नगर – अहिल्यनगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने सावेडीमधील वर्षा कॉलनी, एयानगर, मॉडेल कॉलनी,
अभियंता कॉलनी, मिस्कीन नगर, जॉगिंग ट्रॅक परिसर, गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड आणि सावेडी उपनगर या परिसरातील अनेक नागरिकांच्या घरांवर, भिंतींवर आणि कंपाउंडवर अतिक्रमणाच्या खोट्या चिन्हांकनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. सदर चिन्हांकन करताना महानगरपालिका प्रशासनाने ना कोणतीही लेखी नोटीस दिली, ना कायदेशीर मोजमाप केले आणि सर्वात चिंतेची गोष्ट म्हणजे नागरिकांच्या संमतीशिवाय त्यांच्या खाजगी मालमत्तेत प्रवेश करून ही कारवाई केली गेली. काही ठिकाणी नागरिकांना तोंडी सांगण्यात आलं की ८ दिवसांत या बांधकामांवर कारवाई केली जाईल. ही संपूर्ण पद्धत कायद्याच्या विरुद्ध असून, नागरिकांना मानसिक त्रास देणारी आणि त्यांच्या मूलभूत हक्कांवर
घाला घालणारी आहे. या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक योगीराज गाडे यांनी महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे निवेदन दिले असून, या सर्व चिन्हांकनांची फेरतपासणी कायदेशीर मार्गाने, मोजमाप करून आणि नागरिकांच्या उपस्थितीत पारदर्शकपणे करावी, तसेच कोणतीही कारवाई करण्याआधी संबंधितांना लेखी नोटीस देणे आवश्यक असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. महानगरपालिका . नागरिकांवर अन्याय न करता कायद्याच्या चौकटीत पारदर्शक पद्धतीने काम
करावी. अन्यथा नागरिकांचा विश्वास संस्थेवरून उडेल, असे गाडे यांनी सांगितले.
या वेळी प्रशांत आहेर, जोशी विश्वकर, प्रसाद जोशी, सारंग दिवटे, ओंकार पाटील, अनिरुद्ध ठोंबरे, वैभव सांगळे, भागचंद लोखंडे, राज गोरे, करण पुंड, विराज भागवत, सार्थक गाडे, सोमनाथ गाडे, अथर्व पादिर, प्रथमेश महिंद्रकर आदी उपस्थित होते.
अहिल्यानगर महानगरपालिकेची कारवाई अन्यायकारक
भिंगार अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेला ६ कोटी ८७ लाखांचा ‘ढोबळ नफा
नगर – भिंगार अर्बन बँकेला मार्च २०२५ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात रु.६ कोटी ८७ लाखांचा ढोबळ नफा झाला असून आयकर व रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचे मार्गदर्शक सुचनांनुसार आवश्यक त्या तरतुदी करुन निव्वळ नफा रु. ३ कोटी ९७ लाखांचा झालेला आहे. मार्च २०२५ अखेर ठेवींमध्ये मागील वर्षापेक्षा ३३.९४ कोटीने वाढ होऊन एकुण ठेवी ३४०.२६ कोटी, कर्जामध्ये ३३.०९ कोटीने वाढ होऊन, चालुवर्षी एकूण कर्जे २३४.३५ कोटी, व व्यवसायामध्ये ६७.०३ कोटीने वाढ होऊन चालुवर्षी एकूण व्यवसाय ५७४.५७ कोटी झालेला आहे. निव्वळ एन.पी.ए.चे प्रमाण ०% राखण्यात यश मिळविले आहे. बँकेने सभासदांना सातत्याने १५% लाभांश दिलेला असून चालू वर्षीही १५% लाभांश वितरीत करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे, असल्याचे प्रतिपादन बँकचे चेअरमन अनिलराव झोडगे यांनी सांगिले. पुढे बोलताना अनिलराव झोडगे म्हणाले की, सभासदांचा, खातेदारांचा बँकेवरील विश्वास बँकेचे कर्मचारी, संचालक मंडळाचे विश्वासपूर्ण काम यामुळेच बँक सातत्याने प्रगती करीत आहे. भविष्यात अधिकाधिक ग्राहकाभिमुख सेवा देण्याचे अनुषंगाने ग्राहकांना मोबाईल बँकीग सुविधा यु.पी.आय. सुविधेसह (गुगल-पे, फोन-पे, यु-आर कोड सह) ११ एप्रिल रोजी थोर समाजसुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांच्या १९८ व्या जयंतीच्या मुहुर्तावर ग्राहकांसाठी सुरु करणार आहोत. बँकेला अहवाल सालात बॅकोतर्फे ३०० ते ३५० कोटी वर्गवारित प्रथम क्रमांकाचा ब्ल्यु रिबन पुरस्कार अॅम्बेव्हॅली (लोणावळा) येथे प्रदान करण्यांत आला.
