सर्जेपुरा येथील राधाकृष्ण मंदिरात महाशिवरात्री साजरी

0
25

नगर – सर्जेपूरा येथील पंजाबी सनातन धर्मसभेच्या राधाकृष्ण मंदिरात महाशिवरात्री भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. महादेवाच्या जयघोष करत शीख, पंजाबी समाजातील भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली होती. सकाळी मंदिरातील शिवलिंगाचा अभिषेक करुन विधीवत पूजा करण्यात आली. ट्रस्टचे अध्यक्ष राकेश गुप्ता, विश्वस्त व भाविकांच्या हस्ते महादेवाची आरती पार पडली. यावेळी भाविक व महिला वर्ग उपस्थित होत्या. अनिल सबलोक यांची रेल्वे प्रवासी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल समाजाच्या वतीने प्रदीप पंजाबी यांनी त्यांचा सत्कार केला.

मंदिरातील शिवलिंगाचा अभिषेक करुन महादेवाचा जयघोष

भक्तीमय वातावरणात भजन मंडळीच्या वतीने भजन-कीर्तनाचा कार्यक्रम देखील रंगला होता. हर हर महादेवाच्या जय जयकाराने मंदिर परिसर दुमदुमून गेले. शाबुदाणा खिचडी व थंडाई प्रसादाचे वाटप करुन या धार्मिक सोहळ्याची सांगता झाली. हा धार्मिक सोहळा यशस्वी करण्यासाठी हितेश ओबेरॉय, रितेश नय्यर व युवा समितीच्या युवकांनी परिश्रम घेतले.