माकडाची मर्कटचेष्टा

0
90

माकडाची मर्कटचेष्टा

तळ्या काठच्या एका झाडावर एक माकड राहत होते. तळ्यात भरपूर पाणी आणि मासेही रगड
होते. एकदा काही कोळी लोक मासे पकडण्यासाठी तळ्याकाठी आले. त्यांनी तळ्यात जाळी टाकली
आणि जेवण्यासाठी ते घरी गेले. माकड झाडावर बसून कोळ्यांचा उद्योग पाहत होतेच. आपणही
कोळ्यासारखे मासे पकडावेत, असे माकडाला वाटले. तसे भराभर खाली उतरून ते तळ्यात
टाकलेल्या जाळ्याजवळ गेले. जाळे काढायचा प्रयत्न करू लागले, पण जाळे कसे काढतात आणि
कसे टाकतात, याची त्याला काहीही माहिती नव्हती. त्या नादात माकड स्वतःच जाळ्यात गुरफटत गेले.
नाका-तोंडात पाणी जाऊन त्याचा जीव गुदमरू लागला.
जाळ्यातून सुटका करण्यासाठी माकड धडपड करू लागले असता ते मनात म्हणाले,
“माझ्यासारखा मूर्ख मीच. ज्या गोष्टीची आपल्याला माहिती नाही, त्याच्याशी काही देणे-घेणे नाही,
अशा गोष्टीत मी कशाला नाक खुपसले बरे? नसत्या फंदात पडल्याचे हे फळ.
तात्पर्य : नसत्या फंदात पडू नये.