शंकर सावली मठात हनुमान चालीसा

0
105

नगर – नगरमधील माळीवाडा येथील ब्राह्मण गल्लीतील शंकर सावली मठात शंकर महाराजांच्या ७७ वा समाधी सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये श्री रामभक्त हनुमान सत्संग मंडळ ट्रस्ट प्रस्तुत हनुमान चालीसा व भजनसंध्या कार्यक्रम झाला. मठासमोर आयोजलेल्या या सामुहिक हनुमान चालीसा पाठ झाली व भजनसंध्याने शंकर महाराजांच्या नामाने परिसर दुमदुमन गेला होता यावेळी हनुमान चालीसाच्या गायनाने कार्यक्रमात रंगला. तर भाविकांनी सामुदायिक पठणात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला व भजन संध्यात भाविक तल्लीन झाले होते. विविध देवतांची स्तुतीपर भजने झाली. या कार्यक्रमास शंकर भक्त, परिसरातील भाविक तसेच विविध क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते. हनुमान चालीसा कार्यक्रमानंतर सर्व भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले व फटायांची आतषबाजी करण्यात आली ४ दिवसीय या कार्यक्रमात सामुदायिक शंकर गिता पारायण सोहळा झाला. दुसर्‍या समाधी दिनी पालखी छबिना सोहळा होणार असून गुरुवारी संध्याकाळी महाप्रसाद म्हणून आगडगावची आमटी व भाकरचे जेवण ठेवण्यात आले आहे. तरी सर्व भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मठाच्या वतीने करण्यात आले आहे