सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल पतसंस्थेच्यावतीने नवकार कलश रॅलीचे स्वागत

0
95

 

नगर – विश्व नवकार मंत्र दिनानिमित्त जितो अहिल्यानगरच्यावतीने नगर शहरातून नवकार कलश रॅली काढण्यात
आली. या रॅलीचे चौकाचौकात उत्साहात स्वागत करण्यात आले. सहकारमहर्षी सुवालाल गुंदेचा जैन ओसवाल पतसंस्थेच्यावतीनेही या रॅलीचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. यावेळी चेअरमन समीर बोरा, व्हाईस चेअरमन अभय पितळे, संचालक संतोष गांधी, चेतन भंडारी, व्यवस्थापक प्रशांत भंडारी, उपव्यवस्थापक नयना बोगावत आदींसह सभासद उपस्थित होते. अभय पितळे म्हणाले, विश्व नवकार मंत्र दिन हा ऐतिहासिक दिन ठरणार आहे. ९ एप्रिल रोजी धार्मिक परीक्षा बोर्ड येथे सकाळी ७ वाजता भव्य सामूहिक नवकार जाप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संपूर्ण देशभरात भाविक नवकार जाप करणार आहेत. या सोहळ्यात प्रत्येक नगरकराने सहभागी होवून नवकार जापाची
सकारात्मक अनुभूती मिळवावी. धार्मिक परीक्षा बोर्ड येथे यानिमित्त पवन नाईक, भूषण मालू व नगरच्या कलाकारांनी तयार
केलेली नवकार नाद धून सादर करण्यात येणार आहे. याशिवाय विविध सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.  र्यक्रमाची  जय्यत तयारी करण्यात आली असून भव्य मंडप उभारण्यात आला  आहे. तसेच खुर्च्यांची व्यवस्था असून जागोजागी एलईडी स्क्रिनची व्यवस्था करण्यात आली आहे. अतिशय पवित्र पावन वातावरणात मंगलकारी नवकारी मंत्राची जादू प्रत्येकाला अनुभवता येणार आहे. देशभरात एकाच वेळी विविध ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. त्याचे थेट प्रक्षेपणही केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक बडे उद्योजक, दिग्गज सेलिब्रेटी यात सहभागी होऊन संबोधित करणार आहेत. नगरमधील या कार्यक्रमात सर्व भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.