईट आहे मात्र संयमाने वागल्यास यश मिळेल.

मीन : कष्टाच्या मानाने प्राप्ती कमी, वाईट संगत व व्यसनापासून दूर राहा. संततीसौख्य लाभेल. दूरचे प्रवास होतील. महत्वाकांक्षा वाढतील.

                                                                                         संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.