राष्ट्रीय जनमंच सेक्युलर पक्षाकडून रविंद्र कोठारी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
20

नगर – कर्जत येथील रविंद्र कोठारी यांनी बुधवारी राष्ट्रीय जनमंच सेयुलर पक्षा कडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या कडे दाखल केले. याप्रसंगी राष्ट्रीय जनमंच सेयुलर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.राधाकृष्ण बाचकर, कार्याध्यक्ष इंजिनिअर कैलासराव कोळसे, महासचिव भगवान जर्‍हाड आदींसह सर्व तालुयातील पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलताना रविंद्र कोठारी म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जाणकर यांनी तीन महिन्यापूर्वीच नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून माझी उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे मी पूर्ण मतदार संघात जन स्वराज्य यात्रा काढून संपर्क सुरु केला होता. मात्र राजकीय घडामोडीत रासप महायुतीत सामील झाल्याने माझ्या उमेदवारी बाबत पेच निर्माण झाला. पण उमेदवारी करण्याचा कार्यकर्त्यांचा रेटा व मतदार संघात झालेल्या संपर्कामुळे मी रासपाच्या प्रदेश सरचिटणीस पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा देत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निवडणुकीत विखे यांच्या धनशक्ती व लंके यांच्या जनशक्ती विरोधात माझी मनशक्ती आहे. मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जन स्वराज्य यात्रेच्या माध्यमातून जाणून घेतले आहेत. ते सोडवण्यासाठी व सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी मी निवडणूक रिंगणात उतरत आहे.

डॉ.राधाकृष्ण बाचकर म्हणाले, २०१९ साली रष्ट्रीय जनमंच पक्षाची स्थापना झाली असून पूर्ण राज्यात काम उभे राहिले आहे. राज्यात राजकीय पक्षांचे अत्यंत खालच्या पातळीवर जात स्वार्थ व सत्तेसाठी माकडा सारख्या उड्या मारत गलीच्छ राजकारण करत सर्वसामान्य जनतेला उल्लू बनवले जात आहे. गरीब जनता, शेतकरी, महिला व युवकांचे प्रश्न सोडवण्या पेक्षा त्यांना फसवत आहेत. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत प्रस्थापित धनशक्ती व जनशक्तीच्या विरोधात पूर्ण राज्यात रष्ट्रीय जनमंच पक्ष उमेदवार देत आहे. आम्हाला विजयाची १०० टक्के खात्री आहे. यावेळी राष्ट्रीय जनमंचाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश थोरात,अ‍ॅड. अशोक कोठारी, प्रा. विजय कोठारी, शाहिद बागवान पाथर्डी, प्रवीणकुमार शहा, गोरक्ष गावडे श्रीगोंदा, संतोष कोठारी, अनिल संघवी, हुकूम भेटेवारा, सुरेश अनारसे, नवनाथ शिंदे, अक्षय चव्हाण, काळंगे महेश, बबन आगमन, योगेश गायकवाड, गिरवलकर, अरविंद पाटील, नारायण गोरे, पियुष कोठारी, राम जहागीरदार, सुजित घोरपडे, जय बोरा, निखिल कोठारी, वैभव कोठारी, विनय यादव, ओम कोठारी, अमोल क्षिरसागर आदी उपस्थित होते.