आनंदऋषीजी हॉस्पिटल सर्वसामान्यांना निस्वार्थपणे सेवा देणारे आरोग्य मंदिर : किरण रांका

0
14

आनंदऋषीजी सर्वसामान्यांना निस्वार्थपणे सेवा देणारे आरोग्य मंदिर ठरले आहे. इतर मोठ्या हॉस्पिटलमध्ये खर्चिक आरोग्य सुविधा घेणे परवडत नाही. सर्वसामान्यांना हॉस्पिटलने नेहमीच सेवाभाव जपला असून, मानवतेच्या या कार्यास रांका परिवाराचे नेहमीच योगदान राहणार असल्याचे प्रतिपादन किरण रांका यांनी केले. जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आचार्य श्री आनंदऋषीजी महाराज यांच्या ३२ व्या स्मृतिदिनानिमित्त श्रीमती बिजयाबाई मोहनलालजी रांका परिवाराच्या वतीने आयोजित मोफत दंतरोग तपासणी व उपचार शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी रांका बोलत होते. याप्रसंगी सुर्यकांत रांका, संजय रांका, चंद्रकांत रांका, अमोल रांका, आदेश रांका, संतोष बोथरा, बाबुशेठ लोढा, डॉ. आशिष भंडारी, सुभाष मुनोत, डॉ. अर्पणा पवार, डॉ. प्राची गांधी, डॉ. प्रणव डुंगरवाल, डॉ. अमृता देडगावकर आदी उपस्थित होते. आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये रांका परिवार आयोजित मोफत दंतरोग तपासणी शिबीराचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन करताना किरण रांका. समवेत रांका परिवारातील सदस्य संतोष बोथरा, बाबुशेठ लोढा, डॉटर्स. देत आहे. अंतिम घटकापर्यंत रुग्णसेवा पोहोचण्याचे कार्य आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरू असून, या सेवाकार्यात रांका परिवाराचे नेहमीच योगदान मिळत आहे. हॉस्पिटलमध्ये अद्यावत डेंटल विभाग सुरू करण्यात आला असून, सर्व उपचार सुविधा एका छताखाली उपलब्ध करून गरजू घटकांना आधार देण्यात येत आहे. पैश्यापेक्षा सेवाभाव या वृत्तीने कार्य सुरू असून, विविध शिबिराच्या माध्यमातून सेवा दिली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविकात संतोष बोथरा म्हणाले की, रांका परिवार सामाजिक व धार्मिक कार्यात सक्रिय योगदान डॉ. प्राची गांधी यांनी आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या अद्यावत डेंटल विभागाद्वारे दंत रोगाची उपचार पद्धती सर्वसामान्यांना कमी खर्चामध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तज्ञ डॉटरांच्या मदतीने गरजूंना अद्यावत सुपर स्पेशलिटी आरोग्य सेवा मिळत असून, अत्यल्प दरात रुग्णांना दंत व जबड्यासंबंधी सर्व उपचार पध्दतीची सेवा मिळत आहे. दर विभागाची शनिवारी दंत रोग ओपीडीची मोफत सेवा व सवलतीची त्यांनी माहिती दिली. अमोल रांका रुग्णसेवेच्या कार्यात यांनी रांका परिवाराला सेवा देण्याची संधी मिळत असल्याने धन्यवाद मानले. या शिबिरात २१६ रुग्णांची मोफत दंत तपासणी करण्यात आली. दंतरोग तज्ञ डॉटरांनी रुग्णांची दंत तपासणी करुन त्यांना मार्गदर्शन केले. या शिबिरातील गरजूंची ओरल सर्जन, जबड्याचा फ्रॅचर इम्लांट बसविणे, अक्कल दाढ काढणे, वेडेवाकडे दात सरळ करणे आदी उपचार करणार आहेत. तसेच लहान मुलांचे दात काढणे, सिमेंट बसवणे, रूट कॅनल करणे आदी उपचार केले जाणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले. बाबुशेठ लोढा यांनी आभार मानले.