नगर – महाराष्ट्र सरकारने १५ मार्च २०२४ शासन निर्णय संच
मान्यता संदर्भांत पारित केला. तो शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांना
अन्यायकारक आहे. या संदर्भात संच मान्यता निकष कसे असावेत
याविषयी १८ मार्च २०२४ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शालेय शिक्षण
मंत्री यांना अभ्यासपूर्ण पत्र आमदार ज. मो. अभ्यंकर दिले होते.
या संच मान्यतेमुळे अनुदानित मराठी शाळा व इतर माध्यमाच्या
शाळांतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांना देशोधडीला लावणारा
हा शासन निर्णय रद्द करून सुधारित संच मान्यता शासन निर्णय
काढावा या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री ना. दादाजी भुसे निवेदन
देण्यात आले होते. तरी हा निर्णय रद्द न झाल्याने राज्यातील
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट प्रणित महारष्ट्र राज्य शिक्षक
सेना, अहिल्यानगरच्यावतीने जिल्हा परिषद येथील माध्यमिक
शिक्षण अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले. यावेळी
जिल्हाध्यक्ष प्रा.अंबादास शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष रावसाहेब म्हस्के,
सचिव उद्धवराव सोनवणे, शहर जिल्हाध्यक्ष पारुनाथ ढोकळे, मंगेश
पालवे, सत्यनाथ शेळके, महेश कुलकर्णी, विनायक आहेर, रामनाथ कर्डिले,
लक्ष्मण सुर्यवंशी, अजिंयदेव गायकवाड, नंदकुमार जाधव, अर्जुन आढाव,
रविंद्र हरिशचंद्रे, नंदकुमार डालिंबकर, राजू पवार, शिवाजी आवारे, योगेश शेटे,
पांढरीनाथ थोरे, चंद्रकांत जोर्वेकर, विलास कोतकर, गणेश पोटभरे आदींसह
जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.
या जाचक संच मान्यता शासन निर्णयाविरोधात राज्यभर जिल्ह्या
जिल्ह्यातून आंदोलन करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना
अध्यक्ष आमदार ज. मो. अभ्यंकर दिले होते. त्यानुसार शिवसेना
(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट प्रणित महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना,
अहिल्यानगरच्यावतीने आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले. तसेच
यावेळी सरकारच्या या निर्णयाविरोधात घोषणा देण्यात आले. या
आंदोलनास शिक्षकांची जिल्हास्तरीय समन्वय समितीने पाठिंबा दिला.
याप्रसंगी आप्पासाहेब शिंदे, सुनिल पंडीत, महेंद्र हिंगे, बाबासाहेब
बोडखे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.अंबादास शिंदे
म्हणाले की, शासन शिक्षकांच्या विरोधात वेगवेगळे निर्णय घेवुन शिक्षक
व शिक्षकेतर कर्मचार्यांवर अन्याय करत आहेत. या अन्यायाच्या
विरोधात शिक्षक सेना नेहमीच आवाज उठवीत आली आहे. शिक्षक व
शिक्षकेतर कर्मचार्यांच्या भविष्यासाठी शिक्षक सेना नेहमीच प्रयत्नशिल
राहते. त्यामुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांवर कुठलाही अन्याय होऊ
देणार नाही, असे सांगितले.