सेंट विवेकानंद प्री प्रायमरी स्कूलमध्ये लिटिल स्टार ऑलिम्पियाड स्पर्धा उत्साहात

0
41

नगर – तारकपूर येथील सेंट विवेकानंद इंग्लिश मिडियम स्कूल येथे पूर्व प्राथमिक विभागासाठी प्रथमच घेण्यात आलेल्या  टिल स्टार ऑलिम्पियाडला मोठा प्रतिसाद मिळाला. इंग्रजी, गणित, इव्हिएस या विषयांवर झालेल्या या स्पर्धेत नर्सरी, एलकेजी, युकेजीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. प्रत्येक गटातील विजेत्यांना  गोल्ड, सिल्व्हा व ब्राँझ पदकाने गौरविण्यात
आले.

संस्थेचे उपाध्यक्ष रूपचंद मोटवानी, सेक्रेटरी गोपाल भागवानी यांच्या हस्ते विजेत्यांना मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. उपाध्यक्ष रुपचंद मोटवानी म्हणाले, शिक्षण व संस्कारांचा सुंदर मिलाफ शाळेत पहायला मिळतो.
त्यामुळेच अतिशय कमी वयात प्री प्रायमरीमधील विद्यार्थी आपले कौशल्य सिध्द करून दाखवतात. यासाठी सर्व शिक्षक घेत असलेले परिश्रम कौतुकास्पद आहेत.

लिटिल स्टार ऑलिम्पियाड स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना प्री प्रायमरीच्या प्राचार्या कांचन पापडेजा, शिक्षिका प्रिती कटारिया, दीपा आहुजा, गुंजन पंजवानी, कनन शेरवानी, अमृता करामुंगे आदींनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष रामचंद मेंघानी, खजिनदार दामोदर मखिजा, ट्रस्टी राजकुमार गुरनानी, सुरेश हिरानंदानी, महेश मध्यान, हरेश मध्यान, प्राचार्या गीता तांबे, मुख्याध्यापिका गोदावरी किर्तानी आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.