व्हा.चेअरमन किसनराव चौधरी म्हणाले की, बँकिंग बरोबर सभासदांचे गुणवंत विदयार्थ्यांना प्रोत्साहन देणे, सामाजीक उपक्रम राबविणे, कर्मचारी प्रशिक्षणाव्दारे अधिकाधिक उत्कृष्ट ग्राहक सेवेव्दारे बँकेचा नावलौकिक वाढून बँकेची सर्वांगीण
प्रगती होत आहे, असे ते म्हणाले. प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत महाजन यांनी केले. यावेळी त्यांनी बँकेच्यावतीने राबविण्यात येणार्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी संचालक मंडळ राजेंद्र पतके, कैलासराव खरपुडे,
विष्णु फुलसौंदर, महेश झोडगे, माधव गोंधळे, रुपेश भंडारी, कैलास रासकर, कैलास दळवी, एकनाथराव जाधव, नामदेवराव लंगोटे, श्रीमती तिलोत्तमा करांडे, सौ. अनिता भुजबळ, तज्ञसंचालक रामसुख मंत्री, सीए राजेंद्र बोरा आदी उपस्थित होते.
सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल पतसंस्थेच्यावतीने नवकार कलश रॅलीचे स्वागत
नगर – विश्व नवकार मंत्र दिनानिमित्त जितो अहिल्यानगरच्यावतीने नगर शहरातून नवकार कलश रॅली काढण्यात
आली. या रॅलीचे चौकाचौकात उत्साहात स्वागत करण्यात आले. सहकारमहर्षी सुवालाल गुंदेचा जैन ओसवाल पतसंस्थेच्यावतीनेही या रॅलीचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. यावेळी चेअरमन समीर बोरा, व्हाईस चेअरमन अभय पितळे, संचालक संतोष गांधी, चेतन भंडारी, व्यवस्थापक प्रशांत भंडारी, उपव्यवस्थापक नयना बोगावत आदींसह सभासद उपस्थित होते. अभय पितळे म्हणाले, विश्व नवकार मंत्र दिन हा ऐतिहासिक दिन ठरणार आहे. ९ एप्रिल रोजी धार्मिक परीक्षा बोर्ड येथे सकाळी ७ वाजता भव्य सामूहिक नवकार जाप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संपूर्ण देशभरात भाविक नवकार जाप करणार आहेत. या सोहळ्यात प्रत्येक नगरकराने सहभागी होवून नवकार जापाची
सकारात्मक अनुभूती मिळवावी. धार्मिक परीक्षा बोर्ड येथे यानिमित्त पवन नाईक, भूषण मालू व नगरच्या कलाकारांनी तयार
केलेली नवकार नाद धून सादर करण्यात येणार आहे. याशिवाय विविध सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. र्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली असून भव्य मंडप उभारण्यात आला आहे. तसेच खुर्च्यांची व्यवस्था असून जागोजागी एलईडी स्क्रिनची व्यवस्था करण्यात आली आहे. अतिशय पवित्र पावन वातावरणात मंगलकारी नवकारी मंत्राची जादू प्रत्येकाला अनुभवता येणार आहे. देशभरात एकाच वेळी विविध ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. त्याचे थेट प्रक्षेपणही केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक बडे उद्योजक, दिग्गज सेलिब्रेटी यात सहभागी होऊन संबोधित करणार आहेत. नगरमधील या कार्यक्रमात सर्व भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
घटस्फोटीत, परित्यक्ता या सवलतीखाली बदलीचा लाभ घेण्याकरिता अर्ज करणार्या सर्व शिक्षकांची सत्यता तपासावी : चंद्रशेखर पंचमुख
खोट्या शिक्षकांवर तात्काळ कारवाई करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी
