नगर – भिंगार अर्बन बँकेला मार्च २०२५ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात रु.६ कोटी ८७ लाखांचा ढोबळ नफा झाला असून आयकर व रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचे मार्गदर्शक सुचनांनुसार आवश्यक त्या तरतुदी करुन निव्वळ नफा रु. ३ कोटी ९७ लाखांचा झालेला आहे. मार्च २०२५ अखेर ठेवींमध्ये मागील वर्षापेक्षा ३३.९४ कोटीने वाढ होऊन एकुण ठेवी ३४०.२६ कोटी, कर्जामध्ये ३३.०९ कोटीने वाढ होऊन, चालुवर्षी एकूण कर्जे २३४.३५ कोटी, व व्यवसायामध्ये ६७.०३ कोटीने वाढ होऊन चालुवर्षी एकूण व्यवसाय ५७४.५७ कोटी झालेला आहे. निव्वळ एन.पी.ए.चे प्रमाण ०% राखण्यात यश मिळविले आहे. बँकेने सभासदांना सातत्याने १५% लाभांश दिलेला असून चालू वर्षीही १५% लाभांश वितरीत करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे, असल्याचे प्रतिपादन बँकचे चेअरमन अनिलराव झोडगे यांनी सांगिले. पुढे बोलताना अनिलराव झोडगे म्हणाले की, सभासदांचा, खातेदारांचा बँकेवरील विश्वास बँकेचे कर्मचारी, संचालक मंडळाचे विश्वासपूर्ण काम यामुळेच बँक सातत्याने प्रगती करीत आहे. भविष्यात अधिकाधिक ग्राहकाभिमुख सेवा देण्याचे अनुषंगाने ग्राहकांना मोबाईल बँकीग सुविधा यु.पी.आय. सुविधेसह (गुगल-पे, फोन-पे, यु-आर कोड सह) ११ एप्रिल रोजी थोर समाजसुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांच्या १९८ व्या जयंतीच्या मुहुर्तावर ग्राहकांसाठी सुरु करणार आहोत. बँकेला अहवाल सालात बॅकोतर्फे ३०० ते ३५० कोटी वर्गवारित प्रथम क्रमांकाचा ब्ल्यु रिबन पुरस्कार अॅम्बेव्हॅली (लोणावळा) येथे प्रदान करण्यांत आला.
व्हा.चेअरमन किसनराव चौधरी म्हणाले की, बँकिंग बरोबर सभासदांचे गुणवंत विदयार्थ्यांना प्रोत्साहन देणे, सामाजीक उपक्रम राबविणे, कर्मचारी प्रशिक्षणाव्दारे अधिकाधिक उत्कृष्ट ग्राहक सेवेव्दारे बँकेचा नावलौकिक वाढून बँकेची सर्वांगीण
प्रगती होत आहे, असे ते म्हणाले. प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत महाजन यांनी केले. यावेळी त्यांनी बँकेच्यावतीने राबविण्यात येणार्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी संचालक मंडळ राजेंद्र पतके, कैलासराव खरपुडे,
विष्णु फुलसौंदर, महेश झोडगे, माधव गोंधळे, रुपेश भंडारी, कैलास रासकर, कैलास दळवी, एकनाथराव जाधव, नामदेवराव लंगोटे, श्रीमती तिलोत्तमा करांडे, सौ. अनिता भुजबळ, तज्ञसंचालक रामसुख मंत्री, सीए राजेंद्र बोरा आदी उपस्थित होते.