हद्दपार आदेशाचा भंग करणाऱ्याला नगरमध्ये पकडले

0
122

नगर – नगर शहरासह जिल्ह्यातून १ वर्षासाठी हद्दपार केलेले असतानाही त्या आदेशाचा भंग करून शहरात वास्तव्य करणार्‍या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे. कुणाल महेंद्र पोटे (वय ३२, रा. प्रेमदान हडको,नगर) असे या आरोपीचे नाव आहे. कुणाल पोटे याला नगरच्या प्रांताधिकारी यांनी १ वर्षासाठी नगर जिल्ह्यातून हद्दपार केलेले आहे. असे असतानाही तो लपून छपून नगर शहरात फिरत असून त्याच्या राहत्या घरी वास्तव्यास असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. ही माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्यावर लक्ष ठेवले. तो रविवारी (दि.२८) त्याच्या घरी असल्याची माहिती मिळताच त्याला घरात पकडण्यात आले. त्याच्या विरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात हद्दपारी आदेशाचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.