नगर – घटस्फोटीत, परित्यक्ता या सवलती खाली संवर्ग एक मध्ये बदलीचा लाभ घेण्याकरिता अर्ज करणार्या सर्व शिक्षकांची सत्यता तपासणी शिक्षकांची माहिती नोंद सेवा पुस्तकात घ्यावी व खोट्या शिक्षकांवरती कारवाई करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांना निवेदन
देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग तालुका अध्यक्ष चंद्रशेखर रावसाहेब पंचमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते. पुढे निवेदनात म्हंटले आहे की, अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक महिला शिक्षकांनी संवर्ग एक मध्ये घटस्फोटीत व परित्यक्ता या सवलतीचा लाभ मिळावा म्हणून त्यांनी फक्त नोटीसच्या आधारे बदलीमध्ये लाभ घेण्याकरिता खोट्या नोटरी करून प्रतिज्ञापत्र दिलेले आहे. फक्त नोटरीच्या आधारे बदलीचा लाभ यापूर्वी घेतला असून आत्ताही अशाच प्रकारचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहे. बदली करिता सोपा पर्याय म्हणून हा मार्ग सर्वच निवडला जातो तसेच आता होणार्या बदल्या रिता मोठ्या प्रमाणात असे अनेक शिक्षकांनी नोटरी करून दिल्या आहेत. या सर्वांची चौकशी करणे गरजेचे आहे. या सर्वांनी फक्त बदली लाभा करिता घटस्फोटीत व परित्यक्ता असल्याचे वकीलमार्फत पैसे देऊन खोटी माहिती पुरून नोटरी केली आहे. घटस्फोटीत व परित्यक्ता म्हणून बदलीसाठी लाभ घेण्याचा अनेक शिक्षिका बदलीसाठी असा वापर करतात परंतु ज्या घटस्फोटीत आहेत व पतीने सोडून दिले असे दाखवतात प्रत्यक्ष त्याच शिक्षिका पतीबरोबर राहतात पैशाचा आर्थिक व्यवहार होतो. पती-पत्नीला सोडायला व घ्यायला येतो दोघेही सोबत राहतात. याचे बँकेचे खातेही पतीच्या नावानेच आहेत. अशा सर्व घटस्फोटीत व परित्यक्तांची कसून चौकशी व्हावी, त्यांची शहानिशा व्हावी या शिक्षिका अशा प्रकारे धाकदपटशाने हक्क दाखवून लाभ घेतात तर निश्चित यामागे अधिकारी वर्गाचा त्यांना आशीर्वाद आहे. जर अशा प्रकारे फक्त नोटरीवरून बदल्या होऊ लागल्या तर संवर्ग एक मधील मोडणार्या खर्यांवर अन्याय होत आहे. या महिला शिक्षिका शासनाची फसवणूक करतात याकरिता या सर्वांची निःपक्षपातीपणे चौकशी करून कागदपत्र पाहून दोषीवर तात्काळ गुन्हे दाखल करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सेंट विवेकानंद प्री प्रायमरी स्कूलमध्ये लिटिल स्टार ऑलिम्पियाड स्पर्धा उत्साहात
नगर – तारकपूर येथील सेंट विवेकानंद इंग्लिश मिडियम स्कूल येथे पूर्व प्राथमिक विभागासाठी प्रथमच घेण्यात आलेल्या टिल स्टार ऑलिम्पियाडला मोठा प्रतिसाद मिळाला. इंग्रजी, गणित, इव्हिएस या विषयांवर झालेल्या या स्पर्धेत नर्सरी, एलकेजी, युकेजीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. प्रत्येक गटातील विजेत्यांना गोल्ड, सिल्व्हा व ब्राँझ पदकाने गौरविण्यात
आले.
संस्थेचे उपाध्यक्ष रूपचंद मोटवानी, सेक्रेटरी गोपाल भागवानी यांच्या हस्ते विजेत्यांना मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. उपाध्यक्ष रुपचंद मोटवानी म्हणाले, शिक्षण व संस्कारांचा सुंदर मिलाफ शाळेत पहायला मिळतो.
त्यामुळेच अतिशय कमी वयात प्री प्रायमरीमधील विद्यार्थी आपले कौशल्य सिध्द करून दाखवतात. यासाठी सर्व शिक्षक घेत असलेले परिश्रम कौतुकास्पद आहेत.
