शहरात विविध ठिकाणी ‘बजरंग बली की जय’ घोषात हनुमान जयंती उत्साहात साजरी

0
189

माळीवाडा येथील शनी मारुती मंदिरात विशेष महापूजा

नगर – माळीवाडा येथील शनी- मारुती मंदिर येथे श्री हनुमान जन्माेत्सव साेहळा उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 6 वा. जन्माेत्सवाच्यावेळी श्री विशाल गणपती मंदिराचे पुजारी संगमनाथ महाराज यांच्या हस्ते अभिषेक करुन महापुजा करण्यात आली. भजनी मंडळाच्या महिलांनी पाळणा हलवून हनुमान जन्माेत्सव साजरा करण्यात आला. यावेळी देवस्थानचे विश्वस्त पांडूरंग नन्नवरे, रंगनाथ ुलसाैंदर, अशाेक भंडारी, बाळासाहेब आगरकर, राज जाधव, जिवाप्पा बहिरवाडे, हर्षल म्हस्के आदिंसह भाविक भक्त उपस्थित हाेते. यावेळी मंदिरावर आकर्षक विद्युत राेषणाई करण्यात आली हाेती. मंदिर परिसर ुलांसह आकर्षक सजावट करण्यात आली हाेती. नगर शहरामध्ये विविध मंडळांनी हनुमान जयंतीनिमित्त विविध मंडळांनी आकर्षक अशा मुर्ती उभारुन जन्माेत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच शहरातील विविध तालिमीमध्ये आकर्षक राेषणाई करुन युवकांनी कावडीने आणलेल्या पाण्याने अभिषेक करण्यात आले.

नगर शहरातील स्टेट बँक चाैक, सर्जे पुरा, दिल्लीगेट, लक्ष्मी कारंजा, माळीवाडा, नेप्तीगेट, झेंडीगेट, नेता सुभाष चाैक, नालेगांव, वारुळाचा मारुती, नवग्रह मंदिर, भुतकरवाडी, श्रमिकनगर, पावन हनुमान मंदिर, बालिकाश्रम राेड, खाकीदास बाबा मठ, नित्यसेवा साेसायटी, मार्कंडेय साेसायटी गुलमाेहाेर राेड, तपाेवन, भाेसले आखाडा, अरणगांव राेड, रेल्वेस्टेशन, केडगांव, एकनाथनगर, भिंगार येथील राेकडेश्वर मंदिरावर आकर्षक सजावट करण्यात आली हाेती. भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठीसाठी रांगा लावल्या हाेत्या. रुईच्या पानांचा हार, मंदिराबाहेर नारळ, टरबुज-खरबुजाचा प्रसादाचे आयाेजन करण्यात हाेते. काैठीची तालिम, नानापाटील वस्ताद, वाडिया पार्क तालिम, गणपतीची तालिम, सातपुते तालिम, झारेकरगल्ली आदी ठिकाणीची तालमींवर राेषणाई करुन सजावट करण्यात आली हाेती. हनुमान जयंतीनिमित्त गेल्या 40 दिवसांपासून नगर शहरात चाैका-चाैकात हनुमान चालिसा पाठाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यामध्ये श्री दक्षिणमुखी हनुमान सत्संग मंडळ, लक्ष्मीनारायण सत्संग मंडळ, श्री रामभक्त हनुमान सत्संग मंडळ, मंगल भक्त सेवा मंडळ आदि मंडळाने शहरात व उपनगरात हनुमान चालिसाचे पठण करुन भाविकांना मंत्रमुग्ध केले.