सहा कॅफेंवर स्थानिक गुन्हे शाखेची छापेमारी; गुन्हे दाखल; मुलामुलींना समज देत केले पालकांच्या हवाली

0
30

नगर शहरातील सहा कॅफेंवर छापेमारी करत पकडलेल्या चालकांच्या समवेत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक.

शहरातील सहा कॅफेंवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापेमारी करत अश्लिल चाळे करणार्‍या अल्पवयीन मुलामुलींच्या बारा जोडप्यांसह सहा कॅफे चालकांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर तोफखाना व कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, कारवाईवेळी अनेक जोडपी छोट्या केबिनमध्ये अश्लील चाळे करताना आढळून आले. कॅफे चालक जोडप्यांना अश्लील चाळे करण्यासाठी केबिन उपलब्ध करून देत त्यापोटी दर तासाला २०० रुपये दर आकारत असल्याचेही समोर आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून शहरात कॅफेंचे पेव फुटले आहे. कॅफेच्या नावाखाली आतमध्ये छोटे छोटे केबिन तयार करून त्या मुलामुलींना अश्लील चाळे करण्यासाठी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी (दि.८) सावेडी उपनगर परिसरातील श्रीराम चौक येथील लव्ह बर्डस कॅफे, कुष्ठधाम रोड येथील बाबाज् कॅफे, गुलमोहर रोड येथील हर्षाज कॅफे, नगर मनमाड रोडवरील कोहिनूर मॉल समोरील झेड. के. कॅफे या चार व बुरुडगाव रोडवरील इगलप्राईड कॉम्प्लेसमधील गोल्डरश कॅफे व चाणय चौकातील रिजकिंग कॅफे या दोन अशा सहा कॅफेंवर छापे टाकून बारा ते तेरा जोडप्यांना ताब्यात घेतले. तसेच कॉफी शॉपचा परवाना नसताना कॉफी शॉपचा बोर्ड लावून कुठलीही कॉफी, पेय अगर खाद्यपदार्थ विक्रीस न ठेवता आतमध्ये मुलामुलींना बसण्यासाठी केबिन बनवल्याने महेश मच्छिंद्र तेलोरे (रा. तपोवन रोड, सावेडी), ऋषीकेश सखाराम निर्मळ (रा. झोपडी कॅटीन), रोहित कुमार साठे (रा. तपोवन रोड सावेडी), हर्षवर्धन भाऊसाहेब काकडे (रा. तपोवन रोड, सावेडी), सागर अशोक उदमले (रा. हिवरेझरे, ता. नगर), रवि रघुनाथ चौरे (रा. गायकेमळा, कल्याण रोड), अर्जुन ईश्वर कचरे (रा. कानडेमळा, सारसनगर) यांच्यावर कोतवाली व तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.नि. दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार धाकराव, सोपान गोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.