तपोवन रोडवर फ्लॅट फोडून दागिन्यांची चोरी; गुन्हा दाखल

0
38

नगर – बाहेरगावी गेलेल्या व्यक्तीचा फ्लॅट फोडून ५४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उपनगरी भागातील तपोवन रोडवरील सुर्यानगर परिसरात शनिवारी (दि.११) सकाळी ८.३० ते रविवारी (दि.१२) सकाळी ८ या कालावधीत घडली आहे. याबाबत सुभाष धुराजी चितळे (वय ५८,रा. हॉटेल सनी पलेस पाठीमागे, सुर्यानगर, तपोवन रोड) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी चितळे हे शनिवारी (दि. ११) सकाळी ८.३० वाजता त्यांचा फ्लॅट बंद करून कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. ते रविवारी (दि.१२) सकाळी ८ वाजता घरी आले असता त्यांना दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसला. त्यांनी घरात पाहणी केली असता सामानाची उचकापाचक झालेली दिसली. त्यांनी कपाटात ठेवलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची तपासणी केली असता त्यांना सर्व दागिने चोरीला गेल्याचे दिसून आले. याबाबत त्यांनी रविवारी रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.