फाटकी नोट घेतली नाही; रागातून दुकान पेटविले

0
32

नगर – दुकानदार महिलेने १० रुपयांची फाटकी नोट घेण्यास नकार दिल्याने त्याचा राग येवून एकाने ऑईल टाकून दुकानच पेटवून दिल्याची घटना शहरातील कोठी चौकातील पाटील हॉस्पिटल समोर घडली. दुकान पेटवून नुकसान करणार्‍या या आरोपीला पोलिसांनी सोमवारी (दि.२९) रात्री अटक केली आहे. विजय दिलीप झेंडे (वय २६, रा. सात खोल्या, नगर कॉलेजजवळ, अहमदनगर) असे या आरोपीचे नाव आहे. याबाबत रंजना अजय बसापुरे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी बसापुरे यांचे कोठी चौकातील पाटील हॉस्पिटल समोर महावीर दुध डेअरी व जनरल स्टोअर या नावाचे दुकान आहे. रविवारी (दि.२८) बसापुरे या दुकानात असताना आरोपी विजय झेंडे दुकानात आला. त्याने वस्तू खरेदीसाठी १० रुपयांची फाटकी नोट दिली. ती घेण्यास बसापुरे यांनी नकार दिला. त्याचा राग येवून आरोपी झेंडे याने रात्री १० च्या सुमारास ऑईल घेवून येत ते दुकानात ओतत दुकानात आग लावली. या आगीत दुकानातील लाकडी काऊंटर, लहान मोठ्या बरण्या व इतर साहित्य असे २० हजारांचे साहित्य जळून नुकसान झाले असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी विजय झेंडे याच्या विरुद्ध भा.दं. वि.कलम ४३६, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी (दि.२९) सायंकाळी गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी रात्री उशिरा आरोपीला अटक केली आहनगर – दुकानदार महिलेने १० रुपयांची फाटकी नोट घेण्यास नकार दिल्याने त्याचा राग येवून एकाने ऑईल टाकून दुकानच पेटवून दिल्याची घटना शहरातील कोठी चौकातील पाटील हॉस्पिटल समोर घडली. दुकान पेटवून नुकसान करणार्‍या या आरोपीला पोलिसांनी सोमवारी (दि.२९) रात्री अटक केली आहे. विजय दिलीप झेंडे (वय २६, रा. सात खोल्या, नगर कॉलेजजवळ, अहमदनगर) असे या आरोपीचे नाव आहे. याबाबत रंजना अजय बसापुरे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी बसापुरे यांचे कोठी चौकातील पाटील हॉस्पिटल समोर महावीर दुध डेअरी व जनरल स्टोअर या नावाचे दुकान आहे. रविवारी (दि.२८) बसापुरे या दुकानात असताना आरोपी विजय झेंडे दुकानात आला. त्याने वस्तू खरेदीसाठी १० रुपयांची फाटकी नोट दिली. ती घेण्यास बसापुरे यांनी नकार दिला. त्याचा राग येवून आरोपी झेंडे याने रात्री १० च्या सुमारास ऑईल घेवून येत ते दुकानात ओतत दुकानात आग लावली. या आगीत दुकानातील लाकडी काऊंटर, लहान मोठ्या बरण्या व इतर साहित्य असे २० हजारांचे साहित्य जळून नुकसान झाले असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी विजय झेंडे याच्या विरुद्ध भा.दं. वि.कलम ४३६, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी (दि.२९) सायंकाळी गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी रात्री उशिरा आरोपीला अटक केली आहे.