श्रीरामरक्षा स्तोत्र पठाण अभियानास प्रारंभ

0
24

नगर – अयोध्येमध्ये श्रीराम जन्मभूमी येथे २२ जानेवारीला प्रभुरामाच्या मंदिराचे लोकार्पण होणार आहे. त्यानिमित्ताने सर्वत्र विविध धार्मिक उपक्रम राबवले जात आहेत. नगरमधील प्राचीन संस्कृती संवर्धन मंडळ व श्रीशिव प्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी सामुदायिक श्रीरामरक्षा स्तोत्र पठण व पाठांतर अभियानाचे आयोजन शहरात करण्यात आले आहे. या अभियानाचा शुभारंभ शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात करण्यात आला. यावेळी शिल्पकार प्रमोद कांबळे, वेदमूर्ती सिद्धेश्वर निसळ गुरुजी, मंदिराचे विश्वस्त पंडितराव खरपुडे, अभियानाचे संयोजक बापू ठाणगे, प्रियांका पोळ, अश्विनी बल्लाळ, संजय जोशी, अभिमन्यू जाधव, अंकुश तरवडे, विठ्ठल सातपूते आदी समिती सदस्य उपस्थित होते. प्रास्ताविकात बापू ठाणगे यांनी अभियानाची माहिती देताना म्हणाले, मुलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक पालक काळजीत असतो. वर्तमान परिस्थितीमध्ये अनेक संकटांना मुला-मुलींना सामोरे जावे लागते. अशा असुरक्षित वातावरणात श्री रामरक्षास्तोत्र मुलांना एक सुरक्षाकवच प्रदान करते. यासाठी मुलामुलींमध्ये लहापणापासूनच श्री रामरक्षास्तोत्र पठणाची सवय जडावी यासाठी हे विशेष अभियान सुरु केले आहे. या अभियानात शहरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रमोद कांबळे यांनी या अभिनाचे कौतुक केले. आध्यात्मिक दृष्ट्या चांगले उपक्रम राबवण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. रामरक्षा पाठांतर अभियानात विद्यार्थी व रामभक्तांनी सहभागी होण्यासाठी अधिक माहितीसाठी बापू ठाणगे ९४२२२२९८९७ या मोबाईलवर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.