लिटिल स्टार ऑलिम्पियाड स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना प्री प्रायमरीच्या प्राचार्या कांचन पापडेजा, शिक्षिका प्रिती कटारिया, दीपा आहुजा, गुंजन पंजवानी, कनन शेरवानी, अमृता करामुंगे आदींनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष रामचंद मेंघानी, खजिनदार दामोदर मखिजा, ट्रस्टी राजकुमार गुरनानी, सुरेश हिरानंदानी, महेश मध्यान, हरेश मध्यान, प्राचार्या गीता तांबे, मुख्याध्यापिका गोदावरी किर्तानी आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
अरुण जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात ‘महाआरती’
नगर – माजी आमदार अरुण जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात ८
एप्रिल रोजी सकाळी महाआरती करण्यात आली. अरुणकाका बरे होवून सुखरुप शहरात परतावे यासाठी श्री विशाल गणेशाला साकडे घालण्यात आले. या आरतीसाठी श्री विशाल गणपती देवस्थानचे विश्वस्त प्रा. माणिक विधाते, माजी नगरसेवक संजय चोपडा, विजय गव्हाळे, मनोज कोतकर, मोहन कदम, दीपक सूळ, अमित खामकर, संजय सपकाळ, सुरेश बनसोडे, दीपक खेडकर, आनंद लहामगे, गजेंद्र भांडवलकर, भरत गारुडकर, निलेश बांगरे, संभाजी पवार, अमोल कांडेकर, निलेश इंगळे, राजू पडोळे, प्रभाकर इंगळे, अजय दिघे, बजरंग भुतारे, जालिंदर बोरुडे, पंडितराव खरपुडे,
राजू कचरे, माऊली (मामा) गायकवाड, संजय मोरे, अनिल निकम, बाळासाहेब भुजबळ, प्रा. अरविंद शिंदे, माजी नगरसेविका मीनाताई चोपडा, आशाताई निंबाळकर, रेशमा आठरे, रेणुका पुंड, अरुणा गोयल, अलकाताई मुंदडा, स्मिता वाल्हेकर, अंबिका भिसे, उद्धव शिंदे, विशाल बेलपवार, शिवम भंडारी, मेजर गारुडकर, महेंद्र हिंगे, दिपक
दरेकर, सर्जेराव तोरडमल, प्रा. भगवान काटे, अनिल निकम, विलास शिंदे, आनंद पुंड, किरण जावळे, संतोष हजारे, अनिकेत येमूल, लहू कराळे, विवेक गायकवाड, अभिजीत सपकाळ, मनीष फुलडहाळे, धर्मा करांडे, लकी खुबचंदानी, अक्षय घोरपडे, अरुण खिची, सुरज शहाणे, ओम पांडे, निलेश इंगळे, गजानन ससाणे, युवराज शिंदे, शैलेश अष्टेकर, सुजाता कदम, तुषार टाक आदींसह नगरकर उपस्थित होते. माजी आमदार अरुण जगताप यांच्यावर पुणे येथील खाजगी
रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, त्यांचा प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी शहराचे ग्रामदैवत श्री
विशाल गणेश मंदिरात महाआरती पार पडली. यावेळी सर्व भाविकांनी मनोभावे अरुणकाकांच्या प्रकृतीत सुधारणा
होण्यासाठी श्री विशाल गणेशाला साकडे घातले. प्रा. माणिक विधाते म्हणाले की, श्री विशाल गणपती हे जागृक देवस्थान
असून, सर्वांच्या मनातील इच्छा पूर्ण होतात. अरुणकाका बरे व्हावे ही सर्व नगरकरांच्या मनातील इच्छा आहे. सर्व
समाज, जाती-धर्मातील लोकांशी काकांचे घनिष्ठ संबंध आहेत. मोठ्या प्रमाणात त्यांनी आपल्या कार्यातून माणसे जोडली असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी सर्व जाती-धर्माचे लोक प्रार्थना करत आहेत. लवकरच ते बरे होऊन परत शहरात यावे, ही सर्वांची मनापासून इच्छा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
ज्योत्स्ना उद्योग केंद्रात मनो न्याय आणि बालस्नेही संघ स्थापन
नगर – शहरातील मतिमंद विकास शिक्षण मंडळ संचलित ज्योत्स्ना उद्योग केंद्र सोसायटी कार्यशाळेत मनो न्याय आणि
बालस्नेही संघाची स्थापना करण्यात आली. ही स्थापना राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या २०२४ च्या निर्देशानुसार करण्यात
आली असून, मनोरुग्ण आणि बौद्धिक दृष्ट्या दिव्यांग व्यक्तींना न्याय व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या संघाच्या माध्यमातून दिव्यांग मुलांना विविध शासकीय सेवा, सुविधा, घरकुल योजना आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी असलेल्या शासकीय योजनांची माहिती, मार्गदर्शन आणि अंमलबजावणी करण्यात येणार आहे. संघ स्थापनेच्या प्रसंगी अॅड. राजाभाऊ शिर्के, अॅड. भक्ती शिरसाठ, अॅड. आशा गोंधळी, इथापे, अॅड. ज्ञानेश्वर दाते, प्रभाकर धिरडे, अल्लाउद्दीन शेख यांच्यासह विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य, दिव्यांग विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.
