धक्काबुक्की करून महिलेचे गंठण हिसकावून पळविले

0
31

नगर – महिलेला धक्काबुक्की करून त्यांच्या गळ्यातील १६ ग्रॅमचे मिनी गंठण ओरबाडून नेल्याची घटना रविवारी (दि. २८) सकाळी साडेआठच्या सुमारास सिव्हिल हाडको मधील काशिद हॉस्पिटलच्या पाठीमागील बाजूला घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लता शेकडे (वय ३३ रा. दत्त मंदिराशेजारी, बालिकाश्रम रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. त्या रविवारी सकाळी बागल हॉस्टिलमधील कामकाज आटोपून त्यांच्या दुचाकीवर व त्यांची मैत्रिण तिच्या दुचाकीवरून घरी जात असताना साडेआठच्या सुमारास सिव्हिल हाडकोमधील काशीद हॉस्पिटलच्या पाठीमागील बाजूस पाठीमागन एक व्यक्ती दुचाकीवर आला व त्याने अचानक लता यांच्या गळ्यातील मिनी गंठण बळजबरीने ओरबाडले. तो गंठण तोडून व घेऊन जात असताना लता व त्यांच्या मैत्रिणीने त्याच्या दुचाकीचे हँडल पकडून ठेवले असता तो खाली कोसळला. लता यांनी त्याच्याकडे गंठणची मागणी केली असता त्याने धक्काबुक्की केली. दुचाकी जागेवर सोडून तेथून पळ काढला. लता यांनी घटनेची माहिती फोनवरून तोफखाना पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी दुचाकी पोलीस ठाण्यात आणली. लता यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केला आहे.

चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद

सकाळची वेळ असल्याने रस्त्यावर वर्दळ कमी होती. त्याचवेळी संधी साधून सोनसाखळी चोरट्याने दुचाकीवरून जाणार्‍या लता शेकडे यांना गाठून त्यांच्या गळ्यातील गंठण ओरबाडले. परंतु लता यांनी मैत्रिणीच्या मदतीने धाडस दाखवून चोरट्याची दुचाकी पकडली. त्याच्याकडे गंठणची मागणी करताच त्याने धक्काबुक्की केली. तरीही लता व त्यांच्या मैत्रिणीने हार पत्करली नाही. शेवटी तो चोरटा दुचाकी सोडून गंठण घेऊन पळाला. पोलिसांनी दुचाकी ताब्यात घेतली असून ती चोरीची असल्याचा संशय आहे. घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.