घटस्फोटीत, परित्यक्ता या सवलतीखाली बदलीचा लाभ घेण्याकरिता अर्ज करणार्‍या सर्व शिक्षकांची सत्यता तपासावी : चंद्रशेखर पंचमुख

0
23

खोट्या शिक्षकांवर तात्काळ कारवाई करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी

नगर – घटस्फोटीत, परित्यक्ता या सवलती खाली संवर्ग एक मध्ये बदलीचा लाभ घेण्याकरिता अर्ज करणार्‍या सर्व  शिक्षकांची सत्यता तपासणी शिक्षकांची माहिती नोंद सेवा पुस्तकात घ्यावी व खोट्या शिक्षकांवरती कारवाई करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांना निवेदन
देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग तालुका अध्यक्ष चंद्रशेखर रावसाहेब पंचमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते. पुढे निवेदनात म्हंटले आहे की, अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक महिला शिक्षकांनी संवर्ग एक मध्ये घटस्फोटीत व परित्यक्ता या सवलतीचा लाभ मिळावा म्हणून त्यांनी फक्त नोटीसच्या आधारे बदलीमध्ये लाभ घेण्याकरिता खोट्या नोटरी करून प्रतिज्ञापत्र दिलेले आहे. फक्त नोटरीच्या आधारे बदलीचा लाभ यापूर्वी घेतला असून आत्ताही अशाच प्रकारचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहे. बदली करिता सोपा पर्याय म्हणून हा मार्ग सर्वच निवडला जातो तसेच आता होणार्‍या बदल्या  रिता मोठ्या प्रमाणात असे अनेक शिक्षकांनी नोटरी करून दिल्या आहेत. या सर्वांची चौकशी करणे गरजेचे आहे. या सर्वांनी फक्त बदली लाभा करिता घटस्फोटीत व परित्यक्ता असल्याचे वकीलमार्फत पैसे देऊन खोटी माहिती पुरून नोटरी केली आहे. घटस्फोटीत व परित्यक्ता म्हणून बदलीसाठी लाभ घेण्याचा अनेक शिक्षिका बदलीसाठी असा वापर करतात परंतु ज्या घटस्फोटीत आहेत व पतीने सोडून दिले असे दाखवतात प्रत्यक्ष त्याच शिक्षिका पतीबरोबर राहतात पैशाचा आर्थिक व्यवहार होतो. पती-पत्नीला सोडायला व घ्यायला येतो दोघेही सोबत राहतात. याचे बँकेचे खातेही पतीच्या नावानेच आहेत. अशा सर्व घटस्फोटीत व परित्यक्तांची कसून चौकशी व्हावी, त्यांची शहानिशा व्हावी या शिक्षिका अशा प्रकारे धाकदपटशाने हक्क दाखवून लाभ घेतात तर निश्चित यामागे अधिकारी वर्गाचा त्यांना आशीर्वाद आहे. जर अशा प्रकारे फक्त नोटरीवरून बदल्या होऊ लागल्या तर संवर्ग एक मधील मोडणार्‍या खर्‍यांवर अन्याय होत आहे. या महिला शिक्षिका शासनाची फसवणूक करतात याकरिता या सर्वांची निःपक्षपातीपणे चौकशी करून कागदपत्र पाहून दोषीवर तात्काळ गुन्हे दाखल करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.