कार्यक्रमात अॅड. राजाभाऊ शिर्के यांनी दिव्यांगांसाठी अस्तित्वात असलेल्या कायद्यांविषयी सखोल मार्गदर्शन केले. नी सांगितले की, दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या हक्कांची जाणीव होणे आणि त्याचे संरक्षण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. समाजाने या घटकाला समजून घेऊन त्यांच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात योगेश आल्हाट यांनी या संघाच्या स्थापनेमागचा उद्देश स्पष्ट करत दिव्यांग व्यक्तींना च्या हक्कांसाठी सक्षम करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. उपस्थित पालकांपैकी जोतीराम फरतडे, नारायणे, रणजीत गांधी यांनी योजनांबाबत आपल्या शंका मांडल्या. त्यांना संबंधित तज्ज्ञांनी समर्पक उत्तरे देत अडचणींचे निरसन केले. सूत्रसंचालन सुशीला जाधव यांनी केले. आभार भाऊसाहेब कदम यांनी मानले. उपस्थितांच्या सहभागातून दिव्यांगांसाठी समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी या उपक्रमाचे महत्त्व कार्यक्रमातून अधोरेखित करण्यात आले.
बँकांमधील सर्व व्यवहार मराठीतून करून सर्व कागदपत्रे, स्लिपा या मराठी भाषेत करा
इंग्रजी भाषेतील स्लिपा मनसे विद्यार्थी सेनाने फाडून शाखाधिकार्यांच्या टेबलावर टाकल्या
नगर – मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे मराठी भाषेचा आदर करून बँकांमधील सर्व व्यवहार मराठीतून करून सर्व कागदपत्रे, स्लिपा या मराठी भाषेत करा. तसेच बँकेत ८० टक्के कर्मचारी हे स्थानिक मराठी भाषिकच असावेत या मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक झाली आहे. बँकेचा कारभार जास्तीत जास्त मराठी भाषेतून न झाल्यास पूर्व कल्पना न देता मनसे स्टाईल आंदोलन करू असा इशाराही विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष सुमित वर्मा यांनी दिला आहे.
पदाधिकार्यांनी सुमित वर्मा यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी अहिल्यानगर शहरातील माणिक चौकातील बँक ऑफ बडोदा बँकेच्या शाखेत आंदोलन करून शाखाधिकार्यांना वरील मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी पदाधिकारी आक्रमक होऊन बँकेच्या इंग्रजी भाषेतील स्लिपा फाडून शाखाधिकार्यांच्या टेबलावर टाकल्या. जर बँकेतील सर्व व्यवहार मराठी भाषेतून केले नाहीतर मनसे स्टाईल आंदोलन करू, असा इशारा यावेळी दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष श्रद्धा खोंडे, शहर उपाध्यक्ष प्रविण गायकवाड, तालुका अध्यक्ष अक्षय बेरड, तालुका उपाध्यक्ष रोमन भागवत, आकाश गवते, नागापूर विभाग प्रमुख आयुश नागरे आदींसह सैनिक उपस्थित होते.
महापालिका क्षेत्रातील सर्व हॉस्पिटल्स्चे ऑडिट करण्यात यावे
नगर – नुकत्याच पुणे येथे झालेल्या पंडित दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. घडलेल्या घटनेला दोषी कोण हे लवकरात तपासातून आपल्या सगळ्यांच्या समोर येईलच. अशी कोणती दुर्दैवी घटना ही आपल्या अहिल्यानगर शहरात घडू नये यासाठी महानगरपालिका क्षेत्रात असणार्या सर्व हॉस्पिटल्स सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल चॅरिटेबल हॉस्पिटल येथे लागू असणारच विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी होत आहे की नाही, तिथे येणार्या नागरिकांची कुठल्या प्रकारच्या पिळवणूक तर होत नाही. याची माहिती घेण्यासाठी पालिकेच्या
वतीने एक समिती नेमण्यात यावी. व या समितीस काही गैर आढळून आल्यास दोशींवर कडक शासन करण्यात यावे.
