घराची श्रीमंती पुस्तकावरून ठरवावी साहित्यिक : डॉ . संजय कळमकर

0
18
UNJ

 

सावेडीतील श्री समर्थ विद्या मंदिर शाळेतील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा

नगर – आज घराघरात माेबाईल टीव्हीचा वापर वाढला असून माेबाईल, टिव्ही तंत्रज्ञानाच्या आभासी जगात समाजातून संवेदनशीलता लुप्त पावत चालल्या आहेत त्याऐवजी घरात गाेष्टींचे पुस्तके असतील तर मुले गाेष्टींच्या दुनियेत रमतील. मुलांना यशाची सवय लावली तर मुले भविष्यात यशस्वी हाेतीलच मुलांमध्ये फक्त प्रज्ञेचा विकास करण्याबराेबरच प्रतिभेचा विकास आवश्यक आहे, असे प्रतिपादन डाॅ. संजय कळमकर यांनी केले. यावेळी त्यांनी पालकांना आवाहन केले फक्त  अभ्यासाचे मागे लावून यंत्रमानव बनवू नका त्यांची मैदान व पुस्तकांशी मैत्री करवून द्या. त्यांच्याशी सुसंवाद घडवून आणा. विद्यार्थी प्रत्यक्ष जगात आत्मविश्वासाने वावरतील यांसाठी पालकांनीच उत्तम वागावे मुलांमधील क्षमता जाणून घेउन त्याप्रमाणे त्यांची आवड जाेपासू द्या. सावेडीतील श्री समर्थ विदया मंदिर शाळेतील प्रज्ञावंताचा काैतुक साेहळयाचे प्रमुख अतिथी साहित्यिक डाॅ. संजय कळमकर हे हाेते. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश क्षीरसागर हे हाेते. श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भा. ल. जाेशी, उपाध्यक्ष दिपक ओहाेळ, सचिव तथा शालेय समिती चेअरमन सुरेश क्षीरसागर, सचिव प्र. स. ओहाेळ, सचिन क्षीरसागर, स्वप्नील कुलकर्णी, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग शालेय समिती चेअरमन अ‍ॅड. किशाेर देशपांडे, पत्रकार विठठल लांडगे, मुख्याध्यापक दुर्याेधन कासार, मुख्याध्यापिका संगीता जाेशी, पर्यवेक्षिका वसुधा जाेशी आदी उपस्थित हाेते. दुर्याेधन कासार यांनी प्रास्ताविकात प्रशालेकडून इयत्ता 1 ली पासूनच सर्व विद्यार्थ्यासाठी स्पर्धा परीक्षांची कवाडे खुली करून देण्यात येतात. प्रशालेचा विद्यार्थ्यांवरील विश्वास साथ ठरवून विद्यार्थी वेगवेगळया स्पर्धा परीक्षांमध्ये भरघाेस यश मिळवतात. सुरेश क्षीरसागर म्हणाले की, स्पर्धेच्या जगात विद्यार्थ्यानी स्वत:च्या मार्गाची ओळख व्हावी यासाठी समथ प्रशाला नेहमीच प्रयत्नशील आहे व असेल. पालक कविता दराडे व जीवन महाजन यांनीही मनाेगत व्यक्त केले. परीचय धनश्री गुेंकर यांनी केला. सुत्रसंचालन प्राची देशमुख यांनी केले. आभार संपदा नगरकर यांनी मानले.