साहित्यिक सुभाष सोनवणे यांचे प्रतिपादन; शिशू संगोपन संस्थेत मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा
नगर – अतंरमनामध्ये चैतन्य, आनंद आणि शांती निर्माण करणारी जगातील एकमेव भाषा म्हणजे आपली माय मराठी
भाषा होय. मराठी भाषेला मोठी परंपरा आहे, आपल्या संतांनी, लेखकांनी मराठी भाषेला समृद्ध केले आहे. अनेक दर्जेदार
लिखाण मराठी भाषेत उपलब्ध आहे. प्रत्येकाला अभिमान वाटवा, अशीही आपली मराठी भाषा आहे, मराठी भाषा अनेक
संत, साहित्यिक, प्रतिभावंतांनी आपल्या लेखणीतून, मराठी भाषेला समृद्ध केले आहे, ही साहित्याची समृद्धी जनसामन्यांपर्यंत पोहचवून ‘मराठी भाषेला’ आणखी समृद्ध करण्याची आपली जबाबदारी आहे, असे प्रतिपादन साहित्यिक तथा कवी सुभाष सोनवणे यांनी केले. शिशू संगोपन संस्थेच्या सविता रमेश फिरोदिया प्रशाला येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कवी वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे
पुजन करण्यात आले. यावेळी साहित्यिक सुभाष सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी
साहित्य परिषदेचे अध्यक्ष किशोर मरकड, संस्थेचे अध्यक्ष दिलीप गुंदेचा, उपाध्यक्ष दशरथ खोसे, सचिव
र. धो. कासवा, सहसचिव राजेश झालानी, खजिनदार अॅड.विजयकुमार मुनोत, माजी प्राचार्य विश्वास काळे,
सिनेट सदस्य शिवाजी साबळे, हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोडक, मनसुखलाल पिपाडा, सचिन
डागा, केंद्र प्रमुख पोपटराव धामणे, बन्सी नन्नवरे, विनोद कटारीया, कांचन गावडे, माध्य.मुख्याध्यपक दत्तात्रय
कसबे, प्राथमिक मुख्याध्यापिका योगिता गांधी आदी उपस्थित होते.
यावेळी किशोर मरकड म्हणाले की, मराठी ही
आपली मायबोली आहे, त्यामुळे आपल्या व्यवहारात
मराठीचा वापर झाला पाहिजे. प्रत्येकाला आपल्या भाषेचा
अभिमान असतो, तसाच अभिमान मराठी माणसानेही
बाळगला पाहिजे. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त
मराठीचा स्विकार करण्याचा निर्धार प्रत्येकाने करावा,
असे आवाहन यावेळी केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष
दिलीप गुंदेचा म्हणाले की,
आजच्या मोबाईल इंटरनेटच्या
जगात वाचंकाची संख्या कमी
होत आहे. परंतु साहित्य वाचनाने
व्यक्तीच्या जीवनात अमुलाग्र
बदल होतो. त्यासाठी नियमित
वाचन केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी
करिअरच्या दृष्टीने मराठी
पुस्तकांचे जास्तीत जास्त वाचन
करावे, असे सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांनी आणि
शिक्षकांनी मराठी भाषा दिनानिमित्त मराठीतून भाषणे
सादर केली. प्रास्तविकात संस्थेचे उपाध्यक्ष दशरथ
खोसे म्हणाले की, कविवर्य कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या
बोली भाषेला एक वेगळा साहित्य प्रकार म्हणून प्रस्थापित
करण्यासाठी मोठे योगदान दिले. मराठी ही शिकण्याची
भाषा व्हावी यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. विद्यार्थ्यांना
या गोष्टींची माहिती व्हावी, यासाठी संस्थेच्यावतीने
आम्ही साहित्यिक क्षेत्रातील विविध मान्यवर बोलवून
त्यांचे मौलिक विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम
करत आहोत.
सुत्रसंचालन निलेश आंबेकर यांनी केले. यावेळी
जयश्री कोदे आणि विद्यार्थ्यांनी मराठी कविता आणि
गिते सादर करुन सर्वांची मने जिंकली.