महानगरपालिका क्षेत्रातील सर्व हॉस्पिटल व मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल यांचे ऑडिट करण्यात यावे, याबाबत मनसेचे च्या वतीने मनपा उपायुक्त यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शहर उपाध्यक्ष किरण रोकडे, संकेत पाळंदे, वृषभ साबळे,
प्रतीक कदम, साहिल पगारे, विशाल अरुण आदी उपस्थित होते शहर अध्यक्ष गजेंद्र राशीनकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात
आले.
पोलिसांनी दिलेल्या मार्गावरूनच उत्साहात पार पडली श्रीरामनवमी मिरवणूक
नगर – श्रीरामनवमी निमित्त ६ एप्रिल रोजी सायंकाळी शहरातून उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. पोलीस प्रशासन भूमिकेवर ठाम राहिल्याने नवीन मार्गानेच मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत हिंदूराष्ट्र सेनेच्या वतीने प्रभू श्रीरामलल्ला
दर्शनाचा देखावा सादर करण्यात आला. तर सकल हिंदू समाजाच्यावतीने अफजल खानाच्या वधाचा जिवंत देखावा मिरवणुकीत सादर करण्यात आला.
या देखाव्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. दरम्यान, किरकोळ घोषणाबाजी वगळता डीजेच्या दणदणाटात मिरवणूक शांततेत पार पडली. दुपारी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मिरवणूक सुरू
करण्यात आली. सकल हिंदू समाज, हिंदूराष्ट्र सेना, वास्तव कंपनी ग्रुप, श्रीराम सेना अशा चार संघटना मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची जुन्या मार्गाने मिरवणूक काढण्यासाठी आग्रह धरला होता. मात्र, पोलिसांनी नवीन मार्गानेच मिरवणूक जाईल, अशी व्यवस्था केली होती. पोलीस प्रशासन ठाम राहिल्याने पंचपीर चावडी – बॉम्बे
बेकरी – चाँद सुलताना स्कूल – माणिक चौक मार्गे जय श्रीरामच्या जयघोषात मिरवणूक मार्गस्थझाली. मिरवणुकीच्या अग्रभागी पालख्या, प्रभू श्रीराम व वीर हनुमान यांची मूर्ती, तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य पुतळे सजवलेल्या रथावर सहभागी करण्यात आले होते. ठिकठिकाणी त्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. मिरवणूक मार्गावर फटायांची आतषबाजी करण्यात आली.
पोलीस अधीक्षक राकेश ओला स्वतः सर्व अधिकार्यांसह मिरवणूक मार्गावर तळ ठोकून होते. ड्रोनव्दारे मिरवणुकीवर वॉच ठेवण्यात आला. किरकोळ घोषणाबाजी वगळता मिरवणूक शांततेत पार पडली. दरम्यान, माळीवाडा- पंचपीर चावडी परिसरातून मिरवणूक जात असताना लाऊडस्पिकरवरून तणाव निर्माण होईल, अशी घोषणा देण्यात आली. मात्र,
घोषणा संपायच्या आतच तेथे उपस्थित असलेल्या उपअधीक्षक अमोल भारती व त्यांच्या पथकाने लाठी चालवत डीजे बंद केला. काही वेळ डीजे बंद ठेवल्यावर त्यावर पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आला व मिरवणूक पुढे मार्गस्थ झाली. मिरवणुकीत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आमदार संग्राम जगताप, मंत्री नितेश राणे यांचे पोस्टर
झळकले. राजकीय नेत्यांसह अखंड हिंदुस्थानचा नकाशा असलेले फलकही युवकांनी झळकावले. ‘एक दिन ऐसा आयेगा पाकिस्तान में भगवा लहराएगा’ अशा घोषणा पोस्टरवर होत्या.
पोलिसांचे योग्य नियोजन अन् मिरवणूक शांततेत श्रीरामनवमी मिरवणूक जुन्या आशा टॉकीजमार्गेच काढणार असल्याची भूमिका हिंदुत्ववादी संघटनांनी घेतली होती. पोलीस प्रशासन मात्र बॉम्बे बेकरी, चांद सुलताना मार्गेच मिरवणूक नेण्यावर ठाम होते. या सर्व पार्श्वभूमीवर पोलिसांनी योग्य तयारी केली होती. पंचपीर चावडी येथून आशा टॉकीजकडे जाणार्या मार्गावर पत्रे ठोकून बॅरिकेटिंग करून रस्ता बंद ठेवण्यात आला होता. मिरवणूक मार्गावर ‘नो व्हेईकल झोन’ जाहीर केला होता. मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या २२२ जणांना हद्दपार करण्यात आले होते. सीसीटीव्हीच्या नजरेसह तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.













