नगर – आचार्य भगवंत श्री आनंदऋषिजी म सा या़ंचे शिष्य उपाध्याय प्रवर अर्हम् विज्जा प्रणेता प्रविणऋषिजी म सा
यांच्या प्रेरणा आणि संकल्पनेतुन निर्माण झालेल्या अर्हम् विज्जा केंद्रिय कार्यालयाचा निर्मितीचा भुमी शुध्दीकरण सोहळा जैन
विधी नुसार आचार्य भगवंत यांची जन्मभुमी चिचोंडी येथे उत्साहात झाला.
माजीमंत्री राजेन्द्र दर्डा व मागील वर्षिच्या ऐतिहासिक चातुर्मास समितीचे अध्यक्ष पंकज फुलफगर यांच्या हस्ते हा श्रेत्र शुध्दीकरण सोहळा उत्साहात चतुर्विध संघाच्या साक्षीने झाला . अर्हम् विज्जाच्या ट्रेनर आणी साधकाचे मोठे जाळे संपुर्ण देशात आणी विदेशात पसरले असुन हजारो ट्रेनर च्या माध्यमातून सर्व समाजाच्या नैतिक मुल्यांकन वृध्दी आणी आदर्श जीवनप्रणालीचे सुत्र वाचन आणी ध्यान साधनेच्या माध्यमातून केले जात असुन गर्भ संस्कार पासुन जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ची साधना आराधना अर्हम् विज्या च्या माध्यमातून शिकविले जाते हजारो ट्रेनर आणि लाखो साधकाच्या सोयीसाठी श्री गुरु आनंद फाऊंडेशन चिचोंडी च्या माध्यमातून हे भव्य अर्हम् विज्जा सेटर उभे राहणार आहे
हा सोहळा उपाध्याय प्रवर प्रविणऋषिजी म सा आदी ठाणा २ युवा तपस्वी श्री मुकेशमुनीजी म सा आदी ठाणा ५, महासती श्री सुनंदाजी म सा आदी ठाणा ६, महासती श्री आदर्शज्योतीजी म सा आदी ठाणा ३ महासती श्री ओजसदर्शनाजी म सा आदी ठाणा २ यांच्या पावन सान्निध्यता जैन विधी व जैन मंत्रोच्चारात हा सोहळा झाला. या ठिकाणी उभ्या राहणार्या वास्तु
मध्ये कुठल्याही जीवाची हानी मोऊ नये अशी मंगल प्रार्थना व क्षमापना ही यावेळी सामुहिक पणे करण्यात आली. याप्रसंगी गुरु आनंद फाऊंडेशन व अर्हम् विज्जा चे पदाधिकारी अर्हम विज्जाचे साधक उपस्थित होत