धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा पंधरा दिवसात बसवणार

0
44

नगर – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या १४ मे जयंतीच्या दिवशी प्रोफेसर चौकात पुतळा बसवण्याच्या मागणीसाठी अनेक पत्रव्यवहार करून देखील अद्यापही कारवाई करण्यात आलेली नसल्याने छावा संघटनेच्या वतीने अहमदनगर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. १४ मे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुतळा बसवण्यात यावा अन्यथा प्रोफेसर चौकामध्ये ११ मे पासून उपोषण सुरू करणार असल्याचे निवेदन देण्यात आले होते या मागणीची दखल घेत महानगरपालिका शहर अभियंता मनोज पारखे यांनी लेखी पत्र दिले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्ण कृती पुतळा बसवण्यासाठी चौथ्यार्‍याचे महापालिकेचे छावा मराठा संघटनेला लेखी आश्वासन; आंदोलन मागे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा पंधरा दिवसात बसविण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन छावा मराठा युवा संघटनेच्या पदाधिकार्‍यांना देताना मनपाचे शहर अभियंता मनोज पारखे. काम येथे पंधरा दिवसात पूर्ण करून पुतळा बसविण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिले. यावेळी छावा संघटनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सुरेखाताई सांगळे, शिवप्रतिष्ठान जिल्हा अध्यक्ष बापू ठाणगे, दत्ता वामन, विश्व वारकरी परिषदेचे साहेबराव पाचरणे, केशव बरकते, महेश चव्हाण, दीपक गहिले, योगेश पवार, किरण उंडे, सुनील ठाकरे, संतोष शिरसाठ आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, छावा संघटनेच्या वतीने प्रधान सचिव नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई यांना २ मे २०२२ रोजी व २३ जून २०२२ रोजी पालकमंत्री यांना १ मे २०२३ रोजी ना हरकत मिळण्याबाबत पत्रव्यवहार केला असून त्यांचा पाठपुरावा केला आहे. अप्पर मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग यांना २ मे २०२२ व २३ जून २०२२ रोजी पत्र देऊन सदर विभागाची ना हरकत आलेली असून वर्क ऑर्डर झालेली आहे. काम चालू असून छत्रपती संभाजी राजे जयंती पूर्वी लवकरात लवकर पुतळा बसवण्यात यावा अन्यथा प्रोफेसर चौक अहमदनगर येथे अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले होते याची दखल घेत मनपाने लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले आहे.