निलेश लंके यांचा ‘लोकसभे’साठी उमेदवारी अर्ज दाखल

0
121

नगर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी आमदार निलेश लंके यांनी काेणताही गाजावाजा न करता, काेणतेही शक्ती प्रदर्शन न करता नगर दक्षिण लाेकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी (दि.23) साधेपणाने अर्ज भरला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ाळके, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख प्रा.शशिकांत गाडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ असे माेजकेच प्रमुख पदाधिकारी उमेदवारी अर्ज भरताना जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित हाेते. तर निलेश लंके यांनी अर्ज भरत असताना कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयबाहेर गर्दी केली हाेती. हनुमान जयंतीचे निमित्त साधत कार्यकर्त्यांनी त्यांना पितळी आणि चांदीची गदा भेट दिली. या गदा हातात घेत मी हनुमानरायांचा भक्त आहे. गदा काेणालाही मिळत नसते. मी पैलवानच आहे. मै किसके भी साथ खेलुंगा, असे आव्हान निलेश लंके यांनी विराेधकांना दिले. लंके यांनी हनुमान जयंतीचा मुहूर्त साधत नगर दक्षिण लाेकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. लंके म्हणाले, नगर दक्षिण लाेकसभा मतदारसंघांमध्ये काम करण्याची माेठी संधी आहे. जनशक्ती आणि त्यांच्या आशीर्वादाच्या जाेरावर हा उमेदवारी अर्ज भरला आहे. कार्यकर्त्यांनी प्रेमापाेटी दिलेल्या या दाेन्ही गदा हनुमान भक्त म्हणून स्वीकारताे. मी पैलवान आहे काेणाशीही लढू शकताे. ही लढाई धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशी आहे, असेही लंके म्हणाले.