राज्यात उष्णतेची लाट; नगर शहरात ४२ अंश सेल्सिअस तापमान

0
40

 

पुणे – राज्यभरात सध्या उष्णतेची लाट आली असून नगरसह ११ जिल्ह्यांचा पारा ४० अंशाच्या पुढे गेला आहे. त्यामुळे असह्य उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. नगरमध्ये ४२ अंश सेल्सिअस तापमानाची झाली नोंद झाली आहे. उष्णतेची ही लाट आणखी काही दिवस राहणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. सध्या उन्हाचा कडाका प्रचंड वाढला आहे. कोकण किनारपट्टी भागात उष्णतेच्या लाटेचा अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भाच्या तापमानातही मोठी वाढ झाली. अशातच मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी अवकाळी पावसाची शयता वर्तवण्यात आली. सोलापूर आणि अकोला येथे ४४.४ अंश सेल्सिअस इतया कमाल तापमानाची नोंद झाली. तर बीड ४३.२ अंश सेल्सिअस, नगर ४२, छत्रपती संभाजीनगर ४१.२, जळगाव ४२.२, मालेगाव ४२.६, नांदेड ४२.६, धाराशिव ४१.८, परभणी ४२.६, सांगली ४१.१, सातारा ४० अंश सेल्सिअस असे कमाल तापमान नोंदवले गेले. पश्चिम महाराष्ट्रात गेल्या ८ दिवसापासून उष्णतेची लाट असल्याचे चित्र आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि कोल्हापूरमध्ये प्रचंड उकाडा जाणवत आहे.

मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि वादळी वार्‍यासह हलका पाऊस पडण्याची शयता आहे. तसेच काही ठिकाणी प्रचंड उष्णता असल्याचे चित्र आहे. विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा याठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावासाची शयता आहे. तर यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशिम, गडचिरोली आणि नागपूर याठिकाणी तापमानाचा पारा वाढत आहे. उत्तर महाराष्ट्रातील तापमानात कमालीची वाढ झाली आहे. हवेच्या वरच्या स्तरात प्रती चक्रवाताची स्थिती तयार झाल्याने कमाल – किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या चार जिल्ह्यातील तापमानात वाढले आहे. दरम्यान, उन्हाची वाढती तीव्रता नागरिकांसाठी तापदायक ठरते. उन्हाचा कडाका वाढल्याने उष्माघाताचा धोका निर्माण होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे.