शिव गोरक्ष हनुमान चालिसा नगरमध्ये २१ ठिकाणी

0
21

नगर – कल्याण रोड येथील श्री सद्गुरु मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ देवस्थान औदुंबर मठ द्वारा संचलित श्री शिव गोरक्ष हनुमान चालिसा एवं सत्संग मंडळ आयोजित हनुमान चालीसा नगर शहरात विविध ठिकाणी झाल्या. हनुमान जन्मोत्सव निमित्त गेल्या अठरा वर्षा पासून हनुम ान चालिसा सामुदायिक पठण कार्यक्रम करत आहे. या वर्षी मंडळाने २१ दिवस सामुदायिक हनुमान चालिसा पठण कार्यक्रम केले आहे. या दरम्यान अतिशय आनंदमय आणि उत्साह मय वातावरणात कार्यक्रम पार पडले. श्री बालाजी विठ्ठल रुमिणी देवस्थान मंदिर, शिवाजीनगर, राम नळकांडे व माजी नगरसेवक शाम नळकांडे मित्र परिवार प्रभाग क्रमांक ८ मधील सर्व नागरिक आयोजित हनुमान चालिसा पाठ अणि भजनसंध्याचा कार्यक्रम मंदिराच्या प्रांगणात झाला. या हनुमान चालीसामध्ये मच्छिन्द्रनाथ, गोरक्षनाथ व नगरचे संत कोंड्यामामा यांच्या वेशभूषेत त्याचे सादरीकरण केले जाते व विविध भजने सादर करून सामुदायिक हनुमान चालीसा पठण केले गेले. २१ दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता हनुमान जन्मोत्सव दिवशी. श्री मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ देवस्थान औदुंबर मठ येथे झाली.